
चालू घडामोडी | जोहा तांदूळ

Joha Rice
📚 Subject : GS - भूगोल - कृषी, GI Tag
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडे निर्यात करण्यात आलेला GI टॅग असलेला ‘जोहा तांदूळ (Joha Rice)’ कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
1. केरळ
2. आसाम
3. पंजाब
4. बिहार
उत्तर : आसाम
📰 बातमी काय ?
• भारताने आसामच्या GI टॅग असलेल्या जोहा तांदळाची 25 मेट्रिक टन निर्यात युनायटेड किंगडम आणि इटली येथे केली.
• यामुळे भारतातील पारंपरिक कृषी उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळत आहे.

जोहा तांदूळ बद्दल परीक्षेसाठी IMP माहिती :
• जोहा तांदूळ हा लहान दाण्याचा सुगंधी तांदूळ असून त्याचा खास सुगंध आणि मऊ पोत (Texture) यासाठी ओळखला जातो.
• याला 2017 मध्ये भौगोलिक संकेत (Geographical Indication - GI) दर्जा मिळाला आहे.
🌾 हा तांदूळ कुठे आणि कसा पिकवला जातो ?
• हा तांदूळ मुख्यतः ईशान्य भारतातील आसाम राज्यात पारंपरिक पद्धतीने पिकवला जातो.
• विशेषतः - अपर आसाम (Upper Assam) आणि मध्य आसाम (Central Assam) येथे.
• हा तांदूळ हिवाळी हंगामात पिकवला जातो
⚙️ जोहा तांदळाची वैशिष्ट्ये :
• जोहा तांदळाचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्याचा नैसर्गिक सुगंध, जो इतर प्रीमियम तांदळांसारखा असतो.
• हा तांदूळ शिजवल्यावर मऊ आणि स्वादिष्ट होतो, त्यामुळे तो आसाममधील पारंपरिक पदार्थांमध्ये वापरला जातो.
👉 यामध्ये काही पोषक घटकही आढळतात -
• ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड
• अँटिऑक्सिडंट्स
• फ्लॅव्होनॉइड्स
👉 त्यामुळे यात काही प्रमाणात आरोग्यदायी (Anti-diabetic, हृदयासाठी उपयुक्त) गुणधर्म असल्याचे मानले जाते
भौगोलिक संकेतांक म्हणजे काय ?
GI टॅग कोणाला देण्यात येतो ?
• GI Tag चा फूल फॅार्म Geographical Indication असा आहे.
• एखाद्या भागातील वस्तू किंवा पदार्थ ही त्या भागाचं वैशिष्ट्य असल्यास त्यास भौगोलिक संकेतांक म्हणजेच GI टॅग देण्यात येतो.
• Geographical Indication of goods (Registration and Protection) Act, 1999 हा कायदा भारतातील वस्तूंची संबंधित भौगोलिक संकेतांची नोंदणी आणि उत्तम संरक्षण करण्यास प्रयत्न करतो.
GI टॅग मिळवणारे पहिले भारतीय उत्पादन कोणते ?
• 2004 मध्ये दार्जिलिंग टी (दार्जिलिंग चहा) GI टॅग मिळवणारे पहिले भारतीय उत्पादन होते.
GI टॅग चे फायदे :
• GI टॅगमुळे या वस्तू किंवा पदार्थ यांची ओळख आणि गुणवत्ता सुरक्षित राहते.
• आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याला जास्त किंमत (Premium Price) मिळते.
• स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• जोहा तांदूळ → आसामचा सुगंधी तांदूळ
• GI टॅग → 2017
• निर्यात → 25 मेट्रिक टन (UK, Italy)
• वैशिष्ट्य → सुगंध + मऊ पोत
• पोषक घटक → Omega-3, Omega-6, Antioxidants






















