
चालू घडामोडी | राष्ट्रीय महामार्ग-160A च्या चौपदरीकरण प्रकल्पास मंजुरी
Approval for Four-Laning Project of National Highway-160A
Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच, राष्ट्रीय महामार्ग-160A (NH-160A) च्या चौपदरीकरण प्रकल्पास मंजुरी देण्यात आली. हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणांना जोडतो ?
1. घोटी – त्र्यंबक – जव्हार – मानोर – पालघर
2. नाशिक – पुणे – सोलापूर – कोल्हापूर
3. मुंबई – ठाणे – नाशिक – धुळे
4. नागपूर – अमरावती – अकोला – बुलढाणा
उत्तर : घोटी – त्र्यंबक – जव्हार – मानोर – पालघर

बातमी काय ?
• पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग-160A च्या घोटी–त्र्यंबक–जव्हार–मानोर–पालघर या मार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी दिली आहे.
प्रकल्पाचे स्वरूप काय ?
• केंद्राकडून राष्ट्रीय महामार्ग-160A च्या घोटी–त्र्यंबक–जव्हार–मानोर–पालघर या 154.635 किमी मार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी देण्यात आली.
• या प्रकल्पासाठी सुमारे ₹3,320.38 कोटी खर्च अपेक्षित असून यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी दरम्यानची कनेक्टिव्हिटी मजबूत होणार आहे.
नाशिकला फायदा -
• नाशिकच्या अंबड व सातपूर औद्योगिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असल्यामुळे शहरावर ताण वाढला आहे.
• सध्याची वाहतूक शहरातून जात असल्याने ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होते.
• नवीन महामार्गामुळे ही वाहतूक शहराबाहेर वळवली जाईल, ज्यामुळे प्रवास जलद आणि सोपा होईल.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये :
• हा प्रकल्प PM गतीशक्ती तत्त्वावर आधारित असून विविध आर्थिक व लॉजिस्टिक केंद्रांना जोडतो.
• या मार्गामुळे औद्योगिक क्षेत्रे, पर्यटन स्थळे आणि आदिवासी भाग एकमेकांशी जोडले जातील, ज्यामुळे एकात्मिक विकासाला चालना मिळेल.
• या प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रातील 6 आर्थिक नोड्स, 7 सामाजिक नोड्स आणि 8 लॉजिस्टिक नोड्स जोडले जाणार आहेत.
• यात प्रामुख्याने तारापूर आणि बोईसर येथील सेझ (SEZ), मोखाडा औद्योगिक उद्यान आणि वाडा येथील औद्योगिक वसाहतींचा समावेश आहे.
• तसेच त्र्यंबकेश्वर, जव्हार राजवाडा, वैतरणा नदी आणि अर्नाळा किल्ला यांसारख्या पर्यटन स्थळांनाही या महामार्गाचा मोठा लाभ मिळेल.
महत्त्व :
• या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ आणि वाहन खर्च कमी होईल, तसेच
• राज्यातील लॉजिस्टिक नेटवर्क अधिक मजबूत होईल.
• रोजगारनिर्मिती - या प्रकल्पामुळे सुमारे 44 लाख व्यक्ती-दिवस रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : राष्ट्रीय महामार्ग-160A च्या चौपदरीकरण प्रकल्पास मंजुरी
• NH-160A — घोटी–त्र्यंबक–जव्हार–मानोर–पालघर
• लांबी — 154.635 किमी
• खर्च — ₹3,320.38 कोटी
• उद्देश — कनेक्टिव्हिटी + ट्रॅफिक कमी करणे
• तत्व — PM गतीशक्ती योजना


















