
महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन
• सर्वांना महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
• दरवर्षी 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
• आजच्या लेखात महाराष्ट्र दिनाबद्दल माहिती , महाराष्ट्र दिन का साजरी केला जातो ?
महाराष्ट्र दिनाचा इतिहास काय ? तसेच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र दिन आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि त्याबद्दल चे प्रश्न आपण बघणार आहोत.
स्वातंत्र्यानंतर राज्यांची निर्मिती
• राज्य पुनर्गठण अधिनियम, 1956 अंतर्गत देशात संबंधित राज्य किंवा त्या क्षेत्रातील बोलीभाषा, संस्कृती आणि परंपरा इत्यादी बाबींच्या आधारावर राज्यांची निर्मिती करण्यात आली.
• परंतु मुंबई राज्यात मराठी आणि गुजराती भाषिक लोक राहत असल्यामुळे मुंबई नेमकी महाराष्ट्रात की गुजरात मध्ये सामील करावी यासाठी रस्सीखेच सुरू झाली.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ :
• 28 जुलै 1946 रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली.
• मुंबई येथील या परिषदेतच संयुक्त महाराष्ट्र सभेची (परिषदेची) स्थापना झाली.

मुंबई पुनर्रचना कायदा - 1960 :
• एप्रिल 1960 मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला.
• केंद्र सरकारने महाराष्ट्र व गुजरात या दोन भाषावार प्रांतरचनेस मंजुरी दिली.
• या कायद्यांतर्गत महाराष्ट्रात मुंबई आली आणि डांगचा प्रदेश आणि 20 खेडी गुजरातकडे देण्यात आली.
• 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची निर्मिती झाली.
महाराष्ट्र राज्य निर्मिती : 1 मे 1960
• मुंबईच्या शिवाजी पार्कवर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची घोषणा करण्यात आली.
• महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन धनंजयराव गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.
• 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात 4 विभागात 26 जिल्हे होते.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे काही महत्त्वाचे वन लाइनर पॉईंट्स :
• संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या 106 सुपुत्रांचे " हुतात्म स्मारक " मुंबई येथील फ्लोरो फाउंटन (चौकाचे जुने नाव )जवळ उभारले गेले.
• संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रेरणा गीत " माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली " ही लावणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली आहे.

सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण वनलाइनर प्रश्न
प्रश्न ) संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली ?
( MPSC ASO - 2013 )
A. मुंबई
B. पुणे
C. मराठवाडा
D. बेळगाव
उत्तर : मुंबई
28 जुलै 1946 रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली.
मुंबई येथील या परिषदेतच संयुक्त महाराष्ट्र सभेची (परिषदेची) स्थापना झाली.
प्रश्न ) 1 मे 1960 रोजी 'महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचे' उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले
(MPSC 2017)
A. यशवंतराव चव्हाण
B. बाळासाहेब खेर
C. विठ्ठलराव गाडगीळ
D. धनंजयराव गाडगीळ
उत्तर : धनंजयराव गाडगीळ
• मुंबईच्या शिवाजी पार्कवर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची घोषणा करण्यात आली.
• महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन धनंजयराव गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.
• 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात 4 विभागात 26 जिल्हे होते.
प्रश्न ) " माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली " या गीताची रचना कोणी केली ?
उत्तर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रेरणा गीत " माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली " ही लावणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली आहे.
चालू घडामोडी फ्री टेस्ट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇
Important Affair Test २२.०१.२४
https://www.tcs9.in/mr/current-affairs-quiz/important-affair-test-24
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇👇
14 वा राष्ट्रीय मतदार दिवस (NVD)
https://www.tcs9.in/mr/current-affairs/14-va-rasriya-matadara-divasa-nvd
👉 महत्त्वाच्या चालू घडामोडी नोट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 फ्री चालू घडामोडी टेस्ट (करंट अफेर टेस्ट) सॉल्व करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 tcs9 च्या YouTube ला जॉईन करा आणि जाणून घ्या महत्त्वाच्या चालू घडामोडीं
https://www.youtube.com/channel/UC9J9JHMTiJ8O76zeqbHSTmA
👉 tcs9 टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
👉 tcs9 च्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करण्यासाठी आणि नवीन अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/tcs9team/
👉 tcs9 Whatsapp चॅनेल ला जॉईन व्हा आणि मिळवा नवीन नवीन अपडेट्स
https://whatsapp.com/channel/0029VaDVFo0Likg3M3cwVc3C
# maharashtradinmahiti
#maharashtrapolicebharti
#maharashtrapolicebharti
#policebhartisyllabus
#policebhartiprashnasanch
#policbharticutoff
#chalughadamodi
#policebhartiprashnsanch
#policebhartipreviousyearquestionpapaer
#policebhartijahirat
#policebharticutoff
#policebhartigr
#gk
#gs
#currentaffairs
#agniveerbharti
#agniveerbhartiSyllabus
#agniveerbharticutoff