
चालू घडामोडी | भारताच्या रामसर यादीत 2 नव्या पाणथळ जागांचा समावेश

Addition of 2 New Wetlands to India's Ramsar List
Subject : GS - पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच छारी -धांड पाणथळ क्षेत्राचा रामसर यादीत समावेश करण्यात आला तर हे क्षेत्र कोणत्या राज्यात आहे ?
1. गुजरात
2. मध्यप्रदेश
3. महाराष्ट्र
4. गोवा
उत्तर : गुजरात
बातमी काय ?
• अलिकडेच, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारताच्या रामसर यादीत 2 नव्या पाणथळ जागांच्या समावेशाची घोषणा केली आहे.
• याचबरोबर देशातील रामसर स्थळांची संख्या 98 स्थळांपर्यंत पोहोचली आहे.

भारताच्या रामसर यादीत समावेश केलेल्या 2 नव्या पाणथळ जागा कोणत्या ?
1. उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील पटना पक्षी अभयारण्य
2. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील छारी -धांड
🐦 पटना पक्षी अभयारण्य (Patna Bird Sanctuary) :
जिल्हा : एटा, उत्तर प्रदेश
• स्थापना : 1991
• क्षेत्रफळ : 108 हेक्टर (सुमारे 1 किमी²)
• उत्तर प्रदेशातील सर्वात लहान पक्षी अभयारण्य
वैशिष्ट्ये :
• सुमारे 3 लाख पक्ष्यांचे आगमन
• 300 पेक्षा जास्त प्रजाती
• 106 हून अधिक स्थलांतरित व निवासी पक्षी
🦩 छारी -धांड पाणथळ क्षेत्र ( Chhari Dhand Wetland Reserve)
• जिल्हा : गुजरातमधील कच्छ जिल्ह्या
• बन्नी गवताळ प्रदेश आणि रण ऑफ कच्छ यांच्या दरम्यान
• शब्दांचे अर्थ :
‣ ‘छरी’ म्हणजे खारट,
‣ ‘धांड’ म्हणजे उथळ पाणथळ जागा
पर्यावरणीय वैशिष्ट्ये :
• मोसमी (Seasonal) वाळवंटी पाणथळ प्रदेश
• पावसाळ्यात दलदलीचे स्वरूप
• उत्तरवाहिनी नद्या व टेकड्यांमधून पाणीपुरवठा
पाणथळ क्षेत्र (जागा) म्हणजे काय ?
• पाणथळ जमीन ही अशी क्षेत्रे आहेत जिथे पाणी हे पर्यावरण आणि संबंधित वनस्पती आणि प्राणी जीवन नियंत्रित करणारे प्राथमिक घटक आहे.
• पाणथळ जमीन हे एक भूभाग आहे जेथे परिसंस्थेचा एक मोठा भाग कायमस्वरूपी किंवा वार्षिक पाण्याने भरलेला असतो किंवा काही हंगामासाठी त्यात बुडलेला असतो. अशा भागात जलीय वनस्पतीं मोठ्या प्रमाणात असतात.
पाणथळ क्षेत्र इतकी महत्त्वाची का असतात ?
• जलशुद्धीकरण, परिसंस्थांचे पुरापासून संरक्षण, जमिनीची धूप आटोक्यात ठेवणे, भूजल पुनर्भरण, पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येणारा कचरा सामावून घेणे, त्यातील खनिजे विघटनाद्वारे मुक्त करून जीव-जंतूस उपलब्ध करून देणे, कार्बन डायऑक्साइड स्टोरी करणे अशी अतिमहत्त्वाचे कार्य करून पर्यावरणाचा समतोल पाणथळ क्षेत्रामुळे राखला जातो.
• त्याचबरोबर सृष्टि-वातावरण सौंदर्यात भर घालणे, पर्यटन स्थळे म्हणून आणि सामाजिक कार्यक्रमातही पाणथळ जागा महत्त्वाच्या ठरतात.
रामसर ठराव म्हणजे काय ?
रामसर स्थळ म्हणजे काय ?
• इराण मधील रामसर या शहरात 2 फेब्रुवारी 1971 रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते.
• या ठरावा अंतर्गत पाणथळ जागांचे संरक्षण करण्यासाठी एखादे क्षेत्र रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात येते.
• हा ठराव 1975 सालापासून अंमलात आला.
• भारताने हा करार 1 फेब्रुवारी 1982 रोजी स्वीकारला.
• स्थानिक आणि राष्ट्रीय कृतीच्या माध्यमातून तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याने सर्व पाणथळ जागांचे संवर्धन आणि विवेकी वापर करणे आणि त्यायोगे जगाचा शाश्वत विकास साधणे हे रामसर परिषदेचे मिशन आहे.

सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतात किती रामसर स्थळे आहेत ?
उत्तर : 98 ( फेब्रुवारी 2026 पर्यंत)
प्रश्न) भारतात सर्वात जास्त रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर : तामिळनाडू
➜ तामिळनाडूमध्ये 20 रामसर स्थळे आहेत. (फेब्रुवारी 2026 पर्यंत)
प्रश्न) महाराष्ट्रात किती रामसर स्थळे आहेत ?
1. 3
2. 5
3. 7
4. 9
उत्तर : 3
1. लोणार सरोवर
2. नांदूर मध्यमेश्वर
3. ठाणे खाडी
प्रश्न) जागतिक पाणथळ क्षेत्र दिवस ( World Wetland Day) केव्हा असतो ?
उत्तर : 2 फेब्रुवारी
• इराण मधील रामसर या शहरात 2 फेब्रुवारी 1971 रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : रामसर करार
• रामसर करार (इराण) : 2 फेब्रुवारी 1971
• जागतिक पाणथळ क्षेत्र दिवस : 2 फेब्रुवारी
• भारतातील रामसर स्थळे : 98 (फेब्रुवारी 2026 पर्यंत)
• नवीन समावेश :
1. पटना पक्षी अभयारण्य (उत्तर प्रदेश)
2. छरी धांड (गुजरात)
























