
चालू घडामोडी 26, ऑगस्ट 2024

भारतीय लष्कर आणि महाराष्ट्र पोलिसांचा संयुक्त सराव
" फोर्स वन " काय आहे ?
Subject : GS - महाराष्ट्र पोलीस
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) Force One काय आहे ?
(महाराष्ट्र पोलीस भरती नागपूर कारागृह 2021)
1. राष्ट्राध्यक्ष विमान
2. पंतप्रधानांचे विमान
3. महाराष्ट्र पोलीस कमांडो बल
4. सशस्त्र सीमा बल
उत्तर : महाराष्ट्र पोलीस कमांडो बल
• भारतीय लष्कर आणि महाराष्ट्र पोलीस दलाने त्यांच्या कार्यपद्धतींचा समन्वय साधण्यासाठी आणि ऑपरेशन तयारी वाढवण्यासाठी संयुक्त सराव केला.
• या संयुक्त सरावात लष्कराच्या 15 आसाम रेजिमेंटचा आणि महाराष्ट्र पोलीसांचे फोर्स वन दलाचा समावेश होता.
![[ force one, maharashtra police commando bal, assam regiment anni maharashtra policechanche force one, 2008 mumbai dahastvadi hallyacha pratyiuttar mhanun force one chi stapna keli, force one che mukhyalay goregaon mumbai yete ahe, shri krushna prakash sir ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Force_One_1724940312410.webp)
" फोर्स वन " काय आहे ?
फोर्स वनची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• " फोर्स वन " मुंबई पोलिसांचे एक विशेष दहशतवादविरोधी युनिट आहे.
• फोर्स वन च्या जबाबदारीचे प्राथमिक क्षेत्र मुंबई आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशाचे संरक्षण करणे हे आहे.
• 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाला.
• 2008 च्या या मुंबई दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र पोलिसांच्या अंतर्गत " फोर्स वन " दलाची स्थापना करण्यात आली.
• फोर्स वन ची रचना राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) प्रमाणे आहे हे महाराष्ट्राचे कमांडो पथक आहे.
• 26 नोव्हेंबर 2010 पासून फोर्स वन दल कार्यान्वित करण्यात आले .
• मुख्यालय : फोर्स वनचे मुख्यालय गोरेगाव (मुंबई) येथे आहे.
भर्ती आणि प्रशिक्षण
• फोर्स वनसाठी भरती महाराष्ट्र पोलिसांच्या तरुण स्वयंसेवकांमध्ये केली जाते जे आधीच चांगले प्रशिक्षित आहेत.
• एकूण अर्जदारांपैकी फक्त 4 ते 5 टक्केच यशस्वी होतात.
• फोर्स वनच्या कमांडोना महाराष्ट्र इंटेलिजन्स अकादमी, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग , पुणे आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) येथे अत्याधुनिक शस्त्रे आणि स्फोटके वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाते
विशेषज्ञ अधिकार क्षेत्र
• दहशतवादविरोधी, विशेष शस्त्रे ऑपरेशन्स करणे.
• आंतरराष्ट्रीय स्तरावर संरक्षित व्यक्ती, इतर अत्यंत महत्त्वाच्या व्यक्ती आणि/किंवा महत्त्वाच्या राज्य मालमत्तेचे संरक्षण करणे.
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) महाराष्ट्र पोलीस " फोर्स वन " दलाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर : श्री कृष्ण प्रकाश सर
जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा
World's Second Largest Diamond
Subject : GS - महाराष्ट्र पोलीस
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा कोणत्या देशात सापडला ?
1. बोत्सवाना
2. वेस्ट इंडिज
3. पेरू
4. इजिप्त
उत्तर : बोत्सवाना
![[ jagatil dusra motha hira, botswana, 2492 carat vajan ahe hiryache, hiryachi kimmat 40 Million Dollar, africa khand, rajdhani gaborone, kalahari valvante, botswana ha jagatil sarvaat motha hira utpadak desh ahe, kalinan ha jagatil sarvaat motha hira ahe, 1905 madhe 3106 carat vajnacha ahe kalinan hira ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/2nd_Largest_Diamond_1724940353875.webp)
• बोत्सवाना या देशातील खाणीमधून जगातील दुसरा सर्वांत मोठा हिरा सापडला आहे.
• हा हिरा तब्बल 2492 कॅरट वजनाचा आहे.
• कॅनडाच्या लुकारा डायमंड फर्मच्या मालकीची ही खाण असून या खाणीतून हा हिरा शोधून काढण्यात आला आहे.
• या हिऱ्याची अंदाजे किमत 40 मिलियन डॉलर (3,35,88,50,000 रूपये) पेक्षा जास्त असल्याचं सांगण्यात येतंय.
• लुकारा डायमंड फर्मच्या मेगा डायमंड रिकव्हरी एक्स-रे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हा हिरा शोधन्यात आला.
• या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे क्रशिंग प्रक्रियेदरम्यान हिरा तुटण्याची शक्यता कमी असते.
बोत्सवाना देश (Botswana) :
• बोत्सवाना हा देश आफ्रिका खंडात असून याची राजधानी गॅबोरोनी (Gaborone) आहे.
• बोत्सवानाचा ७० टक्के भाग कालाहारी वाळवंटाने व्यापला आहे.
• बोत्सवाना हा जगातील सर्वात मोठा हिरा उत्पादक देश असून जगातल्या एकूण हिऱ्याच्या उत्पादनापैकी 20 टक्के उत्पादन एकट्या बोत्सवानामध्ये केलं जातं.
तर मग जगातील सर्वांत मोठा हिरा कोणता ?
• कलिनन हा जगातील सर्वांत मोठा हिरा आहे.
• 1905 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या एका खाणीत 3106 कॅरेट वजनाचा हा हिरा सापडला होता.
• त्याचे नऊ तुकडे करून त्यापैकी काही हिऱ्याचे तुकडे हे ब्रिटिश शाही क्राऊनमध्ये लावण्यात आले आहेत.