current-affair
Important Affairs
12-07-2024

चालू घडामोडी 12 जुलै 2024

चालू घडामोडी 12 जुलै 2024

अभिजात भाषा म्हणजे काय ?

Classical Language

अनेक भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या होत असलेल्या वारंवार मागणीमुळे केंद्र सरकारने अभिजात भाषेतील दर्जाच्या निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.


Subject : GS- इतिहास - कला आणि संस्कृती


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न


प्रश्न) खालीलपैकी अभिजात भाषा दर्जा नसलेली भाषा कोणती ?

1. तमिळ

2. तेलगू 

3. मराठी 

4. ओडिया

 उत्तर : मराठी


अभिजात भाषा म्हणजे काय ?

एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्राचीन सांस्कृतिक इतिहास असलेल्या भाषेला भारत सरकारकडून विशेष दर्जा दिला जातो भाषांना अभिजात भाषा म्हणून ओळखले जाते.


एखादी भाषा अभिजात कशी ठरते ? आणि ती कोण ठरवते ?


कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत.


एखाद्या भाषेला अभिजात भाषा म्हणून घोषित करण्यासाठी सरकारने विकसित केलेले सध्याचे निकष पुढीलप्रमाणे आहेत :

• भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अती प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा.

• प्राचीन साहित्य हवं, जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं.

• भाषेला स्वतःचे स्वयंभूपणा असावा, ती भाषा दुसर्‍या भाषासमूहाकडून उसनी घेतलेली नसावीत.

• अभिजात' भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.



भारतातील अभिजात भाषा :

आजपर्यंत, भारतात 6 भाषांना 'अभिजात भाषेचा' दर्जा देण्यात आला आहे.

1. तमिळ : 2004 मध्ये तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. तमिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा आहे.

2. संस्कृत 

3. तेलुगू 

4. कन्नड

5. मल्याळम

6. ओडिया : 2014 मध्ये या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला.



प्रश्न) मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळण्यासाठी गठन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते ?

उत्तर : प्रा. रंगनाथ पठारे

मराठीला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळण्यासाठी 2014 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती स्थापन केली होती.






भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक : गौतम गंभीर


New India head coach : Gautam Gambhir


भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी गौतम गंभीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


Subject : GS- खेळ


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न


प्रश्न) भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनलेल्या गौतम गंभीर बाबत खालील विधानांपैकी योग्य विधान निवडा.

1. गौतम गंभीर यांना अर्जुन आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त आहे.

2. गौतम गंभीर हे दिल्लीचे आमदार राहिलेले आहे.

3. गौतम गंभीर हे आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्स कडून खेळलेले आहे

4. वरीलपैकी सर्व बरोबर


उत्तर : गौतम गंभीर यांना अर्जुन आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त आहे. हे विधान बरोबर आहे.




• नुकतीच BCCI ने भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी गौतम गंभीर यांची नियुक्ती केली आहे.

• गौतम गंभीर यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा असून त्यांनी राहुल द्रविड यांची जागा घेतली आहे.

• गौतम गंभीर यांचा भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ 31 डिसेंबर 2027 पर्यंत असेल.


परीक्षेच्या दृष्टीने गौतम गंभीर यांच्या बद्दल महत्वाची माहिती :

जन्म : गौतम गंभीर यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1981 रोजी नवी दिल्ली येथे झाला.

वन-डे पदार्पण : 2003 मध्ये बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातून एक दिवसीय अंतर्राष्ट्रीय (वनडे) पदार्पण केले.

टेस्ट क्रिकेट पदार्पण : 2004 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

IPL टीम : दिल्ली डेअरडेव्हील्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स संघाकडून त्यांनी IPL मध्ये सामना खेळला आहे.

राजकीय वाटचाल : 2019 ते 2024 या काळात गौतम गंभीर लोकसभेचे सदस्य (खासदार) होते.


पुरस्कार : 

• 2008 मध्ये अर्जुन पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

• आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) गंभीरला 2009 साठी वर्षातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू पुरस्कार दिला.

• 2019 मध्ये पद्मश्री या चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौतम गंभीर यांना सन्मानित करण्यात आले.







कोलंबो सुरक्षा परिषद 

Colombo Security Conclave


Subject : GS- आंतरराष्ट्रीय संघटना

 

सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न


प्रश्न) अलिकडेच कोणता देश कोलंबो सुरक्षा परिषदेचा 5 वा सदस्य देश बनला ?

1. भारत

2. बांगलादेश

3. म्यानमार

4. सिंगापूर


उत्तर : बांगलादेश


मॉरिशसने आयोजित केलेल्या 8 व्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील बैठकीदरम्यान कोलंबो सुरक्षा परिषदेचा 5 वा सदस्य देश म्हणून बांगलादेश चे स्वागत केले.


कोलंबो सुरक्षा परिषदेबद्दल थोडक्यात माहिती :

स्थापना : कोलंबो सुरक्षा परिषदेची स्थापना 2011 मध्ये भारत, श्रीलंका आणि मालदीव या तीन देशांनी सागरी सुरक्षा गट म्हणून करण्यात आली होती.

• पुढे मॉरिशस हा चौथा देश या सुरक्षा परिषदेचा सदस्य बनला.

• सदस्य देश : नुकताच बांगलादेश हा सदस्य देश बनल्यामुळे आता कोलंबो सुरक्षा परिषदेत एकूण 5 सदस्य देश आहे - भारत, श्रीलंका, मालदीव, मॉरिशस आणि बांगलादेश.


कोलंबो सुरक्षा संवाद हा हिंदी महासागरातील देशांचा सुरक्षा संदर्भासाठीचा गट आहे.

 

प्रादेशिक सुरक्षा वाढविण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी एकमेकांना सहकार्याची प्रमुख क्षेत्रे ओळखली गेली ती पुढीलप्रमाणे : 

1. सागरी सुरक्षा आणि संरक्षण

2. दहशतवाद आणि कट्टरतावादाचा सामना करणे.

3. तस्करी आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारीचा सामना करणे.

4. सायबर सुरक्षा, गंभीर पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचे संरक्षण करणे.

5. मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण कार्य करणे.







पिच ब्लॅक : 2024

Pitch Black : 2024


Subject : GS- आंतरराष्ट्रीय संघटना

 

सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न


प्रश्न) बातम्यांमध्ये चर्चेत असणारा पीच ब्लॅक 2024 हा युद्धसराव कोणत्या देशात होणार आहे ?

1. भारत

2. श्रीलंका

3. अमेरिका

4. ऑस्ट्रेलिया


उत्तर : ऑस्ट्रेलिया


भारतीय वायुसेनेची (IAF) तुकडी 12 जुलै 2024 ते 02 ऑगस्ट 2024 या कालावधीत ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या पिच ब्लॅक या युद्ध सरावात सहभागी होत आहे.


पिच ब्लॅक युद्ध सरावाबद्दल महत्त्वाची माहिती : 

• या युद्ध सरावात मोठ्या लोकवस्ती नसलेल्या भागात रात्रीच्या वेळी उड्डाण करण्यावर भर देण्यात आल्यामुळे या युद्ध सरावाला पिच ब्लॅक हे नाव पडले.

• हा युद्ध सराव ऑस्ट्रेलियाच्या रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्स (RAAF) द्वारे आयोजित केलेला आहे.

• हा युद्धसराव द्विवार्षिक (म्हणजे दर 2 वर्षांनी होतो.) आणि बहु-राष्ट्रीय आहे.

• एक्स पिच ब्लॅकची 2024 ची ही आवृत्ती सरावाच्या 43 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी असेल, ज्यामध्ये 140 हून अधिक विमाने आणि विविध हवाई दलांचे 4400 लष्करी कर्मचारी यांच्यासह 20 देशांचा सहभाग आहे.


पिच ब्लॅक युद्ध सरावाचे महत्व काय आहे ?

• हा युद्ध सराव सहभागी देशांना मोठ्या अंतरावर लढाकू विमान तैनात करण्याची क्षमता मजबूत करण्यासाठी

• इंडो-पॅसिफिक प्रदेशात एकात्मिक ऑपरेशनला समर्थन देण्यासाठी 

• अत्यंत आव्हानात्मक वातावरणात देशांमधील मजबूत विमान वाहतूक संघटना निर्माण करण्यासाठी उत्कृष्ट संधी प्रदान करतो.

More Current Affairs

current-affair
Important Affairs
11-07-2024

चालू घडामोडी 11, जुलै 2024

चालू घडामोडी 11, जुलै 2024

जागतिक लोकसंख्या दिन : 11 जुलै

World Population Day 

दरवर्षी 11 जुलै रोजी जगभरात जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.


Subject : GS- अर्थशास्त्र, दिनविशेष

 

सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न


प्रश्न) जागतिक लोकसंख्या दिनाबद्दल योग्य पर्याय निवडा.

1. दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै रोजी साजरा केला जातो

2. जागतिक लोकसंख्या दिन 2024 ची संकल्पना "कोणालाही मागे सोडू नका; प्रत्येकाची गणना करा" ही आहे

3. दोन्ही योग्य

4. दोन्ही अयोग्य


उत्तर : दोन्ही योग्य


जागतिक लोकसंख्या दिना बद्दल महत्त्वाची माहिती : 

लोकसंख्या, लोकसंख्ये संदर्भातील समस्या आणि समाजावर होणाऱ्या त्याचा प्रभाव यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस जगभरात साजरा केला जातो.

उद्देश्य : जगभरातील लोकसंख्येच्या प्रश्नाकडे लक्ष वेधने, कुटुंब नियोजन, लैंगिक समानता आणि प्रजनन आरोग्याबद्दल जनजागृती निर्माण करणे हे जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचे उद्देश आहे.


जागतिक लोकसंख्या दिन 2024 ची थीम/ संकल्पना काय आहे ?

"कोणालाही मागे सोडू नका; प्रत्येकाची गणना करा"

"Leave no one behind; count everyone"


पहिला जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरी केला गेला ?

 11 जुलै 1989 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने पहिला जागतिक लोकसंख्या दिन साजरी केला.


11 जुलैच का ? 

11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्जांवर (5 billion) पोहचली. ही गोष्ट नजरेस आणून देऊन डॉ. के. सी. झकारिया यांनी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याची संकल्पना मांडली.


लोकसंख्या : 

2021 मध्ये जागतिक लोकसंख्या 7.9 बिलियन होती.

• 2030 पर्यंत जागतिक लोकसंख्या 8.5 बिलियन आणि 2050 पर्यंत 9.7 बिलियन पर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्टेट ऑफ द वर्ल्ड पॅापुलेशन रिपोर्ट 2023 च्या अनुसार भारत चीनला मागे टाकून सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश बनला आहे.

एका रिपोर्टनुसार 2024 पर्यंत भारताची लोकसंख्या 1.45 बिलियन वर्तवण्यात आली आहे.


 





राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार : 2024

National Gopal Ratna Award 


2024 च्या राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी नामांकन 15 जुलै पासून सुरू होतील.


Subject : GS- सरकारी योजना 


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न


प्रश्न) बातम्यांमध्ये असलेला राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

1. कला आणि संस्कृती

2. दुग्ध व्यवसाय

3. बालकल्याण

4. यांपैकी नाही


उत्तर : दुग्ध व्यवसाय


पुरस्काराचा उद्देश : 

• राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत 2021 पासून दूध उत्पादक शेतकरी, दुग्ध सहकारी संस्था, दूध उत्पादक कंपनी शेतकरी उत्पादक संघटना आणि कृत्रिम वेतन तंत्रज्ञान यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार देण्यात येतो.

26 नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय दूध दिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


मंत्रालय : हा पुरस्कार मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागातर्फे देण्यात येतो. ( Ministry of Fisheries, Animal Husbandry and Dairying)


यावर्षी देखील खालील श्रेणींसाठी राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार दिला जात आहे:

• सर्वोत्तम दूध उत्पादक शेतकरी जो देशी गायी/म्हशींच्या जातींचे संगोपन करतो. 

• सर्वोत्कृष्ट दुग्ध सहकारी संस्था / दूध उत्पादक कंपनी / शेतकरी उत्पादक संघटना 

• सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (AIT- Artificial Insemination Technician)

• या वर्षापासून, विभागाने ईशान्य क्षेत्रातील राज्यांसाठी विशेष पुरस्कार समाविष्ट केला आहे जेणेकरुन ईशान्य प्रदेशातील दुग्ध विकास उपक्रमांना प्रोत्साहन आणि चालना मिळेल.


पुरस्काराचे स्वरूप : 

राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2024 मध्ये गुणवत्तेचे प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि पहिल्या दोन श्रेणींमध्ये - सर्वोत्कृष्ट दुग्ध उत्पादक शेतकरी आणि सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट दुग्ध सहकारी संस्था / दूध उत्पादक कंपनी / शेतकरी उत्पादक संघटना यांचा समावेश असेल.


1. पहिला क्रमांक - 5 लाख रुपये

2. दुसरा क्रमांक - 3 लाख रुपये

3. तृतीय क्रमांक - 2 लाख रुपये

4. विशेष पुरस्कार : 2 लाख रुपये (ईशान्य क्षेत्रासाठी विशेष पुरस्कार)

• सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ श्रेणीच्या बाबतीत, राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-2024 मध्ये गुणवत्तेचे प्रमाणपत्र आणि केवळ स्मृतिचिन्ह असेल. कृत्रिम रेतन तंत्रज्ञ श्रेणीमध्ये कोणतेही रोख बक्षीस दिले जाणार नाही.


नामांकन आणि अर्ज

• नामांकनासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 15.07.2024 पासून सुरू होईल आणि नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख 31.08.2024 असेल.

• 2024 वर्षात राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी नामांकन राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल द्वारे ऑनलाइन https://awards.gov.in दाखल केले जातील.








काय आहे आनंद विवाह कायदा ?

Anand Marriage Act 


अलीकडेच राष्ट्रीय अल्पसंख्या आयोगाने आनंद विवाह कायद्याच्या अंमलबजावणी आणि नोंदणी करण्याबाबत चर्चा करण्यासाठी राज्ये/ केंद्रशासित प्रदेश प्रशासनासांसोबत बैठक घेतली.


Subject : GS- राज्यशास्त्र, कायदे


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न


प्रश्न) अलीकडेच राष्ट्रीय अल्पसंख्या आयोगाने आनंद विवाह कायद्या संदर्भात मीटिंग घेतली तर हा आनंद विवाह कायदा खालीलपैकी कोणत्या समुदायाशी संबंधित आहे ?

1. हिंदू

2. पारसी

3. शीख

4. जैन


उत्तर : शीख


काय आहे आनंद विवाह कायदा ?

आनंद विवाह कायदा भारतातील शीख समुदायाच्या विवाह विधींना वैधानिक मान्यता प्रदान करतो.

• शीख समाजाच्या चालीरीती आणि प्रथा यांचा आदर करणे आणि त्या स्वीकारणे हा या कायद्याचा उद्देश आहे.

• आनंद विवाह कायदा 1909 मध्ये भारतात ब्रिटीश वसाहतीच्या काळात लागू करण्यात आला होता .

• शीख विवाहांना कायदेशीर मान्यता आणि संरक्षण देण्यासाठी या कायद्याची स्थापना करण्यात आली होती.

• 2012 मध्ये संसदेने आनंदविवाह (दुरुस्ती) विधेयक मंजूर करून शीख पारंपारिक विवाहांना कायदेशीर मान्यता देण्याच्या कक्षेत आणले.

• आनंद विवाह नोंदणीसाठी नियम तयार करण्याचे काम संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांवर सोपविण्यात आले आहे.

• आनंद विवाह कायद्याचे महत्त्व : विद्यमान हिंदू विवाह कायद्यांतर्गत शीख विवाहांच्या वैधतेबद्दल शीख समुदायाने उपस्थित केलेल्या चिंतेचे निराकरण करणे हे या कायद्याचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर हिंदू विवाह कायद्यांतर्गत त्यांचे विवाह समारंभ न करण्याची शीख समुदायाची दीर्घकालीन मागणी ही हा कायदा पूर्ण करतो.








राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस 


Subject : GS- दिनविशेष


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न


प्रश्न) राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस केव्हा साजरी करण्यात येतो ?


1. 5 जून

2. 10 जुलै

3. 24 एप्रिल

4. 14 सप्टेंबर


उत्तर : 10 जुलै


मत्स्य व्यवसाय/ मत्स्य पालन करणारे शेतकरी तसेच इतर मत्स्यपालन भागधारकांच्या अमूल्य अशा योगदानाबद्दल दरवर्षी 10 जुलै रोजी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा केला जातो.


10 जुलै च का ?

10 जुलै 1957 रोजी डॉ चौधरी आणि डॉ. अलिकुन्ही यांनी ओडिशा येथे प्रेरित मत्स्य प्रजननाच्या प्रयोगात यश मिळवले या शास्त्रज्ञांना मिळालेले हे यश भारतातील नीलक्रांतीची सुरुवात ठरली.

• सन 2001 मध्ये डॉ.हिरालाल चौधरी यांच्या कार्यास सन्मानित करण्यासाठी भारत सरकारद्वारे 10 जुलै हा दिवस “राष्ट्रीय मत्स्य-शेतकरी दिवस” म्हणून घोषित करण्यात आला. 

डॉ.हिरालाल चौधरी यांना भारतातील नीलक्रांतीचे जनक (फादर ऑफ ब्लु रेवोल्युशन) म्हटले जाते.


भारतासाठी मत्स्यपालनाचे महत्त्व:

• भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मत्स्यपालन देश आहे आणि चीननंतरचा तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश आहे.

• मासेमारी क्षेत्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यावश्यक आहे त्याचप्रमाणे परकीय चलनाच्या नफ्याचा एक महत्त्वपूर्ण स्रोत आहे.

• मत्स्यपालन आणि मत्स्यपालन उत्पादन भारताच्या GDP मध्ये सुमारे 1% आणि कृषी GDP मध्ये 5% पेक्षा जास्त योगदान देते.

• रोजगाराच्या बाबतीत 2 कोटी 80 लाख पेक्षा जास्त लोकांना रोजगाराची संधी मत्स्य व्यवसायाने दिली आहे.


निळी क्रांती (नील क्रांती) /Blue Revolution : 

भारतीय निळ्या क्रांतीमुळे मत्स्यपालन उद्योगांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.

• भारताच्या केंद्र सरकारद्वारे प्रायोजित फिश फार्मर्स डेव्हलपमेंट एजन्सी (FFDA) ने 7 व्या पंचवार्षिक योजनेत (1985-1990) भारतातील नील क्रांतीचे नेतृत्व केले.

• आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक व्यवस्थापन पद्धती आणि पायाभूत सुविधांच्या सहाय्याने सागरी आणि अंतर्देशीय मत्स्यपालनाच्या विकासावर लक्ष केंद्रित करून भारताला जगातील आघाडीच्या मासे-उत्पादक देशांपैकी एक बनवणे हे नील क्रांती चे एक महत्वपूर्ण उद्दिष्ट आहे.


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न


प्रश्न) भारतातील नीलक्रांतीचे जनक (फादर ऑफ ब्लु रेवोल्युशन) कोणास म्हणतात ?

1. डॉ.हिरालाल चौधरी

2. डॉ. वर्गीस कुरियन

3. डॉ. एम. एस. स्वामिनाथन

4. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम


उत्तर : डॉ.हिरालाल चौधरी

1. डॉ.हिरालाल चौधरी : भारतातील नीलक्रांतीचे जनक

2. डॉ. वर्गीस कुरियन : भारतातील धवलक्रांतीचे (श्वेतक्रांतीचे जनक : भारताचे मिल्कमॅन) 

3. डॉ. एम. एस. स्वामिनाथन : भारतातील हरितक्रांतीचे जनक

4. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : मिसाईल मॅन ऑफ इंडिया

current-affair
Important Affairs
03-07-2024

नवीन फौजदारी कायदे

नवीन फौजदारी कायदे

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे तीन फौजदारी कायदे 1 जुलैपासून देशभरात लागू झाले आहेत.


Subject : GS- राज्यशास्त्र (Polity)


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न


प्रश्न) फौजदारी प्रक्रिया संहिता कायदा, 1973 ची जागा खालीलपैकी कोणत्या नवीन फौजदारी कायद्याने घेतली आहे ?

1. भारतीय साक्ष अधिनियम 2023

2. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023

3. भारतीय न्याय संहिता 2023 

4. यांपैकी नाही


उत्तर : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023


1 जुलै 2024 पासून तीन नवीन फौजदारी कायदे देशभरात लागू झाले. यामुळे देशात इंग्रजांच्या काळापासून सुरू असलेली तीन गुन्हेगारी कायदे बदलणार आहे.

 

नवीन कायद्यांची गरज का ?

• भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय पुरावा कायदा 1872, हे सर्व कायदे ब्रिटिश काळातील आहे.

• बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचे स्वरूप ही बदलले आहे. 

• त्याचबरोबर पुरावे सादर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानचा वापर करून न्यायदानाची प्रक्रिया वेगवान होण्यास मदत होईल.

• न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब कमी होऊन ऑनलाईन फायलींग, व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे साक्षीदारांचे म्हणणे ऐकण्यावर भर देण्यात येईल.


काय आहेत नवीन फौजदारी कायदे ?

जुने कायदे - भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय पुरावा कायदा 1872 यांची जागा अनुक्रमे भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 या नवीन कायद्यांनी घेतली.


• हे तीन नवीन फौजदारी कायदे 21 डिसेंबर 2023 रोजी संसदेने मंजुर केले.

• राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 25 डिसेंबर 2023 रोजी या कायद्यांना संमती दिली.

• तर 1 जुलै 2024 रोजी हे कायदे देशभरात लागू करण्यात आले.

     

नवीन फौजदारी कायदे.              एकूण कलमे

  1. भारतीय न्याय संहिता 2023 =   356 
  2. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 =  533
  3.  भारतीय साक्ष अधिनियम 2023 =  170


काही महत्वपूर्ण कलमांमध्ये बदल करण्यात आला आहे तो पुढील प्रमाणे :

 राजद्रोहाला आता देशद्रोह म्हटले जाईल : जुन्या आयपीसीच्या कलम 124 मध्ये राजद्रोहाच्या संबंधित प्रकरणांमध्ये शिक्षेची तरतूद आहे.

 नवी कायद्याअंतर्गत राजद्रोह हा ब्रिटिश काळातील शब्द हटविण्यात आला असून राजद्रोहाला आता देशद्रोह म्हटले जाईल.


कलम 187 बेकायदेशीर सभा : जुने आयपीसी कलम 144 हे घातक शस्त्र बाळगणे आणि बेकायदेशीर सभेमध्ये सहभागी होणे यांच्याशी संबंधित होते आता नवीन भारतीय न्याय संहितेत परिशिष्ट 11 मध्ये याला सार्वजनिक शांतते विरुद्ध गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे आणि भारतीय न्याय संहितीचे कलम 187 बेकायदेशीर सभेबाबत आहे.


कलम 103 हत्या : यापूर्वी हत्त्याच्या प्रकारात कलम 302 नुसार आरोपी करण्यात येत होते मात्र नवीन कायद्यानुसार अशा गुन्ह्यांसाठी कलम 103 नुसार शिक्षा देण्यात येणार आहे.


कलम 109 हत्येचा प्रयत्न : हत्येचा प्रयत्नात जुन्या आयपीसी कलम 307 नुसार शिक्षा देण्यात येत होती आता नवीन भारतीय न्यायसंहितेच्या कलम 109 नुसार शिक्षा सुनावण्यात येईल.


कलम 64 आणि कलम 70 महिला व मुलांविरुद्धचा गुन्ह्या : अत्याचाराचा गुन्हा हा पूर्वी आयपीसीच्या कलम 367 अंतर्गत होता.

 भारतीय न्याय संहितेत त्याला परिशिष्ट 5 मध्ये महिला व मुलांविरुद्धच्या गुन्ह्याच्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. नव्या कायद्यात अत्याचाराशी संबंधित गुन्ह्यांची शिक्षा आता कलम 64 अंतर्गत देण्यात येईल.

सामूहिक अत्याचाराचा गुन्हा आयपीसीच्या कलम 376 ऐवजी कलम 70 मध्ये येईल.


कलम 356 मानहानी :  मानहानी प्रकरणात पूर्वी आयपीसीचे कलम 399 नुसार कारवाई होत होती.

भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत मानहानी कलम 356 मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.


कलम 318 फसवणूक : नवीन भारतीय न्याय संहितेत फसवणूक किंवा फसवणुकीचा गुन्हा आता कलम 420 ऐवजी कलम 318 अंतर्गत येणार आहे.

current-affair
Important Affairs
03-07-2024

चालू घडामोडी 3, जुलै 2024

चालू घडामोडी 3, जुलै 2024

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव 

Maharashtra's 1st Woman Chief Secretary 

महाराष्ट्राच्या प्रशासकीय इतिहासात पहिल्यांदाच मुख्य सचिव पदावर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे

Subject : GS- नियुक्ती 


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहे ? 

1. सुधा मूर्ती

2. रश्मी शुक्ला

3. सुजाता सौनिक

4. सोनिया सेठी

उत्तर : सुजाता सौनिक

Sujata Saunik | Maharashtrachya Pahilya Mukhya Sachiv | Maharashtra's First Chief Secretary | Chief Secretary of Maharashtra


1987 बॅचच्या IAS अधिकारी सुजाता सौनिक यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिव (Chief Secretary of Maharashtra) पदी नियुक्ती झाली आहे.

महाराष्ट्राच्या प्रशासकीय इतिहासात पहिल्यांदाच मुख्य सचिव पदावर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.


महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांबद्दल थोडक्यात माहिती :

• सुजाता सौनिक या मूळच्या हरियाणाच्या आहेत.

• त्यांचे शालेय शिक्षण चंदिगड मधून पूर्ण झाले आहे.

• त्यांनी पंजाब मधून इतिहास या विषयातून आपले MA चे शिक्षण घेतले.

• त्या 1987 बॅचच्या IAS अधिकारी आहेत.

• आंतरराष्ट्रीय स्तरावर सुजाता सौनिक यांनी कंबोडिया आणि कोसोवो येथे संयुक्त राष्ट्राच्या (United Nations) दोन मानवतावादी मोहिमांमध्ये महिला, बालक आणि आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी सुद्धा काम केले आहे.



प्रश्न) महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहे ?

उत्तर : रश्मी शुक्ला


प्रश्न) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) च्या पहिल्या महिला महासंचालक कोण आहे ?

उत्तर : नीना सिंग



✍️CISF बद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇

ISRO XPosat मिशन । CISF नीना सिंग पहिल्या महिला महासंचालक

https://www.tcs9.in/mr/current-affairs/isro-xposat-misana-cisf-nina-singa-pahilya-mahila-mahasancalaka-84



मैत्री युद्ध सराव 

Exercise Maitree

अलिकडेच भारतीय लष्कराची तुकडी मैत्री या संयुक्त लष्करी सरावामध्ये भाग घेण्यासाठी रवाना झाली.

Subject : GS- यद्ध सराव


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) बातम्यांमध्ये असणारा मैत्री हा भारत आणि ----- देशांमधील संयुक्त लष्करी सराव आहे.

1. थायलंड

2. भूतान

3. श्रीलंका

4. नेपाळ

उत्तर : थायलंड

Maitree Yudh Sarav | Exercise Maitree | India | Thailand | Joint Operations


मैत्री संयुक्त लष्करी सराव : 

• मैत्री हा भारत आणि थायलंड या देशांमधील संयुक्त लष्करी सराव आहे.

• यंदाची ही 13 वी आवृत्ती आहे. हा सराव 1 ते 15 जुलै 2024 दरम्यान थायलंडच्या टाक प्रांतातील वाचिराप्राकन येथे होणार आहे.

• यापूर्वी 2019 मध्ये मैत्री हा युद्ध अभ्यास मेघालय राज्यातील उमरोई या ठिकाणी झाला होता.

• थायलंडमध्ये होणाऱ्या या युद्धाअभ्यासात भारतीय सैन्य दलातून एकूण 76 सैनिकांचा समावेश असून त्यामध्ये मुख्यत्वे लडाख स्काउट्सच्या तुकडीचे जवान आणि इतर संरक्षण दलांबरोबर सेवांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.


सरावाचे उद्दिष्टे : 

• भारत आणि थायलंड यांच्यात लष्करी सहकार्य वृद्धिंगत करण्याचे मैत्री या संयुक्त लष्करी सरावाचे उद्दिष्ट आहे.

• या सरावामध्ये उच्च दर्जाची शारीरिक तंदुरुस्ती , संयुक्त व्यवस्थापन आणि संयुक्तपणे विविध ड्रिल यांचा समावेश असेल.

• या सरावामुळे संयुक्त राष्ट्रांच्या (UN) चार्टरच्या अध्याय VII अंतर्गत जंगल आणि शहरी भागातील घुसखोरी, दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी क्षमतेमध्ये वाढ होईल.

• या सरावादरम्यान होणाऱ्या सामाईक कवायतींमध्ये - जॅाईंट ॲापरेशनल सेंटर ची निर्मिती, गुप्तचर आणि देखरेख केंद्राची स्थापना, ड्रोनचा वापर आणि ड्रोन विरोधी यंत्रणा, लँडिंग साठी जागेची निश्चिती, लहान तुकडी रणनीती आणि एक्सट्रॅक्शन ( सुटका), स्पेशल हेलिबोर्न ऑपरेशन्स, घेराबंदी आणि शोध मोहीम, रूम इंटरव्हेंशन ड्रिल्स आणि बेकायदेशीर बांधकामे नष्ट करणे यांचा समावेश असेल.

• या सरावामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांमधील आंतर-कार्यक्षमता वाढवण्यास मदत होईल, जसे की संयुक्त कारवाईसाठी रणनीती, तंत्र आणि कार्यपद्धती इत्यादी.



What is Project Nexus 

प्रोजेक्ट नेक्सस काय आहे ?

RBI नुकतीच प्रोजेक्ट नेक्सस मध्ये सामील झाली.

Subject : GS- अर्थशास्त्र 


सरळसेवा, पोलीस भरती,  अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) प्रोजेक्ट नेक्सस (NEXUS) मध्ये नुकतीच RBI सामील झाली आहे तर हे प्रोजेक्ट नेक्सस खालीलपैकी कोणत्या बँकेद्वारे सुरू करण्यात आले आहे ?

1. जागतिक बँक (WB)

2. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटना ( IMF)

3. बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट (BIS)

4. आशियायी डेव्हलपमेंट बँक (ADB)

उत्तर : बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट (BIS)

Project Nexus | RBI | India | Switzerland


प्रोजेक्ट नेक्सस बद्दल महत्त्वाची माहिती : 

• आंतरराष्ट्रीय क्रॅास बॉर्डर रिटेल पेमेंट यामुळे अधिक सक्षम होईल यासाठी देशांतर्गत होणारी फास्ट पेमेंट सिस्टीम लिंक केली जाईल.

बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंटच्या (BIS) इनोवेशन हबने प्रोजेक्ट नेक्सस ची संकल्पना मांडली होती.

• मलेशिया, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि भारत या आशियाई देशांच्या फास्ट पेमेंट सिस्टीम एकमेकांना जोडने हा या प्रोजेक्टचा मुख्य उद्देश आहे. 

• एकमेकांच्या पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चरचा एकत्रित वापर केल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च कमी होतो त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पेमेंटची सुलभता आणि खर्च कमी करण्यास यामुळे मदत होईल.

• जेव्हा एखादा नवीन देश नेक्सस प्रोजेक्ट मध्ये सामील होतो तेव्हा आधीचे देश आणि नवीन देश हे आपोआपच एकमेकांना कनेक्ट होतात त्यामुळे सर्व सहभागी देशांचा एकमेकांच्या देशात पेमेंट करण्यासाठी लागणारा इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च कमी होतो.

• प्रोजेक्ट नेक्सस 2026 ला सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट (BIS) काय आहे ?

• BIS ची स्थापना 1930 मध्ये झाली

• BIS ही एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे.

• ही बँक सदस्य देशांच्या केंद्रीय बँकांच्या मालकीची आहे. (उदाहरणार्थ भारताची केंद्रीय बँक RBI आहे)

• BIS बँक सध्या 63 राष्ट्रीय मध्यवर्ती बँकांच्या मालकीची आहे.

• सदस्य देशांच्या केंद्रीय/मध्यवर्ती बँकांसाठी बँक म्हणून BIS काम करते.

• देशांच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारात सहकार्य वाढवणे हे BIS चे प्राथमिक ध्येय आहे.

मुख्यालय : बासेल, स्वित्झर्लंड येथे आहे.


सरळसेवा, पोलीस भरती,  अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) बातम्यांमध्ये असलेल्या प्रोजेक्ट नेक्सस (NEXUS) बद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.

1. प्रोजेक्ट नेक्सस बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट (BIS) बँकेद्वारे सुरू करण्यात आले आहे.

2. या प्रोजेक्टमुळे सर्व सहभागी देशांचा एकमेकांच्या देशात पेमेंट करण्यासाठी लागणारा इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च कमी होईल.

3. भारत सुद्धा या प्रोजेक्टचा भाग आहे.

4. वरील पैकी सर्व बरोबर

उत्तर : वरील पैकी सर्व बरोबर



अराकू कॉफी 

Araku Coffee

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या "मन की बात" या रेडिओ कार्यक्रमात अराकू कॉफीच्या अनोख्या चवीचे आणि गुणधर्माचे कौतुक केले.

Subject : GS- GI Tag, कृषी 


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या "मन की बात" या रेडिओ कार्यक्रमात अराकू कॉफीच्या अनोख्या चवीचे आणि गुणधर्माचे कौतुक केले. तर ही अराकू कॉफी कोणत्या राज्यात आढळते ?

1. तामिळनाडू 

2. आंध्र प्रदेश 

3. कर्नाटक

4. सिक्कीम

उत्तर : आंध्र प्रदेश 

Araku Coffee | Andhra Pradesh | Coffee Production


अराकू कॉफी बद्दल महत्त्वाची माहिती : 

आंध्र प्रदेशातील अल्लुरी सिताराम राजू जिल्ह्यातील अराकू दरीत अराकू कॉफीची लागवड केली जाते.

• हा भाग भारताच्या पूर्व घाटात (Eastern Ghat) आहे.

• या कॉफीमध्ये चॉकलेट, कॅरमल आणि सूक्ष्म फ्रुटी आम्लाची विशिष्ट चव आहे.

• अराकू कॉफी प्रामुख्याने सेंद्रिय शेती पद्धती वापरून केली जाते.

• ही कॉफी आदिवासी शेतकरी आणि सहकारी तत्त्वावर पिकवली जाते. 

• या पद्धतीची शेती आदिवासी लोकांच्या शाश्वत उपजीविका आणि सामुदायिक सक्षमीकरणाला चालना देण्यास मदत करते.

• पुरस्कार आणि सन्मान : 

• अराकू कॉफीला कॅफे डी कोलंबिया स्पर्धेतील "बेस्ट रोबस्टा" पुरस्कारासह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

• 2019 मध्ये अराकू कॉफीला अद्वितीय गुण आणि उत्कृष्ट चवीसाठी भौगोलिक संकेतांक (GI Tag) प्राप्त झाला.


कॉफी बद्दल महत्त्वाची माहिती : 

• ब्राझील, व्हिएतनाम आणि कोलंबिया हे कॉफीच्या उत्पादनात पहिले तीन उत्पादक देश आहेत.

• भारताचा जगात कॉफीच्या उत्पादनात 6 वा क्रमांक लागतो.

• भारतात कॉफी उत्पादनात पहिले तीन राज्य कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू हे आहेत.


current-affair
Important Affairs
02-07-2024

चालू घडामोडी 02, जुलै 2024

चालू घडामोडी 02, जुलै 2024

संज्ञान App

अलीकडेच, रेल्वे संरक्षण दलाच्या महासंचालकांनी (RPF - Railway Protection Force) संज्ञान ॲप (Sangyaan App) नावाचे मोबाईल ऍप्लिकेशन लाँच केले.

Subject : GS - सरकारी योजना


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न ) नुकतेच लॉन्च केलेले संज्ञान ॲप कशाच्या संदर्भात आहे ?

1. कायद्यांची माहिती

2. हवामान माहिती

3. सरकारी टेंडर माहिती

4. कृषी माहिती

उत्तर : कायद्यांची माहिती

Sangyaan App


काय आहे संज्ञान App ?

• भारतातील कायदेशीर घडामोडींची माहिती या ॲपमध्ये दिलेली आहे.

• हे App रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) टेक्निकल टीमने डिझाईन आणि विकसित केले आहे.

उद्दिष्टे :  

• RPF कर्मचाऱ्यांना नवीन आणि जुन्या दोन्ही कायद्यांच्या तरतुदीत समजून घेण्यासाठी माहिती प्रदान करणे तसेच RPF कर्मचाऱ्यांना शिक्षित आणि सशक्त करणे हे या ॲपचे उद्दिष्टे आहेत.

• हे ॲप नवीन आलेले तीन गुन्हेगारी कायदे -1) भारतीय न्याय संहिता, 2023  (2) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023  (3) भारतीय साक्ष अधिनियम, 2023 या कायद्यांबद्दल सखोल माहिती देते.


रेल्वे संरक्षण दल (RPF) बद्दल महत्त्वाची माहिती : 

• स्वातंत्र्यापूर्वी 1882 मध्ये वेगवेगळ्या रेल्वे कंपन्या स्वतःच्या मालाचे संरक्षण करण्यासाठी स्वतः चे सैन्य नेमत असत.

• भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1957 मध्ये संसदेच्या कायद्याद्वारे या सैन्याला वैधानिक दल (Statutory Force) म्हणून घोषित करण्यात आले.

• पुढे 1985 मध्ये या दलाला भारतीय संघराज्याचे सशस्त्र दल म्हणून घोषित करण्यात आले.

• आता हे दल केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या परिचालन आणि प्रशासकीय नियंत्रणाखाली सशस्त्र दल म्हणून काम करते.

रेल्वेच्या मालमत्तेचे, प्रवाशांचे संरक्षण आणि सुरक्षा करणे हे RPF चे काम आहे.




RIMPAC सागरी युद्ध सराव 

बातम्यांमध्ये : दक्षिण चीन समुद्र आणि उत्तर प्रशांत महासागरात तैनात असलेली भारतीय युद्ध नौका शिवालिक जगातील सर्वात मोठा नौदल सराव (Naval Exercise) असलेल्या रिम ऑफ द पॅसिफिक (RIMPAC) मध्ये सहभागी होण्यासाठी हवाई येथील पर्ल हार्बरवर पोहोचली आहे.

Subject : GS - युद्ध अभ्यास


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न ) बातम्यांमध्ये असलेल्या रिम ऑफ द पॅसिफिक सागरी सराव (RIMPAC) 2024 चे आयोजन कुठे केले जात आहे ?

1. अरबी समुद्र

2. अंदमान निकोबार बेट भारत

3. हवाई बेटे अमेरिका

4. हिरोशिमा जपान

उत्तर : हवाई बेटे अमेरिका

RIMPAC Sagari Yudh Sarav


रिम ऑफ द पॅसिफिक सागरी सराव (RIMPAC) : 

हवाई येथे होणारा हा जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय सागरी सराव (Maritime Exercise) आहे.

• हवाई हे संयुक्त अमेरिकेचे पॅसिफिक महासागरातील एक राज्य (बेट) आहे.

• हा एक बहुराष्ट्रीय नौदल सराव असून सुमारे 29 देश या सरावामध्ये भाग घेणार आहेत.

• अमेरिका नौदलाच्या नेतृत्वाखाली होणार हा सराव 1 ऑगस्टपर्यंत चालेल.

इंटिग्रेटेड अँड रेडी या थीम अंतर्गत हा सराव आयोजित केला गेला आहे.

उद्दिष्ट : सरावा मध्ये सहभागी देशांमध्ये आंतरकार्यक्षमता वाढवणे आणि सहभागी देशांच्या नौदलांमध्ये मैत्रीपूर्ण विश्वास निर्माण करणे हे या सरावाचे उद्दिष्ट आहेत.




12 विश्व हिंदी सन्मान 

Subject : GS - पुरस्कार


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) 12 विश्व हिंदी सन्मान खालीलपैकी कोणाला देण्यात आला ?

1. संजना ठाकूर 

2. डॉ. उषा ठाकूर 

3. श्रीराम शर्मा 

4. अरुंधती रॉय

उत्तर : डॉ. उषा ठाकूर 

12 ve vishva hindi sanman


12 विश्व हिंदी सन्मान 

• नुकताच नेपाळमधील भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या हिंदी संवाद कार्यक्रमात डॉ. उषा ठाकूर यांना 12 वा विश्व हिंदू सन्मान देऊन गौरविण्यात आले.

• हिंदी साहित्याच्या जडणघडणीतील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

• हा पुरस्कार भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून दिला जातो.

• 2023 मध्ये फिजी येथे 12 वी जागतिक हिंदी परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत डॉ. उषा ठाकूर उपस्थित राहू शकल्या नाहीत त्यामुळे त्यांना हा पुरस्कार काठमांडू येथील त्रिभुवन विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात देण्यात आला.


जागतिक हिंदी परिषद : 

• जागतिक हिंदी परिषद हिंदी भाषेतील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय परिषद आहे.

• उद्दिष्टे : हिंदी भाषेबद्दल जागरूकता निर्माण करणे, हिंदी भाषेच्या विकासाचे वेळोवेळी मूल्यांकन करणे, हिंदी भाषेतील साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणे, जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये हिंदी भाषेचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे हे जागतिक हिंदी परिषदेचे उद्दिष्टे आहेत.


पहिली जागतिक हिंदी परिषद केव्हा आणि कुठे झाली ?

पहिली जागतिक हिंदी परिषद 10 ते 14 जानेवारी 1975 रोजी नागपूर येथे झाली.




भारताचे नवे परराष्ट्र सचिव 

Subject : GS - नियुक्ती


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) भारताचे नवे परराष्ट्र सचिव (Foreign Secretary) म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

1. हर्षवर्धन श्रींगला

2. विक्रम मिसरी

3. विनय मोहन क्वात्रा

4. सुब्रमण्यम जयशंकर 

उत्तर : विक्रम मिसरी

Vikram Misari


• नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने भारताचे नवे परराष्ट्रीय सचिव म्हणून विक्रम मिसरी यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.

• विक्रम मिसरी हे 15 जुलै 2024 रोजी पासून आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील.

• विक्रम मिसरी हे भारताचे 35 वे परराष्ट्र सचिव असतील.


विक्रम मिसरी यांच्या बद्दल थोडक्यात माहिती : 

• यांचा जन्म 1964 मध्ये श्रीनगर येथे झाला.

• ते 1989 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्रीय सेवा (Indian Foreign Service) अधिकारी आहेत.

• त्यांनी यापूर्वी परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयात विविध पदांवर काम केले आहे.


प्रश्न) भारताचे पहिले परराष्ट्र सचिव कोण होते ?

उत्तर : के. पी. एस. मेनन सर 


नोट : सुब्रमण्यम जयशंकर सर हे भारताचे परराष्ट्र मंत्री (External Affairs Minister) आहे.

current-affair
Important Affairs
01-07-2024

चालू घडामोडी 01, जुलै 2024

चालू घडामोडी 01, जुलै 2024

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) म्हणजे काय ?


• बातम्यांमध्ये : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) वार्षिक शिखर परिषदेत भारताचे नेतृत्व भारताचे परराष्ट्र मंत्री श्री जयशंकर सर करतील.

• या वार्षिक शिखर परिषदेत प्रादेशिक सुरक्षा परिस्थिती, कनेक्टिव्हिटी आणि व्यापाराला चालना देण्याच्या मार्गांवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे.

Subject : GS- आंतरराष्ट्रीय संघटना

 

सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) 2024 ची शिखर परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली झाली ?

1. भारत 

2. उझबेकिस्तान

3. चीन 

4. कझाकस्तान

उत्तर : कझाकस्तान

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) 2024 ची शिखर परिषद कझाकस्तानच्या अस्ताना येथे होणार आहे.

Shangai Cooperation Organization


शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) म्हणजे काय ?

• SCO ही एक राजकीय आर्थिक आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण संस्था आहे.

• स्थापना : 15 जून 2001 मध्ये शांघाय, चीन येथे SCO ची स्थापना झाली.

मुख्यालय (Headquarters) : बिजिंग (चीन)

संस्थापक देश: चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गीस्तान, ताजकिस्तान आणि उझबेकिस्तान हे SCO चे सं संस्थापक देश होते.

• 2017 मध्ये भारत आणि पाकिस्तानचा समावेश करण्यात आला तर 2023 मध्ये इराणचा समावेश या संघटनेत करण्यात आला.

• उद्दिष्टे : सदस्य राष्ट्रांमध्ये सहकार्य आणि शांतता वाढवणे तसेच लोकशाही, न्याय आणि तर्कसंगत आंतरराष्ट्रीय राजकीय आणि आर्थिक व्यवस्था सुदृढ करणे हे या ऑर्गनायझेशनचे उद्दिष्टे आहेत.


शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) मध्ये सध्या सदस्य देश किती आहे ?

सध्या स्थितीत SCO मध्ये एकूण 9 सदस्य राष्ट्र आहेत.- (चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गीस्तान, ताजकिस्तान, उझबेकिस्तान, भारत, पाकिस्तान आणि इराण).



सिंधू पाणी करार काय आहे ?


बातम्यांमध्ये - 1960 च्या सिंधू पाणी करारावर चालू असलेल्या चर्चेचा भाग म्हणून पाकिस्तानी शिष्टमंडळ नुकतेच जम्मूमध्ये दाखल झाले.

Subject : GS- राज्यशास्त्र (Polity) 


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारताचा पूर्ण अधिकार आहे ? (MPSC गट ब 2020)

1. सिंधू, चिनाब व झेलम

2. सतलज, चिनाब व झेलम

3. रावी, बियास व सतलज

4. चिनाब, बियास व झेलम

उत्तर : रावी, बियास व सतलज

Sundhu Nadi Karar


सिंधू पाणी करार काय आहे ?

सिंधू पाणी करार हा सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या यांच्यातील पाण्याचा वापर आणि वितरण नियंत्रित करण्याचा भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेला करार आहे.

• हा करार 1960 मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व पाकिस्तानचे राष्ट्रपती आयुब खान यांच्या स्वास्वाक्षरीने झाला.

• हा करार जागतिक बँकेच्या (World Bank) मध्यस्थीने झाला.

• या करारानुसार भारताच्या वाट्याला रावी, बियास आणि सतलज या पूर्वेकडील तीन नद्यांचे पाणी मिळाले आहे.

• तर पाकिस्तानच्या वाट्याला सिंधू, झेलम आणि चिनाब या पश्चिमेकडील तीन नद्यांचे पाणी मिळाले आहे.


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करारावर भारताचे तत्कालीन पंतप्रधान ------ यांनी स्वास्वाक्षरी केली.

1. पंडित जवाहरलाल नेहरू

2. लाल बहादूर शास्त्री

3. इंदिरा गांधी

4. अटलबिहारी वाजपेयी

उत्तर : पंडित जवाहरलाल नेहरू



महाराष्ट्र कृषी दिन

Maharashtra Agriculture Day


महाराष्ट्रात दरवर्षी 1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिवस साजरा केला जातो.

तर 1 जुलै ते 7 जुलै हा आठवडा कृषी सप्ताह म्हणून साजरा केला जातो.


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न ) महाराष्ट्राच्या कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो ?

1. यशवंतराव चव्हाण

2. विलासराव देशमुख

3. वसंतराव नाईक 

4. शंकरराव चव्हाण

उत्तर : वसंतराव नाईक 

Krushi Din


1 जुलै हाच दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून का साजरी करतात ?

राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ 1 जुलै त्यांचा जन्म दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. 


वसंतराव फुलसिंग नाईक :

जन्म : 1 जुलै 1913 

जन्मस्थळ : गहुली (यवतमाळ जिल्हा)

मुख्यमंत्री :  

• वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री होते.

• 1963 ते 1975 या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

• यांना महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक म्हणूनही ओळखले जाते.

• त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झिजवले.

• त्यांनी आपल्या कारकिर्दीत शेतकऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले. त्यांनी कृषी औद्योगिक क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली.

• त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचा सन्मान म्हणून 1989 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी 1 जुलै हा दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला


महत्त्वाचे नोट्स 

• जागतिक हरित क्रांती चे जनक : नॉर्मन बोरलॉग

• भारतीय हरितक्रांतीचे जनक : एम. एस. स्वामीनाथन

• महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक : वसंतराव नाईक



कुमारमंगलम तोफखाना संग्रहालय


• अलीकडेच भारतीय लष्कराच्या नाशिक इथल्या तोफखाना केंद्रातील नूतनीकरण केलेल्या कुमार मंगलम तोफखाना संग्रहालयाचे भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला.

• देशातील माजी लष्कर प्रमुख जनरल परमशिव प्रभाकर कुमारमंगलम यांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावे साकारण्यात आलेला हा तोफखाना संग्रहालय हे देशातील अद्वितीय संग्रहालय आहे.

• या संग्रहालयाच्या माध्यमातून भावी पिढ्यांना प्रेरणा देणे आणि देशाच्या रक्षणासाठी केलेल्या बलिदानाविषयीचा आदर तळागाळापर्यंत रुजवणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे लेफ्टनंट जनरल अदोष कुमार यांनी उद्घाटनानंतर केलेल्या भाषणातून आपल्या भावना व्यक्त केल्या.

• कुमार मंगलम तोफखाना संग्रहालयात जनतेसाठी खुले करण्यात आले आहे.

• भारतीय तोफखान्याच्या गौरवशाली इतिहासाची आणि शौर्याची माहिती पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे.

kumArmangalam topkhana sangralay


माजी लष्कर प्रमुख जनरल परमशिव प्रभाकर कुमारमंगलम

जन्म : 1 जुलै 1913

जन्मस्थळ : तमिळनाडू 

1966 ते 1969 या काळात भारतीय लष्कराचे लष्कर प्रमुख होते.


युद्धे :

• दुसरे महायुद्ध

• 1947 चे भारत- पाकिस्तान युद्ध

• 1962 चीन- भारत युद्ध

• 1965 चे भारत- पाकिस्तान युद्ध इत्यादी


पुरस्कार : 

• पद्मविभूषण (भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार)

• डिस्टिंग्वीश सर्विस ऑर्डर 

• मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर



✍️एम. एस. स्वामीनाथन यांबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

हरित क्रांतीचे जनक : एम. एस. स्वामीनाथन

https://www.tcs9.in/mr/current-affairs/father-of-green-revolution-m-s-swaminathan


✍️महाराष्ट्र पोलीस भरती 2024 फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा👇👇

2024 : फ्री टेस्ट

https://www.tcs9.in/mr/test-series/maharashtra-police/free-test-no-1-47


✍️चालू घडामोडी फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇

Jun 2024 Chalu Ghadamodi Test

https://www.tcs9.in/mr/current-affairs-quiz/jun-2024-chalu-ghadamodi-test-51


👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://www.tcs9.in/mr


👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://www.tcs9.in/mr


👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं

https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA


👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स

https://t.me/tcs9team


👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 

https://www.instagram.com/tcs9team/


👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स

https://whatsapp.com/channel/0029VaDVFo0Likg3M3cwVc3C


current-affair
Important Affairs
30-06-2024

T20 वर्ल्ड कप 2024 विजेता भारत

T20 वर्ल्ड कप 2024 विजेता भारत

भारताने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत T20 वर्ल्डकपवर 2 ऱ्यांदा

आपले नाव कोरले

Subject : GS- खेळ


• सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न


प्रश्न) ICC T20 वर्ल्ड कप 2024 संदर्भात पुढील विधानांपैकी चुकीचे विधान ओळखा.

1. 2024 चा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये खेळला गेला.

2. भारताने आत्तापर्यंत दोन वेळा T20 वर्ल्ड कप जिंकला आहे.

3. 2026 वर्ल्ड कपचे यजमान देश भारत आणि श्रीलंका हे आहेत.

4. प्लेअर ऑफ द सिरिज जसप्रीत बुमरा ठरला.

उत्तर : 2024 चा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये खेळला गेला. हे चुकीचे विधान आहे.

 2024 चा वर्ल्ड कप अमेरिका(USA) आणि वेस्ट इंडीज मध्ये खेळला गेला.


चला तर बघूया परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पॉईंट :


T20 World Cup 2024


ICC पुरुष T-20 वर्ल्ड कप बद्दल : 

आयोजक : आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (International Cricket Council)

T-20 वर्ल्ड कप दर 2 वर्षांनी येतो.

पहिला T-20 वर्ल्ड कप : 2007 साली दक्षिण आफ्रिका येथे आयोजित केला होता आणि भारताने हा वर्ल्ड कप जिंकला होता.


मागील T-20 वर्ल्ड कप विजेता संघ : 


• भारत : 2 वेळा (2007 आणि 2024)

• इंग्लंड : 2 वेळा (2010 आणि 2022)

• वेस्ट इंडिज : 2 वेळा (2012 आणि 2016)

• पाकिस्तान : 1 वेळा (2009)

• श्रीलंका : 1 वेळा (2014)

• ऑस्ट्रेलिया : 1 वेळा (2021)


2026 वर्ल्ड कप यजमान देश भारत आणि श्रीलंका हे आहेत.




World Cup 2023 (ODI) बद्दल चालू घडामोडी नोट्स वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇👇

क्रिकेट वर्ल्ड कप 2023 विजेता - ऑस्ट्रेलिया

https://www.tcs9.in/mr/current-affairs/cricket-world-cup-2023-winner-australia


महाराष्ट्र पोलीस भरती 2024 फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा👇👇

2024 : फ्री टेस्ट

https://www.tcs9.in/mr/test-series/maharashtra-police/free-test-no-1-47


चालू घडामोडी फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇

Jun 2024 Chalu Ghadamodi Test

https://www.tcs9.in/mr/current-affairs-quiz/jun-2024-chalu-ghadamodi-test-51


👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://www.tcs9.in/mr


👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://www.tcs9.in/mr


👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं

https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA


👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स

https://t.me/tcs9team


👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 

https://www.instagram.com/tcs9team/


👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स

https://whatsapp.com/channel/0029VaDVFo0Likg3M3cwVc3C


#t20worldcup

#rohitsharma

#hardikpandya

#viratkohli

#bumra

#suryakumar

#mpsc

#upsc

#maharashtrapolicebharti

#maharashtrapolicebharti

#policebhartisyllabus

#policebhartiprashnasanch

#policbharticutoff

#chalughadamodi

#policebhartiprashnsanch

#policebhartipreviousyearquestionpapaer

#policebhartijahirat

#policebharticutoff

#policebhartigr

#gk

#gs

#currentaffairs

#agniveerbharti

#agniveerbhartiSyllabus

#agniveerbharticutoff

current-affair
Important Affairs
22-06-2024

आंतरराष्ट्रीय योग दिवस : 2024

आंतरराष्ट्रीय योग दिवस : 2024

• दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात उत्साहात साजरा केला जातो.

• यंदाचा हा 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे.

• श्रीनगर येथील शेर- ए-कश्मीर आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्र यांनी आयोजित केलेल्या योग दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला.


आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 ची थीम काय आहे ?

"स्वतःसाठी आणि समाजासाठी योग." ( Yoga for Self and Society) ही या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम (संकल्पना) आहे.


दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस का साजरी करतात ?

• जगभरातील लोकांना योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी, योगा बद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो.


आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जूनलाच का साजरी करतात ?

21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. या दिवसानंतर सूर्य दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो.

• योग आणि अध्यात्मा साठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो.

• या दिवसाला ग्रीष्म संक्रांती असेही म्हणतात. 

• यामुळे 21 आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जूनला साजरी करतात.


पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा साजरी केला ?

21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरी केला

• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभे (UNGA) मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाबद्दल प्रस्ताव मांडला.

• या प्रस्तावास संयुक्त राष्ट्र महासभेने ११ डिसेंबर 2014 रोजी मान्यता दिली आणि 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला.

• लोकांना कार्यक्षम आणि आरोग्यदायी राहण्यास मदत करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकार यांनी मिळून WHO mYoga ॲप लॉन्च केले.

2016 मध्ये योगाला मानवताच्या युनेस्को च्या अमृत सांस्कृतिक वारसाच्या (UNESCO - Intangible Cultural Heritage of Humanity) यादी मध्ये समावेश करण्यात आले.

WHO mYoga App


योगाचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते ?

महर्षी पतंजली यांना योगाचे पितामहा म्हणून ओळखले जाते. 

• महर्षी पतंजली हे एक प्राचीन भारतीय ऋषी आणि तत्वज्ञानी होते.

• त्यांनी योग सूत्रांचे लेखन केले यात त्यांनी योगाची नैतिक मार्गदर्शक तत्त्वे, ध्यान तंत्रे आणि आध्यात्मिक उद्दिष्टांसह तत्त्वे आणि पद्धतींची रूपरेषा सांगितली आहे.

Maharshi Patanjali





महाराष्ट्र पोलीस भरती 2024 फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा👇👇

2024 : फ्री टेस्ट

https://www.tcs9.in/mr/test-series/maharashtra-police/free-test-no-1-47


चालू घडामोडी फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇

Current Affairs Test 13.06.2024https://www.tcs9.in/mr/current-affairs-quiz/current-affairs-test-13062024-49


👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://www.tcs9.in/mr


👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://www.tcs9.in/mr


👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं

https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA


👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स

https://t.me/tcs9team


👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा 

https://www.instagram.com/tcs9team/


👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स

https://whatsapp.com/channel/0029VaDVFo0Likg3M3cwVc3C


#antarrashtriyayogadiwas

#maharshipatanjali

#jagtikvarsastale

#history

#maharashtrachaetihas

#mpsc

#upsc

#maharashtrapolicebharti

#maharashtrapolicebharti

#policebhartisyllabus

#policebhartiprashnasanch

#policbharticutoff

#chalughadamodi

#policebhartiprashnsanch

#policebhartipreviousyearquestionpapaer

#policebhartijahirat

#policebharticutoff

#policebhartigr

#gk

#gs

#currentaffairs

#agniveerbharti

#agniveerbhartiSyllabus

#agniveerbharticutoff

current-affair
Important Affairs
21-06-2024

नालंदा विद्यापीठ उद्घाटन

नालंदा विद्यापीठ उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार राज्यातील राजगीर येथिल प्राचीन विद्यापीठाच्या अवशेषांजवळील नवीन नालंदा विद्यापीठ कॅम्पस चे उद्घाटन केले आहे.

NAVIN NALANDA CAMPUS


Subject : GS- प्राचीन इतिहास, जागतिक वारसा स्थळे


 सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न


प्रश्न) नुकत्याच उद्घाटन झालेल्या नालंदा विद्यापीठा संदर्भात बरोबर विधान निवडा.

1. याची स्थापना बिहारमधील गुप्त राजघराण्यातील कुमारगुप्ताने पाचव्या शतकाच्या सुरुवातीस केली होती.

2. 1193 मध्ये तुर्की शासक कुतुबुद्दीन ऐबकाचा सेनापती बख्तियार खिलजीने या विद्यापीठावर आक्रमण करून विद्यापीठ नष्ट केले.

3. नालंदा विद्यापीठाला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा आहे.

4. वरील पैकी सर्व बरोबर

उत्तर : वरील पैकी सर्व बरोबर


नालंदा विद्यापीठाबद्दल थोडक्यात माहिती :

• नालंदा विद्यापीठ भारतीय उपखंडातील सर्वात जुने विद्यापीठ आहे.

• याची स्थापना बिहार मधील गुप्त राजघराण्याचे कुमारगुप्ता यांनी 5 व्या शतकाच्या सुरुवातीला केली होती आणि 12 व्या शतकापर्यंत म्हणजे जवळपास 600 वर्ष या विद्यापीठाची भरभराट होत गेली.

हर्षवर्धन आणि पाल या राजांच्या काळात नालंदा विद्यापीठाची लोकप्रियता शिगेला पोहोचली.

• नालंदा विद्यापीठ हे शिक्षण, संस्कृती आणि बौद्धिक देवाण-घेवाणीचे एक महत्त्वाचे केंद्र होते. 

• नालंदा विद्यापीठाचा भारतीय सभ्यतेच्या विकासावर उल्लेखनीय प्रभाव होता.

• नालंदा विद्यापीठ हे मठसंस्था होती येथे पुरुष भिक्षु आणि महिला भिक्षु राहत आणि अभ्यास करत.

• नालंदा येथील विद्यार्थ्यांना कठोर आचारसंहितेचे पालन करणे अपेक्षित होते आणि त्यांना दैनंदिन ध्यान आणि अभ्यास सत्रांमध्ये भाग घेणे आवश्यक होते.

• येथे बौद्ध धर्मातील सर्व प्रमुख तत्त्वज्ञाने शिकवली जात.

• त्याचबरोबर वैद्यकशास्त्र , प्राचीन भारतीय वैद्यकीय प्रणाली, आयुर्वेद, गणित, व्याकरण, खगोलशास्त्र आणि भारतीय तत्त्वज्ञान यांसारखे विषयही येथे शिकवले जात.

• त्यामुळे येथे चीन, कोरिया, जपान, तिबेट, मंगोलिया, श्रीलंका आणि दक्षिण पूर्व आशियांसारख्या दूरच्या भागातील विद्यार्थी देखील शिक्षणासाठी येत होते.

1193 मध्ये तुर्की शासक कुतुबुद्दीन ऐबकाचा सेनापती बख्तियार खिलजीने या विद्यापीठावर आक्रमण करून विद्यापीठ नष्ट केले.

• पुढे 1812 मध्ये स्कॉटिश सर्वेक्षक फ्रान्सिस बुकानन-हॅमिल्टन याने विद्यापीठाचा शोध लावला.

• यानंतर 1861 मध्ये सर अलेक्झांडर कॅनिंग यांनी हे आशिया खंडातील एक महत्वपूर्ण प्राचीन विद्यापीठ आहे असे आपल्या अभ्यासात मांडले.

• चिनी भिक्षू झ्वेन त्सांग यांनी प्राचीन नालंदाजाच्या शैक्षणिक आणि स्थापत्य कलेच्या भव्यतेबद्दल अनमोल माहिती आपल्या प्रवास वर्णनात दिली आहे.

• नालंदा विद्यापीठाला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा आहे.

UNESCO NALANDA


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न


प्रश्न) नुकत्याच उद्घाटन झालेले नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे ?

1. महाराष्ट्र

2. उत्तर प्रदेश

3. बिहार

4. मध्य प्रदेश

उत्तर : बिहार