
चालू घडामोडी | मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ
Landslides in Maharashtra
📚 Subject : GS - भूगोल - आपत्ती व्यवस्थापन
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या (GSI) 'इंडिया लँडस्लाइड ससेप्टिबिलिटी मॅप' (ILSM) अहवालानुसार भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात तिच्या भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत सर्वाधिक (57.6%) भाग भूस्खलनप्रवण (Landslide-Prone) आहे ?
1. महाराष्ट्र
2. हिमाचल प्रदेश
3. सिक्कीम
4. केरळ
उत्तर : सिक्कीम
📰 बातमी काय ?
• महाराष्ट्रात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार मान्सून पावसामुळे राज्यातील अनेक डोंगराळ आणि घाट रस्ते भागात 'भूस्खलन' (Landslides) आणि रस्ते खचण्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे रस्ते वाहतूक व दळणवळण मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे.
• विशेषतः महाराष्ट्रातील पश्चिम घाट (Western Ghats / सह्याद्री) परिसरात अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
🧐 भूस्खलन म्हणजे काय ? (What is a Landslide ?)
1) व्याख्या - गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे टेकडीच्या किंवा डोंगराच्या उतारावरून दगड, माती, खडक किंवा कचरा (Debris) खाली घसरण्याच्या किंवा कोसळण्याच्या प्रक्रियेला 'भूस्खलन' (Landslide) म्हणतात.
• ही घटना अचानक (Sudden) घडू शकते किंवा दीर्घकाळ हळूहळूही होऊ शकते.
2) भूस्खलनाचे मूळ कारण :
• जेव्हा जमिनीच्या उतारावर काम करणारे गुरुत्वाकर्षण बल (Force of Gravity) हे जमिनीच्या रोधात्मक बलापेक्षा (Resisting Force) जास्त होते, तेव्हा तो उतार ढासळतो.
3) भूस्खलनासाठी जबाबदार बाह्य घटक (External Triggers):
• मुसळधार पावसामुळे जमीन संपृक्त (Saturation) होणे.
• उघड्या पडलेल्या उतारांची झीज (Erosion) होणे.
• हवामानातील बदलांमुळे खडकांची ताकद आणि रचना कमकुवत होणे.

📊 भारतातील भूस्खलनाबाबत प्रमुख तथ्ये (Key Facts on Landslides in India) :
1) प्रवण क्षेत्र (Prone Area)- 'इंडिया लँडस्लाइड ससेप्टिबिलिटी मॅप' (ILSM) नुसार, भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 13.17% भाग भूस्खलनप्रवण आहे, तर 4.75% भाग 'अत्यंत उच्च धोक्याच्या' (Very High Susceptibility) श्रेणीत येतो.
2) हॉटस्पॉट्स (Major Hotspots) - हिमालय पर्वतरांग, ईशान्येकडील राज्ये आणि पश्चिम घाट (Western Ghats) हे भारतातील मुख्य भूस्खलनप्रवण क्षेत्र आहेत.
3) सर्वाधिक प्रभावित राज्ये - सिक्कीम या राज्यातील सर्वाधिक म्हणजे 57.6% क्षेत्र भूस्खलनप्रवण आहे.
4) मानवी हानी - जगभरात भूस्खलनामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी सुमारे 8% मृत्यू एकट्या भारतात होतात.
5) नोडल संस्था (Nodal Mapping Agency) - भारतातील भूस्खलनप्रवण क्षेत्रांचे नकाशे तयार करणे आणि धोक्याचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI - Geological Survey of India) या संस्थेकडे आहे.
⛰️ भूस्खलनाची प्रमुख कारणे :
A) हिमालयीन क्षेत्र (Himalayan Region):
1) नैसर्गिक कारणे -
• हिमालय पर्वत हे भौगोलिकदृष्ट्या तरुण आणि टेक्टॉनिकदृष्ट्या अतिशय सक्रिय (Young and Tectonically Active) आहेत.
• तसेच या भागात होणारा तीव्र मान्सून पाऊस, हिमवृष्टी आणि ढगफुटी (Cloudbursts) मुळे जमीन वेगाने ढासळते.
2) मानवनिर्मित कारणे -
• अनियंत्रित रस्ते रुंदीकरण, बोगदे (Tunnelling) खोदणे, जलविद्युत प्रकल्प आणि डोंगराळ भागातील अव्यवस्थित बांधकामांमुळे उघडे पडलेले उतार कमकुवत होतात.

B) पश्चिम घाट क्षेत्र / सह्याद्री (Western Ghats Region):
1) नैसर्गिक कारणे -
• पश्चिम घाट हा हिमालयाच्या तुलनेत भूवैज्ञानिकदृष्ट्या जुना आणि स्थिर (Geologically Older & Stable) मानला जातो; मात्र या भागात होणारा मुसळधार मान्सून हे माती खचण्याचे मुख्य कारण ठरते.
2) मानवनिर्मित कारणे:
• अवैध खाणकाम (Mining), दगडखाणी (Quarrying), अनियंत्रित पर्यटन, जंगलतोड आणि उतारांवर नियोजनशून्य पद्धतीने केले जाणारे बांधकाम यामुळे भूस्खलनाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो.

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Landslides in India
• भारतातील भूस्खलनप्रवण क्षेत्र → 13.17% (4.75% अत्यंत उच्च श्रेणी)
• सर्वाधिक भूस्खलनप्रवण राज्य → सिक्कीम (57.6% क्षेत्र)
• भारतातील प्रमुख भूस्खलन हॉटेस्पॉट्स → हिमालय, ईशान्य राज्ये व पश्चिम घाट
• जागतिक भूस्खलन मृत्यूंमधील भारताचा वाटा → सुमारे 8%
• मॅपिंग करणारी नोडल संस्था → Geological Survey of India




















