
चालू घडामोडी | आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 2026

International Mother Language Day
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन केव्हा साजरी केला जातो ?
1. 1 फेब्रुवारी
2. 13 फेब्रुवारी
3. 18 फेब्रुवारी
4. 21 फेब्रुवारी
उत्तर : 21 फेब्रुवारी
बातमी काय ?
• 21 फेब्रुवारी 2026 रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्यात आला.
• या निमित्ताने उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या अद्ययावत आवृत्त्या गुजराती व तमिळ भाषेत प्रकाशित करण्यात आला.
🧐 आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन का साजरी करण्यात येतो ?
• जगातील विविध भाषा आणि सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मातृभाषांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 21 फेब्रुवारीला 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन' साजरा केला जातो.
• या दिवसाचा उद्देश भाषांचे जतन करणे, बहुभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि भाषिक विविधतेबद्दल जागरूकता पसरवणे हे आहे.
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 21 फेब्रुवारी रोजीच का साजरी करतात ?
• पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांग्लादेश असे दोन भाग होते.
• तत्कालीन पाकिस्तान सरकारने भाषा धोरण लागू करून पाकिस्तानची अधिकृत भाषा म्हणून उर्दूला मान्यता दिली होती.
• पाकिस्तान सरकारच्या या धोरणाच्या विरोधात ढाका (आजच्या बांग्लादेशाची राजधानी) विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले.
• विद्यापीठातील आंदोलनावर पोलिसांनी 21 फेब्रुवारी 1952 रोजी गोळीबार केला होता.
• आंदोलनाच्या परिणामी पाकिस्तान सरकारला नमतं घ्यावं लागले आणि बंगाली भाषेलाही मान्यता दिली गेली.
• या बलिदानाच्या स्मरणार्थ 21 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरी करण्यात येतो.
पहिला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
• 1999 मध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) 21 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरी करण्याची घोषणा केली.
• 21 फेब्रुवारी 2000 रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन जगभरात साजरा केला गेला.
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 2026 ची संकल्पना (थीम) कोणती ?
• "बहुभाषिक शिक्षणावर युवकांचे विचार" (Youth Voices on Multilingual Education) ही आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 2026 ची संकल्पना (थीम) आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• 21 फेब्रुवारी → आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
• 21 फेब्रुवारी 1952 → ढाका विद्यार्थी आंदोलन (ऐतिहासिक कारण)
• 21 फेब्रुवारी 2000 → पहिला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा
• 🎯 उद्देश → भाषांचे संरक्षण + बहुभाषिक शिक्षण + सांस्कृतिक विविधता
🎯 थीम 2026 → “बहुभाषिक शिक्षणावर युवकांचे विचार”

















