
चालू घडामोडी 7, सप्टेंबर 2024

पंतप्रधानांचा सिंगापूर दौरा
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लॉरेन्स वोंग यांची भेट घेतली ते कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे ?
1. ब्रुनेई
2. सिंगापूर
3. जपान
4. मलेशिया
उत्तर : सिंगापूर

पंतप्रधानांचा अलीकडील सिंगापूर दौरा हा जागतिक सेमीकंडक्टर उद्योगात भारताला एक प्रमुख खेळाडू बनण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
भारत आणि सिंगापूर मध्ये 4 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या, ते करार पुढीलप्रमाणे :
1. डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य
2. भारत-सिंगापूर सेमीकंडक्टर इकोसिस्टम भागीदारी
3. आरोग्य आणि औषधांच्या क्षेत्रात सहकार्य
4. शैक्षणिक सहकार्य आणि कौशल्य विकास
सिंगापूर बद्दल थोडक्यात माहिती :
• हे दक्षिण आशियातील एक बेट राष्ट्र आहे.
• यात एक मुख्य बेट आणि 63 लहान बेटांचा समावेश आहे.
• कोणतीही नैसर्गिक संसाधने नसतानाही, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि जागतिकीकरणावर आधारित सिंगापूरने मजबूत अर्थव्यवस्था बनवली आहे.
• सिंगापूर हे विमान वाहतूक, वित्त (Finance) आणि शिपिंगचे केंद्र आहे.
• लॉरेन्स वोंग हे सिंगापूर चे वर्तमान पंतप्रधान आहेत.
इंटरपोल
INTERPOL
बातम्यांमध्ये : सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) प्रमुखांनी अलीकडेच जाहीर केले की इंटरपोलने भारताच्या विनंतीवरून गेल्या वर्षी विक्रमी 100 रेड नोटीस जारी केल्या होत्या, जे आतापर्यंतचे सर्वाधिक आहे.
Subject : GS
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे ?
1. भारत
2. संयुक्त अमेरिका
3. स्वित्झर्लंड
4. फ्रान्स
उत्तर : फ्रान्स

इंटरपोल म्हणजे काय ?
• आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (International Criminal Police Organization -INTERPOL), सामान्यत: इंटरपोल म्हणून ओळखली जाते.
• ही एक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय संस्था आहे.
• ही सीमापार दहशतवाद, तस्करी आणि इतर गुन्ह्यांविरुद्ध आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्याची सुविधा देणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे.
• ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे, जी 195 सदस्य देशांचे प्रतिनिधित्व करते.
• मुख्यालय : इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्समधील ल्योन (Lyon) आहे.
इंटरपोल नोटीसचे किती प्रकार असतात आणि त्यांचा अर्थ काय असतो ?
• रेड नोटीस - एखाद्या व्यक्तीचे प्रत्यार्पण करण्याच्या दृष्टीकोनातून न्यायिक अधिकार क्षेत्र, खटला चालवण्यासाठी वा शिक्षा भोगण्यासाठी 'वाँटेड' असणाऱ्या व्यक्तीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी.
• ब्लू नोटीस - एखाद्या गुन्ह्याच्या तपासामध्ये महत्त्वाच्या व्यक्तीबद्दलची माहिती, तिची ओळख पटवणं आणि ती कुठे आहे ते लोकेशन शोधणं यासाठी ही नोटीस काढली जाते.
• यलो नोटीस - हरवलेल्या व्यक्तींचा शोध, बहुतेकदा 18 वर्षांखालील मुलं, किंवा मग अशा व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी जे स्वतःची ओळख सांगू शकत नाहीत.
• पर्पल नोटीस - गुन्हेगारांद्वारे वापरण्यात येणाऱ्या कार्यपद्धती - Modus Operandi, वस्तू,उपकरणं आणि लपण्याच्या पद्धतींबद्दलची माहिती देण्यासाठी वा मिळवण्यासाठी.
• ग्रीन नोटीस - एखादी व्यक्ती सार्वजनिक सुरक्षेसाठी धोका ठरण्याची शक्यता असल्यास तिच्या गुन्हेगारी कारवायांबद्दलचा इशारा देण्यासाठी.
• ऑरेंज नोटीस - सार्वजनिक सुरक्षिततेसाठी गंभीर आणि अगदी स्पष्टपणे धोका ठरू शकेल अशा घटना, व्यक्ती, वस्तू वा प्रक्रियेबद्दलचा इशारा देण्यासाठी.
• ब्लॅक नोटीस - ओळख न पटलेल्या मृतदेहांबद्दलची माहिती मिळवण्यासाठी.
• इंटरपोल - युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काऊन्सिल स्पेशल नोटीस - संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीचं (Sanctions Committee) लक्ष्य असणाऱ्या व्यक्ती वा संघटनांबाबत ही नोटीस काढली जाते.
( नोट : सगळ पाठ करत बसू नका फक्त एकदा वाचून घ्या
जर प्रश्न आला रेड नोटीस, ब्लू नोटीस कशा संदर्भात आहे तर इंटरपोल संदर्भात.)
पॅरिस पॅरालिंपिक 2024 मध्ये हरविंदर सिंगने जिंकले सुवर्ण पदक
Subject : GS - खेळ
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये हरविंदर सिंगने तिरंदाजीत सुवर्ण पदक जिंकले ते कोणत्या राज्याचे रहिवासी आहे ?
1. हरियाणा
2. पंजाब
3. राजस्थान
4. उत्तर प्रदेश
उत्तर : हरियाणा

• हरविंदर सिंगने रिकर्व्ह तिरंदाजीत सुवर्णपदक पटकावले.
• पॅरा तिरंदाजीमध्ये भारताचं हे पहिलंच सुवर्णपदक ठरलं आहे.
• हरविंदरनं पॅरा तिरंदाजीच्या रिकर्व्ह प्रकारात पुरुष एकेरीमध्ये पोलंडच्या लुकास सिझेकवर 6-0 अशी मात केली.
• हरविंदर सिंग हरियाणाचा रहिवासी आहे.
• अवघ्या दीड वर्षांचा असताना त्याला डेंग्यू झाला होता. उपचारासाठी इंजेक्शन्स घ्यावी लागली. साईड इफेक्ट्समुळे त्याच्या पायातली ताकद गेली.
पॅरिस पॅरालिंपिक 2024 मध्ये सुमित अंतिलने जिंकले सुवर्ण पदक
Subject : GS - खेळ
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये सुमित अंतिलने सुवर्णपदक जिंकले आहे ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
1. भालाफेक
2. तिरंदाजी
3. टेनिस
4. गोळाफेक
उत्तर : भालाफेक

• भारताच्या सुमित अंतिलनं पुरुषांच्या जॅवलिन थ्रो F64 प्रकारात 70.59 मीटरवर भालाफेकून सुवर्णपदक मिळवलं.
• यापूर्वी टोकियो पॅरालिंपिकमध्येही सुमितनं सुवर्णपदक जिंकलं होतं.
• सलग दोन पॅरालिंपिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकून त्यांनी इतिहास रचला.
• पॅरिसमध्ये सुमित अंतिल भारताचा ध्वजवाहकही होता.
• सुमित हरियाणातल्या सोनीपतचा रहिवासी आहे.
• कोचिंग क्लासवरून येत असताना वाटेत झालेल्या अपघातात त्यानी आपला पाय गमावला होता.