
चालू घडामोडी | 'महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधी' स्थापना
Establishment of 'Maharashtra State Disability Fund'
📚 Subject : GS - सरकारी योजना - महाराष्ट्र सरकार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) महाराष्ट्र शासनाने 27 मार्च 2026 रोजी स्थापन केलेल्या 'महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधी'ची निर्मिती खालीलपैकी कोणत्या कायद्याच्या तरतुदीनुसार केली आहे ?
1. महाराष्ट्र दिव्यांग हक्क नियम, 2023
2. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016
3. भारतीय अपंग कल्याण कायदा, 1995
4. समाज कल्याण विभाग अधिनियम, 2020
उत्तर : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 (कलम 88)
📰 बातमी काय ?
• महाराष्ट्र शासनाने राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी 27 मार्च 2026 रोजी 'महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधी' (Maharashtra State Disability Fund) स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
⚖️ महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधीची रचना आणि अंमलबजावणी
📋 अधिकृत शासन निर्णय (GR) : या निधीची स्थापना 'दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016' मधील कलम 88 च्या तरतुदीनुसार करण्यात आली आहे.
💰 प्रारंभिक तरतूद : राज्य शासनाने या निधीसाठी सुरुवातीला 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
🏛️ अंमलबजावणी विभाग : हा निधी दिव्यांग सक्षमीकरण विभाग (पूर्वीचा दिव्यांग कल्याण विभाग) मार्फत राबविला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधीचे उद्दिष्टे कोणती ?
• नियमित सरकारी योजनांच्या चौकटीत न बसणाऱ्या उपक्रमांना आर्थिक पाठबळ देणे.
• दिव्यांगांचे पुनर्वसन, शिक्षण, आरोग्य सेवा आणि कौशल्य विकासावर विशेष लक्ष केंद्रित करणे.
• दिव्यांगांसाठी आवश्यक सहाय्यक साधने (Aids and Appliances) उपलब्ध करून देणे.
🌍 महाराष्ट्राची दिव्यांगांसाठी विशेष निर्णय :
• स्वतंत्र मंत्रालय : महाराष्ट्र हे दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य आहे.
• जिल्हास्तरीय तरतूद : राज्यातील जिल्हा वार्षिक योजनेतील एकूण निधीपैकी 1% निधी हा केवळ दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय 2026 च्या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे.
• मार्च 2026 मध्ये महाराष्ट्र सरकारने या विभागाचे नाव 'दिव्यांग कल्याण विभाग' बदलून 'दिव्यांग सक्षमीकरण विभाग' असे केले आहे.

















