
चालू घडामोडी | जल जीवन मिशनसाठी महाराष्ट्राचा ऐतिहासिक ₹22,898 कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर
Maharashtra to Allocate ₹ 22,898 Crore Extra for Jal Jeevan Mission
📚 Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 'जल जीवन मिशन' (Jal Jeevan Mission) साठी ₹ 22,898 कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. हे 'जल जीवन मिशन' खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
1. ग्रामीण भागात सिंचनासाठी पाणी पुरवणे
2. नद्या एकमेकांना जोडणे
3. शेततळ्यांची निर्मिती करणे
4. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पुरवणे
उत्तर : ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पुरवणे
📰 बातमी काय ?
• महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 'जल जीवन मिशन' (Jal Jeevan Mission - JJM) अंतर्गत ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांना गती देण्यासाठी ₹ 22,898 कोटींचा अतिरिक्त निधी राज्याच्या स्वतःच्या तिजोरीतून देण्यास मान्यता दिली आहे.
• मुख्य उद्देश - केंद्र सरकारच्या मॅचिंग शेअर व्यतिरिक्त (Matching Share) प्रकल्पांच्या प्रत्यक्ष खर्चातील तफावत (Funding Gap) भरून काढून कामे वेळेत पूर्ण करणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.
📊 महाराष्ट्रातील जल जीवन मिशनची आर्थिक मांडणी व प्रगती :
1) निधीचे विवरण :
• केंद्राचा वाटा (Centre's Share) → सुमारे ₹11,000 कोटी
• राज्याचा समतुल्य वाटा (State's Matching Share) → सुमारे ₹11,000 कोटी
• राज्याचा अतिरिक्त निधी (Additional State Funding) → ₹22,898 कोटी
• एकूण उपलब्ध निधी (Total Funds) → सुमारे ₹44,000 कोटी
2) महाराष्ट्रातील प्रकल्पांची स्थिती (Project Status):
• एकूण मंजूर प्रकल्प (Sanctioned Projects) → 51,560
• पूर्ण झालेले प्रकल्प (Completed Projects) → 27,823

🧐 'जल जीवन मिशन' (JJM) बद्दल थोडक्यात माहिती :
• सुरुवात - 2019
• मंत्रालय - जल शक्ती मंत्रालय (Ministry of Jal Shakti).
• मुख्य उद्दिष्ट - 'हर घर जल' (Har Ghar Jal) उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घराला कार्यक्षम नळ कनेक्शन (Functional Household Tap Connection) पुरवणे.
🎯 'जल जीवन मिशन'चा मुख्य भर (Focus Areas):
1) पुरेशा प्रमाणात आणि गुणवत्तेचे सुरक्षित पिण्याचे पाणी देणे.
2) पाण्याच्या स्रोतांचे पुनरुज्जीवन व शाश्वतता (Source Sustainability).
3) पाण्याच्या गुणवत्तेचे नियमित निरीक्षण (Water Quality Monitoring).
4) 'ग्राम पाणी व स्वच्छता समित्यांद्वारे' (VWSC) स्थानिक समुदायाचा सहभाग वाढवणे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : 'जल जीवन मिशन'
• महाराष्ट्राचा अतिरिक्त निधी → ₹ 22,898 कोटी
• एकूण प्रकल्प → 51,560 मंजूर
• पूर्ण झालेले प्रकल्प → 27,823 पूर्ण
• जल जीवन मिशन सुरुवात → 2019 (जल शक्ती मंत्रालय)
• लक्ष्य → ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पुरवणे





















