
चालू घडामोडी | राष्ट्रपतींनी ड्युरंड कप 2026 च्या ट्रॉफींचे अनावरण केले.

Durand Cup 2026
📚 Subject : GS - खेळ
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 1888 मध्ये शिमल्यात सुरू झालेली 'ड्युरंड कप' (Durand Cup) ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आशियातील सर्वात जुनी स्पर्धा आहे ?
1. क्रिकेट
2. फुटबॉल
3. हॉकी
4. पोलो
उत्तर : फुटबॉल
📰 बातमी काय ?
• भारताच्या राष्ट्रपतींनी नवी दिल्ली येथील 'राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात' (RBCC) ड्युरंड कप 2026 (Durand Cup 2026) च्या 3 वैशिष्ट्यपूर्ण विजेत्या ट्रॉफींचे अधिकृत अनावरण करून 'ट्रॉफी टूर'ला हिरवा झेंडा दाखवला.
• आशियातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित मानली जाणारी ही स्पर्धा भारतीय फुटबॉल मोसमाची (Indian Football Season) अधिकृत सुरुवात मानली जाते.

✍️ ड्युरंड कपबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• ही आशियातील सर्वात जुनी (Asia's Oldest) आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात जुनी (World's 3rd Oldest) कार्यरत फुटबॉल स्पर्धा आहे.
• 1988 मध्ये शिमला येथे उद्घाटन संस्करण झाले त्यावेळी याला आर्मी चषक म्हणून ओळखले जायचे.
• सर हेनरी मार्टिमर ड्युरंड हे या स्पर्धेचे संस्थापक होते; म्हणून या स्पर्धेस ड्युरंड कप म्हणतात.
• सुरुवातीला स्पर्धा फक्त ब्रिटिश भारतीय सैन्य दलासाठी खुली होती.
🏆 ड्युरंड कपच्या 3 वैशिष्ट्यपूर्ण ट्रॉफी :
• इतर स्पर्धांप्रमाणे विजेत्याला एकच करंडक न देता, ड्युरंड कप विजेत्या संघाला ३ वेगवेगळ्या फिरत्या ट्रॉफी (Rolling Trophies) दिल्या जातात :
1. ड्युरंड कप (The Durand Cup) : 1888 मधील मूळ ऐतिहासिक विजेतेपद करंडक.
2. शिमला ट्रॉफी (The Shimla Trophy) : 1905 मध्ये शिमला येथील नागरिकांनी भेट म्हणून दिलेली शानदार ट्रॉफी.
3. राष्ट्रपती चषक (The President's Cup) : स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 1956 मध्ये सुरू केलेली ट्रॉफी.

⚽ ड्युरंड कप 2026 : आयोजन आणि स्वरूप
• व्यवस्थापन - ड्युरंड फुटबॉल टूर्नामेंट सोसायटी (DFTS) द्वारे भारतीय सशस्त्र दलांच्या (Indian Army, Navy & Air Force) संयुक्त विद्यमाने आयोजन केले जाते.
• दिनांक - ही स्पर्धा 25 जुलै 2026 ते 23 ऑगस्ट 2026 पर्यंत खेळली जाईल.
• यजमान शहरे (2026 - 5 राज्ये): कोलकाता (पश्चिम बंगाल), गुवाहाटी (आसाम), इम्फाळ (मणिपूर), शिलाँग (मेघालय) आणि रांची (झारखंड).
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Durand Cup 2026
• सुरुवात वर्ष व ठिकाण → 1888 (शिमला, हिमाचल प्रदेश)
• संस्थापक → सर मॉर्टिमर ड्युरंड
• जागतिक क्रमवारी → आशियातील पहिली आणि जगातील 3री सर्वात जुनी स्पर्धा
• विजेत्याला मिळणाऱ्या 3 ट्रॉफी → ड्युरंड कप, शिमला ट्रॉफी, प्रेसिडेंट्स कप
• आयोजक संस्था → ड्युरंड फुटबॉल टूर्नामेंट सोसायटी (भारतीय तिन्ही सैन्य दलांच्या अंतर्गत)





















