
चालू घडामोडी | नवी मुंबई विमानतळ औषध आयातीसाठी अधिकृत बंदर म्हणून अधिसूचित
Navi Mumbai Airport Notified as Port for Drug Import
📚 Subject : GS - अर्थशास्त्र - पायाभूत सुविधा
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने औषध नियम, 1945 च्या नियम 43A मध्ये सुधारणा करून औषध आयातीसाठी नुकतेच खालीलपैकी कोणत्या विमानतळाचा अधिकृत यादीत समावेश केला आहे ?
1. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (महाराष्ट्र)
2. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (उत्तर प्रदेश)
3. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (महाराष्ट्र)
4. दाबोलिम आंतरराष्ट्रीय विमानतळ (गोवा)
उत्तर : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (महाराष्ट्र)
📰 बातमी काय ?
• केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने औषध नियम, 1945' (Drugs Rules, 1945) अंतर्गत महाराष्ट्रातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai Airport) औषधांच्या अधिकृत आयातीसाठी (Import of Drugs) नियुक्त बंदर म्हणून अधिसूचित केले आहे.
• औषध क्षेत्रातील लॉजिस्टिक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार अधिक गतिमान करणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.

🤔 औषधांची आयातीसाठी एखादे ठिकाण 'अधिसूचित बंदर' (Designated Port of Entry) म्हणून घोषित करणे का अनिवार्य असते ?
• परदेशातून येणाऱ्या औषधांची आयात कोणत्याही सामान्य विमानतळावरून किंवा बंदरावरून थेट करता येत नाही; त्यासाठी शासनाने ते ठिकाण 'अधिसूचित बंदर' (Designated Port of Entry) म्हणून घोषित करणे अनिवार्य असते.
• विमानतळावर पुरेशी तपासणी यंत्रणा, औषध निरीक्षक (Inspectors), मान्यताप्राप्त प्रयोगशाळा आणि कोल्ड-स्टोरेज सुविधा असल्याशिवाय औषधांची सुरक्षित आयात शक्य नसते; म्हणून केंद्र सरकारकडून अशा विमानतळाला 'अधिकृत आयात बंदर' (Designated Port) म्हणून अधिसूचित करणे कायदेशीररीत्या आवश्यक असते.
🧐 अधिसूचना आणि वैधानिक पार्श्वभूमी (Legal Framework & Notification) :
1) नियमात सुधारणा (Rule 43A Amendment):
• केंद्र सरकारने औषध नियम, 1945 च्या नियम 43A (Rule 43A) मध्ये दुरुस्ती करून अधिकृत विमानतळांच्या यादीत नवी मुंबई विमानतळाचा समावेश केला आहे.
2) जारी करणारे प्राधिकरण व सल्लागार मंडळ:
• ही अधिसूचना औषध आणि सौंदर्यप्रसाधने कायदा, 1940 (Drugs and Cosmetics Act, 1940) अंतर्गत औषध तांत्रिक सल्लागार मंडळाच्या (DTAB - Drugs Technical Advisory Board) सल्ल्याने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केली आहे.
3) एकूण अधिकृत बंदरांची संख्या:
• नवी मुंबई विमानतळाच्या समावेशानंतर आता देशभरात औषध आयातीसाठी अधिसूचित असलेल्या एकूण प्रवेश बंदरांची (Ports of Entry) संख्या वाढून 42 झाली आहे.
🎯 महत्त्व आणि अपेक्षित परिणाम (Significance & Objectives)
• फार्मा लॉजिस्टिकला गती - परदेशातून येणाऱ्या औषधांच्या साठ्याची (Pharma Consignments) वाहतूक आणि हाताळणी अधिक सुलभ व जलद गतीने होईल.
• व्यापार सुलभता (Ease of Doing Business) - औषध आयातदारांना पर्याय उपलब्ध होऊन मुंबई विमानतळावरील लॉजिस्टिक ताण कमी होईल, ज्यामुळे आयात प्रक्रियेत अधिक लवचिकता येईल.
• महाराष्ट्राचे स्थान बळकट - देशाच्या औषध निर्मितीमध्ये आणि निर्यातीत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातील औषध उद्योग परिसंस्थेला (Pharma Ecosystem) याचा मोठा फायदा होईल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Navi Mumbai Airport Drug Import Port
• नवीन अधिसूचित विमानतळ → नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (महाराष्ट्र)
• सुधारणा केलेला नियम → औषध नियम, 1945 चा नियम 43A
• सल्लागार संस्था → औषध तांत्रिक सल्लागार मंडळ
• औषध आयातीसाठी भारतातील एकूण बंदरे → 42 बंदरे
• जारी करणारे मंत्रालय → केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
























