
चालू घडामोडी | ‘LAMITIYE-2026’ संयुक्त लष्करी सराव

MILITARY “EXERCISE LAMITIYE – 2026
📚 Subject : GS - संरक्षण - युद्ध सराव
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ‘LAMITIYE-2026’ संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो ?
1. भारत – सेशेल्स
2. भारत – फ्रान्स
3. भारत – ऑस्ट्रेलिया
4. भारत – जपान
उत्तर : भारत – सेशेल्स
📰 बातमी काय ?
• भारतीय सशस्त्र दलाचा तुकडी ‘LAMITIYE-2026’ या संयुक्त लष्करी सरावाच्या 11व्या संस्करणात सहभागी झाला आहे.
• हा सराव भारत आणि सेशेल्स यांच्यातील संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी आयोजित केला जातो.

🧐 LAMITIYE सराव म्हणजे काय ?
• ‘LAMITIYE’ या शब्दाचा अर्थ सेशेल्सच्या क्रिओल भाषेत “मैत्री (Friendship)” असा होतो.
• हा भारत आणि सेशेल्स यांच्यातील द्वैवार्षिक (दर दोन वर्षांनी होणारा) संयुक्त लष्करी सराव आहे.
• हा सराव 2001 पासून आयोजित केला जात आहे.
• यंदाची (2026) ही 11 वी आवृत्ती आहे.
⚙️ या सरावात नेमकं काय केलं जातं ?
• या सरावात सैनिकांना अर्ध-शहरी भागात (Semi-Urban Areas) संयुक्त कारवाई कशी करायची याचे प्रशिक्षण दिले जाते.
✍️ यामध्ये दोन्ही देशांचे सैनिक एकत्र येऊन -
• दहशतवादविरोधी (Sub-Conventional Operations) सराव करतात
• शांतता प्रस्थापना (Peacekeeping) ऑपरेशन्समध्ये समन्वय साधतात
• नवीन तांत्रिक कौशल्ये आणि आधुनिक लष्करी तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करतात
🪖 2026 संस्करणाचे विशेष वैशिष्ट्य :
• या 11 व्या संस्करणात भारताकडून प्रथमच त्रि-सेवा (Tri-sService) सहभाग झाला आहे.
1. सेना → Assam Regiment
2. नौदल → INS Trikand
3. वायुसेना → C-130J Super Hercules
🌍 सेशेल्स देशाबद्दल थोडक्यात माहिती :
• सेशेल्स हा हिंदी महासागरातील 155 बेटांचा द्वीपसमूह देश आहे
• स्थान → मादागास्करच्या ईशान्येस आणि आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळ
• राजधानी → व्हिक्टोरिया (Mahé बेटावर)
• सेशेल्स (Seychelles 🇸🇨) हा आफ्रिका खंडातील सर्वात लहान देश आहे.
🧐 हा सराव का महत्त्वाचा आहे ?
• सेशेल्सचे स्थान महत्त्वाच्या सागरी व्यापार मार्गांवर असल्यामुळे तो भारतासाठी रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा देश आहे.
• हा सराव भारताच्या SAGAR (Security and Growth for All in the Region) धोरणाचा भाग आहे
✍️यामुळे:
• सागरी सुरक्षा (Maritime Security) मजबूत होते
• भारत-सेशेल्स संबंध अधिक बळकट होतात
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• LAMITIYE → भारत – सेशेल्स संयुक्त सराव
• अर्थ → “मैत्री” (Creole भाषा)
• सुरुवात → 2001
• स्वरूप → द्वैवार्षिक (Biennial)
• 2026 → 11वे संस्करण
• विशेष → पहिल्यांदाच त्रि-सेवा सहभाग (Army + Navy + Air Force)

















