
चालू घडामोडी | जागतिक लोकसंख्या दिन 2026
World Population Day 2026
📚 Subject : GS - दिनविशेष, भूगोल - लोकसंख्या
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी 11 जुलै रोजी साजरा केला जाणारा 'जागतिक लोकसंख्या दिन' (World Population Day) ची स्थापना 1989 मध्ये खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे करण्यात आली ?
1. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP)
2. युनेस्को (UNESCO)
3. जागतिक आरोग्य संघटना (WHO)
4. जागतिक बँक (World Bank)
उत्तर : संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP)
📰 बातमी काय ?
• दरवर्षी 11 जुलै रोजी जगभरात 'जागतिक लोकसंख्या दिन' (World Population Day) साजरा केला जातो.
• वाढत्या लोकसंख्येचे सामाजिक, आर्थिक आणि विकासात्मक परिणाम यांविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
🧐 जागतिक लोकसंख्या दिन कारण, स्थापना, मुख्य उद्दिष्ट :
1) 'फाइव्ह बिलियन डे' -
• 11 जुलै 1987 रोजी जगाच्या लोकसंख्येने 5 अब्जांचा (Five Billion) टप्पा गाठला होता. या घटनेला 'फाइव्ह बिलियन डे' (Five Billion Day) म्हणून ओळखले गेले.
2) अधिकृत स्थापना (1989) -
• वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या आव्हानांकडे लक्ष वेधण्यासाठी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP - United Nations Development Programme) द्वारे 1989 मध्ये या दिवसाची अधिकृत स्थापना करण्यात आली.
3) मुख्य उद्दिष्ट -
• माता आरोग्य, गरिबी निर्मूलन, बेरोजगारी, आर्थिक विषमता, स्थलांतर आणि मूलभूत आरोग्य सुविधांच्या उपलब्धतेवर जागतिक स्तरावर उपाययोजना शोधणे.
🎯 वर्ष 2026 साठीची जागतिक लोकसंख्या दिनाची संकल्पना (थीम) कोणती ?
• “Realizing the hopes and aspirations of young people – today and for the future” (तरुणांच्या आशा आणि आकांक्षांची पूर्तता करणे – आज आणि भविष्यासाठी)

🌍 जागतिक लोकसंख्या वाढ -
• जगाची लोकसंख्या 1 अब्ज होण्यासाठी हजारो वर्षे लागली, परंतु पुढील अवघ्या दोन शतकांत ती सात पटीने वाढली.
• 2011 मध्ये जागतिक लोकसंख्येने 7 अब्ज पार केले.
• संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार जागतिक लोकसंख्या 2030 पर्यंत 8.5 अब्ज आणि 2050 पर्यंत 9.7 अब्ज होण्याचा अंदाज आहे.
🇮🇳 भारताची लोकसंख्या स्थिती :
• भारत (सुमारे 1.4 अब्ज) हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक असून, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 17% लोकसंख्या एकट्या भारतात राहते.
• भारताची लोकसंख्या 2060 ते 2080 च्या दशकात 1.7 ते 1.9 अब्ज या सर्वोच्च पातळीवर (Peak) पोहोचेल आणि त्यानंतर हळूहळू स्थिर किंवा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : World Population Day
• जागतिक लोकसंख्या दिन → 11 जुलै
• सुरुवात वर्ष व संस्था → 1989 (UNDP द्वारे स्थापना)
• 11 जुलै लाच का ? → 11 जुलै 1987 रोजी जागतिक लोकसंख्या 5 अब्ज झाली होती
• 2026 ची थीम → “Realizing the hopes and aspirations of young people – today and for the future”
• भारताचा जागतिक लोकसंख्येतील वाटा → सुमारे 17%
• भारताची लोकसंख्या सर्वोच्च पातळी(Peak) कालावधी → 2060 ते 2080 चे दशक (1.7–1.9 अब्ज)
• जागतिक लोकसंख्या अंदाज → 2030 पर्यंत 8.5 अब्ज आणि 2050 पर्यंत 9.7 अब्ज

























