
चालू घडामोडी | तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या युनिट 1 आणि 2 च्या कार्यान्वयनाला 10 वर्षांची मुदतवाढ
Tarapur Atomic Power Station Life Extension
📚 Subject : GS - अर्थशास्त्र - पायाभूत सुविधा
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 1969 मध्ये सुरू झालेले आणि सध्या जगातील सर्वात जुने कार्यरत व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र मानले जाणारे 'तारापूर अणुऊर्जा केंद्र' महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
1. मुंबई उपनगर जिल्हा
2. पालघर जिल्हा
3. रायगड जिल्हा
4. रत्नागिरी जिल्हा
उत्तर : पालघर जिल्हा
📰 बातमी काय ?
• अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव डॉ. अजित कुमार मोहंती (Dr. Ajit Kumar Mohanty) यांनी महाराष्ट्रातील तारापूर अणुऊर्जा केंद्राला भेट देऊन नुकत्याच मंजूर झालेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळ मुदतवाढीचा (Life Extension) आढावा घेतला.
• तारापूर अणुऊर्जा केंद्रातील युनिट 1 आणि 2 हे सध्या जगातील सर्वात जुने कार्यरत व्यावसायिक अणुऊर्जा रिॲक्टर्स (World's Oldest Operating Commercial Nuclear Power Reactors) आहेत.
• व्यापक आधुनिकीकरण (Modernization) आणि सुरक्षेच्या कठोर मानकांची पूर्तता केल्यानंतर अणुऊर्जा नियामक मंडळाने (AERB - Atomic Energy Regulatory Board) या दोन्ही युनिट्सना पुढील सुमारे 10 वर्षांसाठी कार्यान्वित ठेवण्यास अधिकृत मान्यता दिली आहे.

⚡ तारापूर अणुऊर्जा केंद्राबद्दल परीक्षेसाठी IMP माहिती :
• हा प्रकल्प महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात स्थित असून 1969 मध्ये कार्यान्वित झाला.
• सध्या या प्रकल्पाचे व्यवस्थापन व संचालन न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) कडून केले जाते.
⏳तारापूर अणुऊर्जा केंद्र महत्त्वाचा कालक्रम आणि तत्कालीन पंतप्रधान :
1) द्विपक्षीय करार व मंजुरी (1963) - तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात भारत आणि अमेरिका यांच्यात अधिकृत अणुऊर्जा सहकार्य करार झाला.
2) प्रत्यक्ष पायाभरणी व बांधकाम (1964) - तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या काळात IAEA नोंदीनुसार प्रत्यक्ष बांधकाम व पायाभरणी सुरू झाली.
3) व्यावसायिक वीजनिर्मिती (1969) - तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात केंद्राने अधिकृतपणे व्यावसायिक स्तरावर ग्रीडमध्ये वीजपुरवठा सुरू केला.
4) देशाला औपचारिक समर्पण (1970) - तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन होऊन प्रकल्प देशाला समर्पित करण्यात आला.

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : तारापूर अणुऊर्जा केंद्र
• भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र → तारापूर (पालघर जिल्हा, महाराष्ट्र)
• व्यवस्थापन व संचालन → NPCIL (Nuclear Power Corporation of India Limited)
• द्विपक्षीय करार व मंजुरी → पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (भारत - अमेरिका)
• पायाभरणी → पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या हस्ते
• देशाला समर्पित → पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते























