
चालू घडामोडी 25, डिसेंबर 2024 | सुशासन दिन | Good Governance Day

सुशासन दिन
Good Governance Day
Subject : GS - दिनविशेष, भारताचे पंतप्रधान, व्यक्ती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी 25 डिसेंबर हा दिवस सुशासन दिन म्हणून खालील पैकी कोणाच्या सन्मानार्थ साजरी करतात ?
1. पंडीत जवाहरलाल नेहरू
2. श्री राजीव गांधी
3. श्री अटलबिहारी वाजपेयी
4. श्री नरेंद्र मोदी
उत्तर : श्री अटलबिहारी वाजपेयी
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 25 डिसेंबर हा दिवस सुशासन दिन (Good Governance Day) म्हणून साजरा करण्यात येतो.
सुशासन म्हणजे काय ?
• शासन ही निर्णय घेण्याची आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया आहे.
• तर सुशासन म्हणजे देशाच्या आर्थिक आणि सामाजिक संसाधनांचे व्यवस्थापन करण्यासाठी सत्तेचा योग्य आणि प्रभावी वापर.
• स्वतंत्र न्यायपालिका, माहिती व पारदर्शकता, निपक्षपातीपणा, समानतेवर आधरित कायदे आणि कायद्याचे राज्य म्हणजे सुशासन.
• देशातील नागरिकांसाठी प्रशासन हे सुशासनाच्या पायावर आधारित असले पाहिजे.
• कौटिल्यांच्या अर्थशास्त्रात सुद्धा, राजाच्या भूमिकेत लोकांचे कल्याण हे सर्वोत्कृष्ट मानले गेले.
सुशासन दिन केव्हा पासून साजरी करण्यात येतो ?
2014 मध्ये केंद्र सरकारने जाहीर केले की 25 डिसेंबर हा दिवस “सुशासन दिन” म्हणून साजरा केला जाईल.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• अटल बिहारी वाजपेयी हे एक स्वातंत्र्य सेनानी, ज्येष्ठ भारतीय नेते, निष्णात राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, कवी, साहित्यिक, पत्रकार होते ते खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.
• त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी तत्कालीन ग्वालियर संस्थान (आताच्या मध्यप्रदेश राज्यात) झाला.
• 1942 मधील भारत छोडो चळवळीमध्ये विद्यार्थीदशेतच त्यांनी सहभागी होऊन स्वातंत्र्य चळवळीतील आपले योगदान दिले.
• श्री. अटल बिहारी वाजपेयी 9 वेळा लोकसभेवर तर 2 वेळा राज्यसभेवर निवडून आले होते.
भारताचे पंतप्रधान :
श्री. अटल बिहारी वाजपेयी 3 वेळा भारताचे पंतप्रधान होते.
1996 : ते भारताचे पहिले भाजपचे पंतप्रधान बनले परंतु त्यांनी केवळ 13 दिवस काम केले, बहुमत मिळवण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी राजीनामा दिला.
1998-1999 : श्री. अटल बिहारी वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले. या वेळी त्यांनी 13 महिने चाललेल्या आघाडी सरकारचे नेतृत्व केले.
श्री. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारताने ऐतिहासिक
पोखरण-II अणुचाचण्या घेतल्या आणि अणुशक्ती म्हणून भारताची जगाला
पुन्हा एकदा ओळख करून दिली.
1999-2004 : श्री. अटल बिहारी वाजपेयी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान बनले.
राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांसारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे योगदान दिले.
पुरस्कार आणि सन्मान :
• 1994 साली श्री. अटल बिहारी वाजपेयी यांना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार देण्यात आला.
• 1992 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार
• 2014 मध्ये भारतरत्न, या सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.
निधन :
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट 2018 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी नवी दिल्ली येथे निधन झाले.