
चालू घडामोडी 21, ऑगस्ट 2024 | ओमकारेश्वर तरंगता सौर प्रकल्प | पुरंदर अंजीर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोलंड भेट | कोल्हापूरचं पोलंड कनेक्शन !!

ओमकारेश्वर तरंगता सौर प्रकल्प
Omkareshwar Floating Solar Project
Subject : GS - पर्यावरण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ओमकारेश्वर तरंगता सौर प्रकल्प कोणत्या नदीच्या धरणावर आहे ?
1. गंगा
2. यमुना
3. गोदावरी
4. नर्मदा
उत्तर : नर्मदा

• ओमकारेश्वर तरंगता सौर प्रकल्प मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर येथे आहे.
• हा तरंगता सौर प्रकल्प ओंकारेश्वर धरणावर विकसित केला आहे.
• ओंकारेश्वर धरण नर्मदा नदीवरील गुरुत्वाकर्षण धरण आहे.
• ओंकारेश्वर तरंगता सौर प्रकल्प 646 कोटी रुपयांची गुंतवणूक करून उभारण्यात आला आहे.
• केंद्रीय अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत विकसित केलेले , हे भारतातील सर्वात मोठे सौर उद्यान आहे.
• ओंकारेश्वर तरंगता सौर प्रकल्प मध्य आणि उत्तर भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प आहे.
• ओंकारेश्वर तरंगता सौर प्रकल्पात 90 मेगावॅट ऊर्जा निर्मितीची क्षमता आहे.
• ओंकारेश्वर तरंगता सौर प्रकल्प ऑपरेशनच्या सुरुवातीच्या वर्षात 196.5 दशलक्ष युनिट आणि 25 वर्षांमध्ये एकत्रित 4,629.3 दशलक्ष युनिट वीज निर्मितीचा अंदाज आहे.
• कार्यान्वित केल्यावर, हा प्रकल्प 2.3 लाख टन कार्बन उत्सर्जन कमी करेल आणि 2070 पर्यंत भारत सरकारच्या शून्य कार्बन उत्सर्जनाच्या (Net Zero Carbon Emissions) मोहिमेत लक्षणीय योगदान देईल.
• या प्रकल्पामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन जलसंधारणातही मदत होणार आहे.
(नोट : भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प तेलंगणातील रामागुंडम येथे आहे याची क्षमता 100 मेगावॅट आहे.)
शून्य कार्बन उत्सर्जन म्हणजे काय ?
• आपल्या देशात जेवढ्या प्रमाणात कार्बनचे उत्सर्जन होत असेल तितक्याच प्रमाणात विविध माध्यमातून कार्बनचे शोषण केलं जात असेल तर त्याला नेट झिरो किंवा शून्य कार्बन उत्सर्जन असं म्हटलं जातं.
• म्हणजे एखादा देश जेवढं कार्बन उत्सर्जित करतोय तितकाच शोषून घेतोय.
• उत्सर्जित होणारा कार्बन वातावरणात मिसळत नाही, तो पुन्हा मातीमध्ये पोहोचवला जातो.
पुरंदर अंजीर | Purandar Figs
Subject : GS - भौगोलिक संकेतांक (GI Tag)
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) GI टॅग असलेल्या पुरंदर अंजीरापासून बनवलेला भारतातील पहिला तयार अंजीर रस (ज्युस) नुकताच कोणत्या देशात निर्यात करण्यात आला ?
1. पोलंड
2. अमेरिका
3. रशिया
4. फ्रान्स
उत्तर : पोलंड

पुरंदर अंजीरा बद्दल थोडक्यात माहिती :
• पुरंदरचे अंजीर हे भारतातील उत्कृष्ट अंजीरांपैकी एक म्हणून ओळखले जाते.
• महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील अनेक गावांमध्ये याची लागवड केली जाते.
• 2016 मध्ये पुरंदर अंजीराला GI टॅग देण्यात आला.
GI टॅग मिळालेले पुरंदर अंजीर एवढं खास का आहे ?
• पुरंदर अंजीर त्यांच्या गोड चव, आकार आणि पौष्टिक फायद्यांसाठी ओळखली जाते.
• पुरंदर अंजीर जांभळा रंगाचे आहे आणि इतर जातींपेक्षा आकाराने मोठे आहे.
• हे अंजीर जीवनसत्त्वे आणि खनिजांचा समृद्ध स्रोत आहे.
पुरंदर अंजीर लागवडीसाठी योग्य हवामान :
• पुरंदर अंजीर लागवडीसाठी कोरडे हवामान, डोंगर उतार, पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम जमीन यासारखे कृषी हवामान घटक आवश्यक आहेत.
• पुरंदरमध्ये लाल आणि काळी माती आहे ज्यात कॅल्शियम आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त आहे, जे अंजीरच्या जांभळा रंग आणि मोठ्या आकारासाठी जबाबदार आहे.
भौगोलिक संकेतांक म्हणजे काय ?
GI Tag (Geographical Indication)
• एखाद्या भागातील वस्तू किंवा पदार्थ ही त्या भागाचं वैशिष्ट्य असल्यास त्यास भौगोलिक संकेतांक म्हणजेच GI टॅग देण्यात येतो.
• Geographical Indication of goods (Registration and Protection) Act, 1999 हा कायदा भारतातील वस्तूंची संबंधित भौगोलिक संकेतांची नोंदणी आणि उत्तम संरक्षण करण्यास प्रयत्न करतो.
• 2004 मध्ये दार्जिलिंग टी (दार्जिलिंग चहा) GI टॅग मिळवणारा पहिले भारतीय उत्पादन होते.
GI टॅग असणारे महाराष्ट्रातील काही उत्पादक :
• सोलापुरी चादर, पुणेरी पगडी, कोल्हापुरी चप्पल, पुरंदर अंजीर, मराठवाडा केसर आंबा, नाशिकचे द्राक्ष, नाशिक व्हॅली वाईन, वारली चित्रकला इत्यादी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोलंड भेट
कोल्हापूरचं पोलंड कनेक्शन !!
बातम्यांमध्ये : पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंड आणि युक्रेन दौऱ्यासाठी रवाना झाले. गेल्या ४५ वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांची पोलंडची ही पहिली भेट असेल.
Subject : GS - भूगोल
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पोलंड देशाची राजधानी कोणती आहे ?
1. मोस्को
2. कीव
3. पॅरिस
4. वॅारसॅा
उत्तर : वॅारसॅा

पोलंड देशाबद्दल थोडक्यात माहिती :
• पोलंड हा युरोप खंडातील एक देश आहे.
• राजधानी : वॅारसॅा ( Warsaw) ही पोलंडची राजधानी आहे.
• पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क (Donald Tusk)
• जगात सर्वाधिक गंधकाचे साठे पोलंड देशात आहे.
कोल्हापूरचं पोलंड कनेक्शन काय आहे ?
• 1 सप्टेंबर १९३९ रोजी पोलंडवर हल्ला करून जर्मनीचा हुकूमशहा हिटलरने दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात केली.
• हिटलरने या देशातील ज्यू धर्मियांना गॅस चेंबरमध्ये डांबून ठार मारले होते.
• दुसऱ्या महायुद्धाच्या काळात येथिल लोकांना हा देश सोडून जावं लागलं.
• या वेळेत कोल्हापूरच्या राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर संस्थानानं पोलंडमधून विस्थापित झालेल्या पोलिश नागरिकांना वळीवडे या गावी सुरक्षित आश्रयाची सोय करून दिली होती.
• आजही पोलंड मधील नागरिकांमध्ये वळीवडे आणि भारताबद्दल आदराचे स्थान आहे.
• पोलंडने वॅारसॅा येथे राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाचा मानवतावादी दृष्टिकोन गौरवित करणारे स्मारक उभारले आहे.