
चालू घडामोडी 21, जानेवारी 2025 | भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025

Bharat Mobility Global Expo 2025
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये खालील पैकी कोणत्या क्षेत्रावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे ?
1. आरोग्य सेवा
2. पर्यटन विकास
3. सेंद्रिय शेती
4. इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान
उत्तर : इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान
बातमी काय आहे ?
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच हस्ते ‘इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो’ 2025 चे उद्घाटन केले.
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?
• हा प्रदर्शन 17-22 जानेवारी 2025 दरम्यान तीन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जात आहे .
• नवी दिल्लीतील भारत मंडपम् आणि यशोभूमी येथे
• ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो सेंटर अँड मार्ट येथे
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चे उद्दिष्ट काय आहे ?
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चे उद्दिष्ट संपूर्ण गतिशीलता मूल्य साखळीला एकाच छत्राखाली आणणे हे आहे.
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोची प्रमुख वैशिष्ट्ये :
• हे प्रदर्शन भारतातील सर्वात मोठे मोबिलिटी प्रदर्शन आहे.
• या प्रदर्शनात इलेक्ट्रिक वाहने (EVs) प्रदर्शित करण्यात आली होती.
• अनेक मोठ्या वाहन उत्पादकांनी त्यांचे नवीनतम इलेक्ट्रिक मॉडेल्स सादर केले.
• अनेक स्टार्टअप्सनी त्यांच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी या व्यासपीठाचा वापर केला.
• या एक्स्पोमध्ये केवळ वाहनांबरोबरच चार्जिंग पायाभूत सुविधा, बॅटरी तंत्रज्ञान आणि स्वायत्त वाहने यासारख्या संबंधित तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यात आले.
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोचा काय फायदा होईल ?
• या प्रदर्शनाने भारताला जागतिक ऑटोमोबाईल उद्योगाचे केंद्र बनवण्याचे भारताचे ध्येय बळकट केले.
• यामुळे भारतीय वाहन उत्पादकांना त्यांची उत्पादने जागतिक बाजारपेठेत निर्यात करण्यास मदत होईल.
• भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यास अधिक चालना मिळेल आणि देशाला स्वच्छ आणि हरित भविष्याकडे नेण्यास मदत होईल.
• यामुळे ऑटोमोबाईल उद्योगात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत.