
चालू घडामोडी | महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27 : धोरणात्मक विश्लेषण - भाग 1

Maharashtra Budget 2026-27 : Policy Analysis - Part 1
📚 Subject : GS - अर्थशास्त्र - महाराष्ट्र अर्थसंकल्प, सरकारी योजना
📰 बातमी काय ?
• सन 2026-27 च्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले.
• यात त्यांनी अनेक महत्त्वाच्या बाबींवर लक्ष वेधले.
✍️ परीक्षेसाठी महत्त्वाचे असलेले आकडे -
• सध्या राज्याची अर्थव्यवस्था सुमारे 660 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
• मिशन 1 ट्रिलियन : महाराष्ट्राला 2029-30 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य.
• 2047 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
💰बजेट माहिती :
1) एकूण बजेट: 7,69,467 कोटी रूपये (राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठे बजेट).
2) विकास दर (Growth Rate) -
• चालू किमतीवर - 10.4%
• स्थिर किमतीवर - 7.9%
3) GSDP वृद्धी - 2013-14 मध्ये 16 लाख कोटी असलेला GSDP आता 51 लाख कोटी वर पोहोचला आहे.
4) देशाच्या विकासात वाटा - देशाच्या GDP मध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा 14.3% इतका मोठा आहे.
🎯 वित्तीय शिस्त आणि राजकोषीय आरोग्य :
राज्याने मोठे खर्च करूनही वित्तीय निकष पाळले आहेत.
1) कर्ज-जीडीपी प्रमाण (Debt to GDP): हे प्रमाण 18.2% आहे, जे सुरक्षित मर्यादेच्या (25%) आत आहे.
2) राजकोषीय तूट (Fiscal Deficit) - 2.78% (मर्यादा 3%).
3) महसुली तूट - ही 1 टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्यात महाराष्ट्र शासनाला यश आले आहे.
4) भांडवली खर्च (Capital Expenditure): विकासात्मक कामांसाठीचा खर्च 2 लाख कोटी (पॅरास्टेटल संस्थांसह) रूपयां पर्यंत वाढला आहे.
5) केंद्राचा हिस्सा : केंद्राच्या करांमधून मिळणारा महाराष्ट्र राज्याचा हिस्सा 87,903 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

1) सिंचन क्षमता -
• राज्याची अंतिम सिंचन क्षमता 81 लाख हेक्टर आहे.
• जून 2024 पर्यंत 57 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून उर्वरित प्रकल्पांवर काम सुरू आहे.

2) नदीजोड प्रकल्प (River Linking) :
• उल्हास खोरे ते मराठवाडा - मराठवाड्यातील दुष्काळ निवारणासाठी उल्हास खोऱ्यातील पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात नेण्याचा 87 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित आहे. ज्यातून 78 TMC पाणी वळवले जाईल.

3) मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना -
• यामध्ये यंत्रसामग्रीच्या साहाय्याने शेतरस्ते तयार केले जाणार असून
• या योजनेसाठी 1,000 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आली आहे.

4) सौर कृषी पंप योजनेत महाराष्ट्र देशात आघाडीवर :
• ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेत महाराष्ट्र देशात आघाडीवर असून दररोज सुमारे 1,500 पंप बसवले जात आहेत.
• या योजनेमुळे सुमारे 40 लाख एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

5) मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना :
• मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत 27 जिल्ह्यांमध्ये 3,881 उपकेंद्रांसाठी प्रकल्प सुरू असून सुमारे 10.25 लाख शेतकरी लाभार्थी झाले आहेत.
• राज्यातील 46 लाख कृषी ग्राहकांपैकी 33 लाखांना दिवसा वीजपुरवठा शक्य झाला असल्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

6) नवीकरणीय ऊर्जा लक्ष्य :
• नवीकरणीय ऊर्जा व ऊर्जा साठवणूक धोरण 2025-35 या कालावधीसाठी लागू करण्यात आले आहे.
• 2030 पर्यंत राज्यातील 52% आणि 2035 पर्यंत 65 % वीज अपारंपरिक स्त्रोतांमधून मिळवण्याचे लक्ष्य आहे.

7) प्रधानमंत्री सूर्यघर मोफत बिजली योजना :
• प्रधानमंत्री सूर्यघर मोफत बिजली योजनेत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे.
• देशातील सर्वाधिक रुफटॉप सोलर महाराष्ट्रात लावण्यात आले आहे.
• महाराष्ट्राने रिसोर्स अडोकसी प्लॅन तयार केला आसून असा प्लॅन तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.

8) वीजदरात घट :
• घरगुती ग्राहकांसाठी वीज दर पुढील 5 वर्षांत 26% ने कमी होणार आहेत.

9) शिक्षण क्षेत्रातील डिजिटल सुविधा :
• स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 53,709 शाळा (एकूण 63,732 पैकी) आता डिजिटल/स्मार्ट क्लासरूमने सुसज्ज आहेत.
• उर्वरित लहान शाळांमध्येही टप्प्याटप्प्याने डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

10) प्रधानमंत्री आवास योजना -
• प्रधानमंत्री आवास योजनेसाठी राज्याने 14,300 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
• महाराष्ट्रात 30 लाख घरांची गरज नोंदवली असून, एकाच वर्षात सर्व घरांना मंजुरी दिली आहे. यावर सौर ऊर्जा प्रणाली बसविण्यात येणार आहे.

11) जलजीवन मिशन -
• जलजीवन मिशन योजनेत राज्यात 81% घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
• यावर्षी केंद्र आणि राज्याकडून या योजनेसाठी 12,800 कोटी रुपये उपलब्ध होणार आहे.

12) सोलापूर विकास :
• सोलापूर IT पार्कसाठी जागा निश्चित करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध केला जाईल.
• सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा देण्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला.
• तसेच येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयही सुरू केले जाईल.

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : महाराष्ट्र
• महाराष्ट्र अर्थव्यवस्था — $660 अब्ज (सध्या)
• लक्ष्य — $1 ट्रिलियन (2029-30) / $5 ट्रिलियन (2047)
• एकूण बजेट — ₹7,69,467 कोटी (इतिहासातील सर्वात मोठे)
• GSDP — ₹51 लाख कोटी
• महाराष्ट्राचा GDP वाटा — 14.3% (भारत)
• कर्ज-जीडीपी प्रमाण — 18.2%
• राजकोषीय तूट (Fiscal Deficit) — 2.78%
























