
चालू घडामोडी 16, जानेवारी 2025 | हळद | Turmeric

हळद | Turmeric
Subject : GS - भूगोल, अर्थशास्त्र - कृषी
सरळसेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान/विधाने असलेला पर्याय निवडा.
अ) राष्ट्रीय हळद मंडळाचे पहिले अध्यक्ष पल्ले गंगा रेड्डी आहेत.
ब) हळदीला 'गोल्डन स्पाइस' असेही म्हटले जाते.
क) सांगली हळदीला भौगोलिक संकेतांक (GI Tag) मिळाला आहे.
पर्याय :
1. फक्त अ आणि ब बरोबर
2. फक्त ब आणि क बरोबर
3. अ आणि क बरोबर
4. अ, ब आणि क बरोबर
उत्तर : अ, ब आणि क बरोबर
बातमी काय आहे ?
14 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हळद मंडळाचे उद्घाटन केले.
हळदी बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• हळद ही वनस्पती झिंजिबरेसी कुळातील आहे.
• हळदीचे शास्त्रीय नाव कुर्कुमा लाँगा (Curcuma Longa) आहे.
• हळदीला 'गोल्डन स्पाइस' असेही म्हटले जाते.
• हळदीला पिवळा रंग करक्यूमिन (Curcumin) या घटकामुळे असतो.
उत्पादन :
• भारतात हळदीची लागवड 20 पेक्षा अधिक राज्यांत केली जाते.
• हळदीचे प्रमुख उत्पादक राज्य महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू आणि मेघालय आहे.
• भारतात हळदीच्या 30 वाणांचे उत्पादन घेतले जाते.
• हळदीच्या जागतिक उत्पादनात भारताचा वाटा 70% पेक्षा जास्त आहे.
• भारत हा हळदीचा जगातील सर्वात मोठा उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार आहे.
व्यापार :
• हळदीच्या जागतिक व्यापारात भारताचा वाटा 62% पेक्षा जास्त आहे.
• 2023-24 मध्ये, 226.5 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स मूल्याची 1.62 लाख टन हळद आणि हळदीच्या उत्पादनांची निर्यात झाली.
हळदीचे गुण आणि वापर :
• हळद ही भारतीयांच्या जीवनातील एक अविभाज्य अंग असून धार्मिक समारंभात, पारंपरिक विधी, अन्न, सौंदर्यप्रसाधने, , औषधे, रंग इत्यादींकरिता ती वापरतात.
• आयुर्वेद, पारंपारिक भारतीय वैद्यकीय प्रणाली आणि पूर्व आशियाई वैद्यकीय प्रणाली
• एंटी-इंफ्लेमेटरी : जळजळ कमी करते.
• अँटिऑक्सिडेंट: शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवते.
• जंतुनाशक : जखमा भरण्यास मदत होते.
• पचन सुधारते : पचनसंस्थेशी संबंधित विकारांवर उपचार.
कोण - कोणत्या हळदीला भौगोलिक संकेतांक (GI Tag) मिळाला आहे ?
• वैगांव/ वाइगांव हळद (WAIGAON TURMERIC) : महाराष्ट्र
• सांगली हळद (SANGLI TURMERIC) : महाराष्ट्र
• इरोड हळद (ERODE TURMERIC) : तामिळनाडू
• कंधमाल हळद (KANDHMAL TURMERIC) : ओडिशा
• लाकाडोंग हळद (LAKADONG TURMERIC) : मेघालय
राष्ट्रीय हळद मंडळाचे मुख्यालय कोठे आहे ?
राष्ट्रीय हळद मंडळाचे मुख्यालय तेलंगणाच्या निजामाबाद येथे आहे.
राष्ट्रीय हळद मंडळाचे पहिले अध्यक्ष कोण ?
राष्ट्रीय हळद मंडळाचे पहिले अध्यक्ष पल्ले गंगा रेड्डी असणार आहेत.
