
चालू घडामोडी | भारताची पहिली देशव्यापी हस्तलिखित मॅपिंग मोहीम

India's 1st Nationwide Manuscript Mapping Drive
📚 Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम, कला आणि संस्कृती
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडे भारतातील हस्तलिखित (Manuscripts) वारसा जतन करण्यासाठी सुरू करण्यात आलेला राष्ट्रीय सर्वेक्षण उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे ?
1. शिक्षण मंत्रालय
2. माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
3. संस्कृती मंत्रालय
4. पर्यटन मंत्रालय
उत्तर : संस्कृती मंत्रालय
📰 बातमी काय ?
• भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने (Ministry of Culture) देशभरातील हस्तलिखित वारसा नोंदवण्यासाठी तीन महिन्यांचा राष्ट्रीय सर्वेक्षण उपक्रम सुरू केला आहे.
• हा उपक्रम पहिल्यांदाच (First-of-its-kind) राबवला जात असून भारतातील सुमारे 1 कोटी हस्तलिखितांचा डेटा संकलित केला जाणार आहे.
🧐 हा सर्वेक्षण उपक्रम नेमका काय आहे ?
• हा उपक्रम देशभर विखुरलेल्या हस्तलिखितांचा शोध घेऊन त्यांची माहिती एकत्रित करण्यासाठी राबवला जात आहे.
• हा सर्वेक्षण जिल्हा पातळीपासून सुरू होऊन वरच्या स्तरापर्यंत (म्हणजे राज्य → देश) राबवला जाईल.
👉 जमा झालेली माहिती ‘ज्ञान भारतम् मिशन’ (Gyan Bharatam Mission) अंतर्गत डिजिटल स्वरूपात साठवली जाईल.
🎯 या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे ?
✍️ या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताच्या विशाल हस्तलिखित वारशाचे डिजिटायझेशन (Digitisation) करून बौद्धिक चोरीला आळा घालणे हा आहे, ज्यामध्ये सुमारे 1 कोटी हस्तलिखितांचा - जगातील सर्वात मोठा संग्रह समाविष्ट आहे.
• हा उपक्रमाचा पुढील गोष्टींवर आधारित आहे -
1. हस्तलिखितांचे संरक्षण (Preservation)
2. त्यांचे डिजिटायझेशन (Digitisation)
3. संशोधनासाठी माहिती उपलब्धता (Accessibility) वाढवणे.
4. सांस्कृतिक ज्ञानाचे संरक्षण करणे.
⚙️ हा उपक्रम कसा राबवला जातो ?
• या सर्वेक्षणात संस्थांमध्ये, ग्रंथालयांमध्ये आणि व्यक्तींकडे असलेली हस्तलिखिते शोधली जातील.
• यानंतर त्यांना Geotag केले जाईल, म्हणजेच त्यांचे स्थान डिजिटल स्वरूपात नोंदवले जाईल.
• सर्वेक्षण पथके Gyan Bharatam App चा वापर करून ही माहिती अपलोड करतील.
• यानंतर या सर्व हस्तलिखितांचे मानकीकृत (standardised) डिजिटायझेशन करून त्यांना राष्ट्रीय डिजिटल संग्रहात (national digital repository) उपलब्ध केले जाईल.
🏛️ प्रशासनिक रचना (Implementation) :
हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी दोन स्तरांवर समित्या तयार करण्यात आल्या आहेत:
1. राज्य स्तर → मुख्य सचिव (Chief Secretary) यांच्या अध्यक्षतेखाली
2. जिल्हा स्तर → जिल्हाधिकारी (District Magistrate) यांच्या अध्यक्षतेखाली
🌍 धोरणाशी संबंध (Policy Linkage) :
• हा उपक्रम New Delhi Declaration (Gyan Bharatam Conference) शी संबंधित आहे.
👉 याचा उद्देश - भारताची संस्कृती, साहित्य, ज्ञान परंपरा जगासमोर मांडणे हा आहे
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• उपक्रम → राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण
• मंत्रालय → संस्कृती मंत्रालय
• वैशिष्ट्य → पहिल्यांदाच (First-of-its-kind)
• डेटा → ~1 कोटी हस्तलिखिते
• मिशन → ज्ञान भारतम् मिशन
• तंत्रज्ञान → Geotagging + Gyan Bharatam App
• उद्देश → संरक्षण + डिजिटायझेशन + उपलब्धता



















