
चालू घडामोडी 17, जानेवारी 2025 | INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर

INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर
INS Nilgiri, INS Surat and INS Vaghsheer
Subject : GS - संरक्षण
सरळसेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाला लोकार्पण करण्यात आलेल्या INS सूरत, INS निलगिरी या युद्धनौकांची निर्मिती कोणी केली ?
1. माझगाव डॉकयार्ड लिमिटेड
2. गोवा शिपयार्ड लिमिटेड
3. कोचीन शिपयार्ड
4. लार्सन अँड टुब्रो (L&T) शिपयार्ड
उत्तर : माझगाव डॉकयार्ड लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders Limited)
बातमी काय आहे ?
• अलिकडेच, भारतीय नौदलाच्या मुंबईतील डॉकयार्ड येथे INS सूरत, INS निलगिरी या युद्धनौका आणि INS वाघशीर या पाणबुडीचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाला लोकार्पण करण्यात आलं.
• एक विनाशिका, एक युद्धनौका आणि एक पाणबुडी अशा तिन्हींचा एकाच वेळी नौदलात समावेश प्रथमच करण्यात येत आहे आणि सर्वात अभिमानाची बाब म्हणजे या तिन्ही मेड इन इंडिया आहेत.
• या दोन्ही युद्धनौका माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने बांधल्या आहेत.
INS निलगिरी ( फ्रिगेट ) :
• भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत बनविण्यात आलेली पहिली स्टेल्थ फ्रिगेट्स आहे.
• निलगिरी फ्रिगेटवर दुश्मनांशी लढण्यासाठी वेपन्स आणि मिसाईल्स आहेत.
• यामध्ये स्टेल्थ डिझाईन अँड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.
• दुश्मनांच्या रडार मध्ये टिपली जाऊ नये यासाठी अनेक उपकरण बसवण्यात आली आहे.
INS सूरत ( डिस्ट्रायर ) :
• INS सूरत ही प्रोजेक्ट 15B अंतर्गत तयार केलेले एक मोठे विनाशक (डिस्ट्रायर) आहे.
• भारताची पहिली AI-सक्षम युद्धनौका.
• ऑपरेशनल कार्यक्षमतेसाठी स्वदेशी विकसित कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) उपायांचा वापर करते.
• शत्रूंवर तिन्ही बाजूंनी मारा करण्यासाठी ब्रह्मोस मिसाइल, बराक मिसाईल, पाणबुड्या विरोधी रॉकेट लॉन्चर आणि स्पेशल भारतीय बनावटीच्या गन्स आहेत.
INS वाघशीर ( सायलेंट किलर ) :
• भारतीय नौदलात सायलेंट किलर म्हणून ओळख असलेली INS वाघशीर पाणबुडी प्रोजेक्ट 75 च्या स्कॉर्पियन वर्गाची सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे.
• ही जगातील सर्वात शांत आणि बहुमुखी डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांपैकी एक आहे.
• INS वाघशीर पाणबुडी, पृष्ठभागविरोधी युद्ध, पाणबुडीविरोधी युद्ध, गुप्त माहिती गोळा करणे, क्षेत्र निरीक्षण आणि विशेष ऑपरेशन्ससह विविध मोहिमा करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.