
चालू घडामोडी 26, डिसेंबर 2024 | कोणत्या राज्यांना मिळाले नविन राज्यपाल ?

कोणत्या राज्यांना मिळाले नविन राज्यपाल ?
President Droupadi Murmu has appointed new governors
बातमी काय आहे ?
अलीकडेच, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. तर तीन राज्यांच्या विद्यमान राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
Subject : GS- राज्यशास्त्र : राज्यपाल, नियुक्ती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मणिपूरचे नवीन राज्यपाल म्हणून खालील पैकी कोणाची नियुक्ती केली आहे ?
1. श्री अजय कुमार भल्ला
2. श्री हरिभाऊ बागडे
3. श्री सी.पी. राधाकृष्णन
4. श्री राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर
उत्तर : श्री अजय कुमार भल्ला (Shri Ajay Kumar Bhalla)
राष्ट्रपतींना खालील राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत :
• मणिपूर : माजी केंद्रीय गृहसचिव श्री अजय कुमार भल्ला (Shri Ajay Kumar Bhalla) यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
• मिझोराम : माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के सिंग (General Vijay Kumar Singh) यांना मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
• बिहार : श्री आरिफ मोहम्मद खान (Shri Arif Mohammed Khan) यांची बिहारचे नविन राज्यपाल असतील.
• केरळ : श्री राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर (Shri Rajendra Vishwanath Arlekar) यांची केरळचे नविन राज्यपाल असतील.
• ओडिशा : डॉ. हरी बाबू कंभामपती ( Dr Hari Babu Kambhampati) हे ओडिशाचे नविन राज्यपाल असतील.

राज्याच्या राज्यपालांशी संबंधित घटनात्मक तरतुदी :
• राज्यपाल हे घटक राज्याच्या कार्यकारी मंडळाचे प्रमुख व राज्य विधिमंडळाचे अंग असतात.
• राज्यपाल हे राज्यस्तरावर नामधारी प्रमुख आहेत तर मुख्यमंत्री हे वास्तव कार्यकारी प्रमुख आहेत.
• कलम 153 : नुसार प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल.
‣ 7 वी घटना दुरुस्ती कायदा, 1956 ने एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांकरीता राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यास संमती प्रदान करण्यात आली आहे.
• कलम 154 : नुसार राज्याचा कार्यकारी अधिकार राज्यपालाच्या हाती असेल.
• कलम 155 : राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपतीं मार्फत केली जाईल.
• कलम 156 : राज्यपालाचा पदावधी
‣ राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पद धारण करतात.
‣ साधारणता राज्यपालांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो.
कलम 157 : राज्यपाल पदासाठी पात्रता
‣ राज्यपाल हे भारतीय नागरिक असावे,
‣ त्यांचे वय 35 वर्षे पूर्ण असावे.
कलम 158 : राज्यपाल पदाच्या शर्ती
‣ राज्यपाल संसद किंवा राज्य विधिमंडळाचे सदस्य असणार नाही.
‣ राज्यपाल कोणतेही लाभाचे पद धारण करणार नाही.
कलम 159 : शपथ व प्रतिज्ञा
‣ उच्च न्यायालयाचे (हायकोर्टचे) मुख्य न्यायाधीश किंवा त्यांच्या गैरहजेरीत ज्येष्ठतम न्यायाधीश राज्यपालांना शपथ देतात.
कलम 161 : न्याय विषयक ( क्षमादान करण्याचा) अधिकार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता----- यांच्याकडे देण्यात आली आहे.
(MPSC गट 2022, महाराष्ट्र पोलीस भरती, SSC GD)
1. मुख्यमंत्री
2. मंत्रिमंडळ
3. राज्यपाल
4. यापैकी नाही
उत्तर : राज्यपाल
प्रश्न) राज्यपाल खालील पैकी कोणाच्या समक्ष राज्यपाल पदाची शपथ घेतात ?
1. राष्ट्रपती
2. मुख्यमंत्री
3. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
4. निवडणूक आयोग
उत्तर : उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश