जागतिक आदिवासी दिवस | World Tribal Day | International Day of World’s Indigenous Peoples
जागतिक आदिवासी दिवस | World Tribal Day | International Day of World’s Indigenous Peoples
Subject : GS - राज्यशास्त्र
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD , MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जागतिक आदिवासी दिवस केव्हा साजरी करतात ?
1. 12 जुलै
2. 9 ऑगस्ट
3. 14 सप्टेंबर
4. 11 नोव्हेंबर
उत्तर : 9 ऑगस्ट
जागतिक आदिवासी दिवस का साजरी करतात ?
• आदिवासी जनतेच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो.
• जगभरात राहणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांची संस्कृती, भाषा आणि अस्तित्व वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस साजरा केला जातो.
• संयुक्त राष्ट्र महासभेने डिसेंबर 1994 मध्ये 'आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस' साजरा करण्याचा ठराव मंजूर केल्यापासून दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला जातो.
• आदिवासी लोकांना स्थानिक किंवा मूळ लोक असेही म्हणतात.
• आदिवासी हा शब्द आदि आणि वासी या दोन शब्दांपासून तयार झालेला याचा अर्थ आधीपासून येथे राहत असलेला समाज.
• त्यांच्याकडे अद्वितीय संस्कृती, परंपरा, भाषा आणि श्रद्धा आहेत ज्या त्यांना बाकीच्या लोकसंख्येपासून वेगळे करतात.
• युनायटेड नेशन्सच्या माहितीनुसार, जगभरात 476 दशलक्षाहून अधिक स्थानिक लोक 90 देशांमध्ये राहतात.
• 2011 च्या जनगणनेनुसार , भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 8.6% आदिवासी लोक भारतात आहे.
• भारतीय राज्यघटनेत त्यांचा अनुसूचित जमाती ( ST म्हणजे Schedule Tribe) असा उल्लेख केला आहे.
• भारतीय राज्यघटनेत आदिवासी लोकांच्या हितसंवर्धनासाठी तसेच शिक्षण, नोकरी इत्यादी क्षेत्रांमध्ये प्रतिनिधित्वासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे.
उदाहरणार्थ :
राज्यघटनेतील कलम आणि अनुसूचित जमाती ( ST म्हणजे Schedule Tribe) साठी करण्यात आलेल्या तरतुदी
शैक्षणिक आणि सांस्कृतिक तरतुदी :
• कलम 46 : राज्य जनतेतील दुर्बल घटक आणि विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यांपासून त्यांचे रक्षण करील.
• कलम 350 : विशिष्ट भाषा, लिपी किंवा संस्कृती जपण्याचा अधिकार.
राजकीय तरतुदी :
• कलम 330 : लोकसभेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी जागा राखीव असतील.
• कलम 332 : राज्य विधानसभेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी जागांचे आरक्षण असेल.
• कलम 243 : कलम 243 (D) मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी (SC आणि ST साठी) प्रत्येक पंचायतीमध्ये म्हणजे तिन्ही स्तरांवर जागा राखून ठेवण्याची तरतूद आहे.
2024 या वर्षासाठी जागतिक आदिवासी दिवसाची थीम काय आहे ?
"स्वैच्छिक अलगाव(एकांतात) आणि प्रारंभिक संपर्कात स्वदेशी लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणे."
"Protecting the Rights of Indigenous Peoples in Voluntary Isolation and Initial Contact"