current-affair
Important Affairs
12-11-2024

चालू घडामोडी 12, नोव्हेंबर 2024 | भारताचे 51 वे सरन्यायाधीश | 51st Chief Justice of India

[ Justice Sanjiv Khanna,  President, CJI Sanjiv Khanna, 51st Chief Justice of India, supreme court, sarvochh nyayalay, sarnyayadhish, bhartache sarnyayadhish, Sanjiv Khanna yanche Nikal, article 370, electoral bond, EVM machine, Arvind Kejriwal, Loksabha election, Appointment of CJI, Who appointed Chief Justice of India, bhartache sarnyayadhishanchi niyukti, Qualifications to appoint Chief Justice of India, what Qualification required person to be appointed as a Supreme Court judge,  bhartacha nyadhish mhanun nemnuk pattrata, Indian citizen, Bhartiya nagrik, vakil, judge, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair,  chalu Ghadamodi Marathi,   current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi,   police Bharti chalu Ghadamodi,   police Bharti prashnasanch,   police Bharti GK prashna,   Mpsc chalu Ghadamodi,   sarkari Naukri,   sarkari job,   sarkari yojna,   Maharashtra cha chalu Ghadamodi,   Maharashtra government yojna,   PSI syllabus, PSI cutoff,   police Bharti syllabus,   police Bharti cutoff,   police Bharti merit,   MPSC Sathi book,   MPSC Sathi pustak,   police Bharti Sathi pustak,   police Bharti magil prashnapatrika,   MPSC previous years question papers,   Mumbai police Bharti,   Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe,   government GR,   police Bharti result,   MPSC result,   SSC GD merit,   sscgd syllabus,   army Bharti merit,   army Bharti result,   UPSC Marathi,   combine pariksha,   talathi,   talathi syllabus,   talathi cutoff,   talathi book list,   talathi result,   talathi merit,   talathi jaga kiti ahe,   saralseva exam,   saralseva pariksha,   saralseva result,   zilha parishad Bharti,   zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]

भारताचे 51 वे सरन्यायाधीश

51st Chief Justice of India


Subject : GS - नियुक्ती, राज्यशास्त्र- सर्वोच्च न्यायालय


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) नुकतीच देशाचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून खालील पैकी कोणी शपथ घेतली ? 

1. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड

2. न्यायमूर्ती विक्रम नाथ

3. न्यायमूर्ती संजीव खन्ना

4. न्यायमूर्ती भूषण गवई

उत्तर : न्यायमूर्ती संजीव खन्ना


बातमी काय आहे ? 

• न्यायाधीश संजीव खन्ना यांनी देशाचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. 

• राष्ट्रपती भवनात संजीव खन्ना यांच्या सरन्यायाधीश पदाचा शपथविधी पार पडला. 

• यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संजीव खन्ना यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. 

• भारताचे नवे सरन्यायधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ 13 मे 2025 पर्यंत असणार आहे.


न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे महत्त्वाचे निर्णय कोणते ? 

नवनियुक्त सरन्यायाधीश संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या निर्णयाचे ते भाग होते.

उदाहरणार्थ : 

• संविधानातील कलम 370 रद्द करणे 

इलेक्टोरल बाँड्स योजना रद्द करणे 

• दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करणे

• अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी अल्पसंख्याक दर्जा निर्धारण प्रकरणात नुकत्याच झालेल्या बहुमताच्या निर्णयाचाही ते भाग होते. 

• लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी VVPAT आणि EVM यांच्यातील मतांची 100 टक्के जुळवाजुळव करण्याची मागणी त्यांनी फेटाळून लावली.


सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात ? 

• सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती संविधानाच्या कलम 124(2) अंतर्गत राष्ट्रपतींद्वारे केली जाते. 

• न्यायाधीश आपले पद वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात

• नियमानुसार, सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ (ज्येष्ठतम) न्यायाधीशांना भारताचे सरन्यायाधीश (Chief Justice of India)  म्हणून नियुक्त केले जाते. 


1993 चा द्वितीय न्यायाधीश खटला काय सांगतो ? 

दुसऱ्या न्यायाधीशांच्या खटल्यात (1993), सर्वोच्च न्यायालयाने, " भारताच्या सरन्यायाधीश पदावर केवळ जेष्ठतम न्यायाधीशाची नेमणूक करण्यात यावी " असा निकाल दिला.  


सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी पात्रता काय असावी लागते ? 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होणाऱ्या व्यक्तीकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे : 

• ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी आणि

• त्या व्यक्तीस एखाद्या उच्च न्यायालयात अथवा दोन किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग किमान 5 वर्षे न्यायाधीश म्हणून काम करण्याचा अनुभव असावा किंवा

• त्या व्यक्तीस एखाद्या उच्च न्यायालयात अथवा दोन किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग किमान 10 वर्षे वकील म्हणून काम करण्याचा अनुभव असावा किंवा 

• राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती निष्णात कायदेपंडित असावी.


सरन्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला आहे ? 
न्यायाधीशांना पदावरून काढण्याची पद्धत काय आहे ? 

• राज्यघटनेतील कलम 124(4) मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याच्या पद्धतीची तरतूद करण्यात आली आहे

• राष्ट्रपती सरन्यायाधीशांना पदावरून दूर करू शकतात.

• संसदेने सरन्यायाधीशांना (न्यायाधीशांना) पदावरून हटवण्याबाबत अभिभाषण सादर केल्यानंतरच राष्ट्रपती असे करू शकतात.

• संसदेत हे समावेदन प्रत्येक सभागृहाच्या विशेष बहुमताने संमत होणे गरजेचे असते.  


• प्रत्येक सभागृहाच्या विशेष बहुमत म्हणजेच : 

• त्या सभागृहाच्या (लोकसभा किंवा राज्यसभा) एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि

• कमीत कमी हजर व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन तृतीयांश इतक्या बहुमताने संमत होणे गरजेचे असते.

• न्यायाधीशांना गैरवर्तणूक किंवा अकार्यक्षमता या आधारांवर पदावरून दूर करता येऊ शकते.


भारताच्या सरन्यायाधीशांची मुख्य भूमिका/ अधिकार काय असतात ?
Key Role of Chief Justice of India

• सरन्यायाधीश भारताच्या राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ देतात.

• "मास्टर ऑफ द रोस्टर" (Master of Roster) : सरन्यायाधीशांकडे विशिष्ट खटले (केस) विशिष्ट खंडपीठांना सोपवण्याचा आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या सुनावणीचे वेळापत्रक ठरवण्याचा अधिकार आहे. 

• सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी सरन्यायाधीश (सर्वोच्च न्यायालयाच्या 4 सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांच्या कॉलेजियमसह) राष्ट्रपतींना सल्ला देतात. 

• घटनेच्या कलम 127 अंतर्गत भारताचे सरन्यायाधीश एखाद्या न्यायाधीशास तात्पुरत्या काळासाठी सर्वोच्च न्यायालयात तदर्थ न्यायाधीश (Ad-hoc Judges) म्हणून नेमू शकतात.

More Current Affairs

current-affair
Important Affairs
12-11-2024

चालू घडामोडी 12, नोव्हेंबर 2024 | जागतिक न्यूमोनिया दिन | World Pneumonia Day

[ World Pneumonia Day, jagtik Pneumonia divas, Pneumonia kashamule hoto, Pneumonia chi lakshane, upay, upchar, treatment,  hospital, vaccine, lasikaran, jagtik Pneumonia dinachi sankalpana, jagtik Pneumonia dinachi theme, Bactria, virus, fungal infection, Antibiotics, Antiviral medications, Antifungal treatments, lungs, phuphuse ]

जागतिक न्यूमोनिया दिन

World Pneumonia Day


Subject : GS - दिनविशेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) जागतिक न्यूमोनिया दिवस केव्हा साजरी केला जातो ?

(SSC GD 2021)

1. 18 डिसेंबर

2. 5 सप्टेंबर

3. 12 नोव्हेंबर

4. 15 ऑक्टोबर

उत्तर : 12 नोव्हेंबर


न्यूमोनिया आजारा संदर्भात परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स : 

• न्यूमोनिया आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 12 नोव्हेंबरला 'जागतिक न्यूमोनिया दिन' साजरा केला जातो. 

• जागतिक न्यूमोनिया दिवस पहिल्यांदा 12 नोव्हेंबर 2009 रोजी साजरी करण्यात आला.

• 2009 मध्ये ग्लोबल कोॲलिशन अगेन्स्ट चाइल्डहुड न्यूमोनियाद्वारे (Global Coalition against Child Pneumonia) मुलांमध्ये, विशेषत: कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये न्यूमोनियामुळे होणारा उच्च मृत्यू दर कमी करण्यासाठी साजरा करण्यात आला.


जागतिक न्यूमोनिया दिन का साजरी करतात ? 
जागतिक न्यूमोनिया दिन साजरी करण्यामागील उद्देश काय आहे ? 

न्यूमोनिया रोग, त्याची लक्षणे, लसीकरण, योग्य पोषण आणि त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्वच्छ हवेच्या उपक्रमांची अंमलबजावणी करणे या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करून जनजागृती करणे हा जागतिक न्यूमोनिया दिन' साजरा करण्याचा उद्देश आहे.


न्यूमोनिया म्हणजे काय ?

• न्यूमोनिया ही श्वसनाची गंभीर समस्या आहे, ज्यामध्ये फुफ्फुसात संसर्ग होतो. 

• न्यूमोनियामुळे फुफ्फुस सुजतात.

• फुफ्फुसातील हवेच्या थैल्या ऍपोस्ट्रॉफी किंवा अल्व्होली द्रव किंवा पूने भरलेल्या असतात.

• न्यूमोनिया हा जीवाणू (Bacteria), विषाणू (Virus), किंवा बुरशीमुळे (Fungi) होतो.

• लहान मुलांमध्ये, 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढ व्यक्तींमध्ये आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली आहे अशा लोकांमध्ये न्यूमोनिया हा चिंताजनक होऊ शकतो.


न्यूमोनियाची लक्षणे कोणती ?

• श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होणं.

• जोरजोरात आणि कमी श्वास घेणं 

• हृदयाच्या ठोक्यांचं प्रमाण वाढणं

• ताप, अंगात थंडी भरणं आणि खूप घाम येणं 

• कफ, छातीत दुखणं, उलट्या होणं

• भूक न लागणे

• सांधे आणि स्नायू वेदना

• गोंधळ, विशेषतः वृद्ध लोकांमध्ये

[ pneumonia che lakshane, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair,  chalu Ghadamodi Marathi,   current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi,   police Bharti chalu Ghadamodi,   police Bharti prashnasanch,   police Bharti GK prashna,   Mpsc chalu Ghadamodi,   sarkari Naukri,   sarkari job,   sarkari yojna,   Maharashtra cha chalu Ghadamodi,   Maharashtra government yojna,   PSI syllabus, PSI cutoff,   police Bharti syllabus,   police Bharti cutoff,   police Bharti merit,   MPSC Sathi book,   MPSC Sathi pustak,   police Bharti Sathi pustak,   police Bharti magil prashnapatrika,   MPSC previous years question papers,   Mumbai police Bharti,   Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe,   government GR,   police Bharti result,   MPSC result,   SSC GD merit,   sscgd syllabus,   army Bharti merit,   army Bharti result,   UPSC Marathi,   combine pariksha,   talathi,   talathi syllabus,   talathi cutoff,   talathi book list,   talathi result,   talathi merit,   talathi jaga kiti ahe,   saralseva exam,   saralseva pariksha,   saralseva result,   zilha parishad Bharti,   zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]


न्यूमोनियाचा उपचार कसा करावा ?

• न्यूमोनियाचा उपचार हा न्यूमोनियाच्या प्रकारावर आणि केसच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. 

• सामान्य उपचारांमध्ये सर्व निर्धारित औषधे आणि लसीकरणे घेणे समाविष्ट आहे. 

  • प्रतिजैविक (Antibiotics) : जिवाणू न्यूमोनियासाठी.
  • अँटीव्हायरल औषधे (Antiviral Medications) : व्हायरल न्यूमोनियासाठी.
  • अँटीफंगल उपचार (Antifungal Treatments) : बुरशीजन्य न्यूमोनियासाठी.


जागतिक न्यूमोनिया दिवस 2024 ची संकल्पना (थीम) काय आहे ? 

प्रत्येक श्वास महत्वाचा आहे : न्यूमोनियाला थांबवा

Every Breath Counts: Stop Pneumonia in Its Track

current-affair
Important Affairs
12-11-2024

चालू घडामोडी 12, नोव्हेंबर 2024 | सेमीकंडक्टर धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य

[ What is semiconductor ?, What is the India Semiconductor Mission ?, conductors, insulators, semiconductor, semiconductor mhanje Kay, semiconductor Kay kam kart, semiconductor plant in India, semiconductor company, Gujarat Semiconductor Policy, integrated circuit,  world's largest semiconductor producing company, ardhvahak, Vidyut Pravah, current, Vidyut vahak, Vidyut rodhak, current resistance, electronic devices, vinyan ani tantradnyan notes marathi madhe, MeitY, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair,  chalu Ghadamodi Marathi,   current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi,   police Bharti chalu Ghadamodi,   police Bharti prashnasanch,   police Bharti GK prashna,   Mpsc chalu Ghadamodi,   sarkari Naukri,   sarkari job,   sarkari yojna,   Maharashtra cha chalu Ghadamodi,   Maharashtra government yojna,   PSI syllabus, PSI cutoff,   police Bharti syllabus,   police Bharti cutoff,   police Bharti merit,   MPSC Sathi book,   MPSC Sathi pustak,   police Bharti Sathi pustak,   police Bharti magil prashnapatrika,   MPSC previous years question papers,   Mumbai police Bharti,   Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe,   government GR,   police Bharti result,   MPSC result,   SSC GD merit,   sscgd syllabus,   army Bharti merit,   army Bharti result,   UPSC Marathi,   combine pariksha,   talathi,   talathi syllabus,   talathi cutoff,   talathi book list,   talathi result,   talathi merit,   talathi jaga kiti ahe,   saralseva exam,   saralseva pariksha,   saralseva result,   zilha parishad Bharti,   zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]

सेमीकंडक्टर धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य

First State in the Country to implement Semiconductor Policy


Subject : GS - सरकारी योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान 


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) समर्पित अर्धवाहक (सेमीकंडक्टर) धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ? 

1. महाराष्ट्र

2. गुजरात

3. कर्नाटक

4. उत्तर प्रदेश

उत्तर : गुजरात


बातमी काय आहे ?

गुजरात सरकारने सेमीकंडक्टर उत्पादनात गुजरातला आघाडीवर ठेवण्यासाठी गुजरात सेमीकंडक्टर धोरण 2022-2027 सादर केले आहे.


गुजरात सेमीकंडक्टर धोरण 2022-2027 (Gujarat Semiconductor Policy 2022-2027) बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स : 

• गुजरात सरकारने भारतातील पहिले ‘गुजरात सेमीकंडक्टर धोरण 2022-2027’ सादर केले आहे.

• समर्पित सेमीकंडक्टर धोरणाची अंमलबजावणी करणारे गुजरात हे भारतातील पहिले राज्य बनले आहे.

• गुजरातमध्ये चार प्रमुख कंपन्यांकडून 1.24 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. 

• गुजरात राज्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या मते, या प्रकल्पांमुळे अंदाजे 53,000 नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

• धोलेरा येथिल ‘सेमीकॉन सिटी’मध्ये, टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (TEPL) आणि तैवानचे पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन (PSMC) 91,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीसह भारतातील पहिली AI-सक्षम सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधा स्थापन करत आहेत.

• धोलेरा हे ठिकाण, भारतातील पहिले ग्रीनफिल्ड स्मार्ट सिटी म्हणून विकसित केले जात आहे.


अर्धवाहक (सेमी कंडक्टर) म्हणजे काय ? 
What is Semiconductor ?

• घन पदार्थांच्या गुणधर्मात विद्युतवाहकता किंवा विद्युत रोधकता असे गुण असतात.

• शक्यतो धातू- तांबे, लोखंड, अल्युमिनियम इत्यादी हे विद्युत वाहक (Conductors) असतात.

• तर अधातू - लाकूड, काच, प्लास्टिक, रबर इत्यादी हे विद्युत रोधक (Insulators) असतात. 

• सेमी कंडक्टर - या व्यतिरिक्त असे काही पदार्थ असतात जे कधी कधी विद्युत वाहक म्हणून काम करतात तर कधी विद्युत रोधक म्हणून काम करतात यानांच अर्धवाहक (Semiconductor) म्हणतात.

• सेमी कंडक्टर या घन पदार्थांची विद्युतवाहकता ही कंडक्टर आणि इन्सुलेटर यांच्या मध्ये असते. यामध्ये प्रामुख्याने सिलिकॉन (Si) आणि जर्मेनिअम (Ge) हे पदार्थ येतात.


सेमीकंडक्टर एवढे महत्त्वाचे का आहे ? 

• डायोड, ट्रान्झिस्टर आणि इंटिग्रेटेड सर्किट्ससह विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीमध्ये सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. 

• अशी उपकरणे त्यांच्या आकारमानाने छोटे (कॉम्पॅक्टनेस), विश्वासार्हता, उर्जा कार्यक्षमता आणि कमी किमतीमुळे मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. 

• सेमीकंडक्टर चिप अनेक हायटेक उपकरणांमध्ये बसवली जाते. 

• डेटाची प्रक्रिया सेमीकंडक्टर चिपद्वारेच केली जाते. यामुळेच याला इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा मेंदू देखील म्हणतात.


सेमीकंडक्टर चिप चा वापर कोठे केला जातो ? 

• वैद्यकीय उपकरणे, मोटारगाड्या, लढाऊ विमाने, स्मार्ट फोन, जगभरातील लक्झरी वाहने, विमाने, सुपरफास्ट ट्रेन्स, अंतराळ उपकरणे, रॉकेट, उपग्रह, सुपर कॉम्प्युटर, यांपासून ते नवीन तंत्रज्ञान जसे की क्लाउड कॉम्प्युटिंग, उच्च वायरलेस नेटवर्क्स, क्वांटम कॉम्प्युटिंग, ब्लॉकचेन ऍप्लिकेशन्स, बिटकॉइन मायनिंग, 5G, सेल्फ-ड्रायव्हिंग व्हेइकल्स, रोबोट्स, ड्रोन, गेमिंग, यांसारख्या महत्त्वाच्या तंत्रज्ञानात सेमीकंडक्टर वापरले जाते. 


जगातील प्रमुख सेमीकंडक्टर उत्पादक देश कोणते ? 

• तैवान, दक्षिण कोरिया, जपान, अमेरिका आणि नेदरलँड हे त्याचे प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार देश आहेत. 

तैवानची TSMS ही जगातील सर्वात मोठी सेमीकंडक्टर उत्पादक कंपनी आहे.


इंडिया सेमीकंडक्टर मिशन (ISM) काय आहे ? 
What is the India Semiconductor Mission ? 

• इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2021 मध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाच्या (MeitY) अंतर्गत सुरू करण्यात आला.

• हा देशातील शाश्वत सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले इकोसिस्टमच्या विकासासाठी व्यापक कार्यक्रमाचा एक भाग आहे.

• भारतातील सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले उत्पादन परिसंस्थेच्या विकासासाठी एकूण 76,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

• सेमीकंडक्टर्स, डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग आणि डिझाइन इकोसिस्टममध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

current-affair
Important Affairs
11-11-2024

चालू घडामोडी 11, नोव्हेंबर 2024 | राष्ट्रीय शिक्षण दिन | National Education Day

[ National Education Day, rashtriya shishak diwas, rashtriya shishak din, rashtriya shishak din ka sajri kartat, rashtriya shishak din kevha asto, Maulana Abul Kalam Azad, India's first education minister, bhartache pahile shikshanmantri, rashtriya shikshan dhoran ]

राष्ट्रीय शिक्षण दिन

National Education Day 


Subject : GS - दिनविशेष, व्यक्ती


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) दरवर्षी 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन खालील पैकी कोणच्या सन्मानार्थ साजरी करण्यात येतो ? 

1. लोकमान्य टिळक

2. मौलाना अबुल कलाम आझाद

3. रविंद्रनाथ टागोर

4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

उत्तर : मौलाना अबुल कलाम आझाद


राष्ट्रीय शिक्षण दिवसाबद्दल महत्त्वाची माहिती : 

• मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरी करण्यात येतो.

• मौलाना अबुल कलाम आझाद (Maulana Abul Kalam Azad) हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते.


पहिला राष्ट्रीय शिक्षण दिन केव्हा साजरी करण्यात आला ? 

• ११ नोव्हेंबर २००८ पासून राष्ट्रीय शिक्षण दिन साजरी करण्यात येतो.

• मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या शिक्षणातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने 2008 मध्ये, ११ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून घोषित केला.


मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या योगदाना संदर्भात IMP वनलाईनर पॉईंट्स :

• मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1988 रोजी झाला होता. 

• भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देखील त्यांनी सहभाग घेतला होता. ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक होते.

• स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण (National Education Policy) तयार केले. 

• मोफत प्राथमिक शिक्षण हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. 

• इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) आणि विद्यापीठ अनुदान आयोग (University Grants Commission) च्या स्थापनेचं श्रेय मौलाना आझाद यांना दिलं जातं.

• त्यांनी शिक्षण आणि सांस्कृतिक विकासासाठी संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी आणि ललितकला अकादमी सारख्या संस्थांची देखील स्थापना केली. 

[ tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair,  chalu Ghadamodi Marathi,   current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi,   police Bharti chalu Ghadamodi,   police Bharti prashnasanch,   police Bharti GK prashna,   Mpsc chalu Ghadamodi,   sarkari Naukri,   sarkari job,   sarkari yojna,   Maharashtra cha chalu Ghadamodi,   Maharashtra government yojna,   PSI syllabus, PSI cutoff,   police Bharti syllabus,   police Bharti cutoff,   police Bharti merit,   MPSC Sathi book,   MPSC Sathi pustak,   police Bharti Sathi pustak,   police Bharti magil prashnapatrika,   MPSC previous years question papers,   Mumbai police Bharti,   Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe,   government GR,   police Bharti result,   MPSC result,   SSC GD merit,   sscgd syllabus,   army Bharti merit,   army Bharti result,   UPSC Marathi,   combine pariksha,   talathi,   talathi syllabus,   talathi cutoff,   talathi book list,   talathi result,   talathi merit,   talathi jaga kiti ahe,   saralseva exam,   saralseva pariksha,   saralseva result,   zilha parishad Bharti,   zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]


current-affair
Important Affairs
11-11-2024

चालू घडामोडी 11, नोव्हेंबर 2024 | छठ पूजा

[ Chhath Puja, Chhath Puja kontya rajyacha San ahe, bhartatil San utsav, Chhath Puja kontya devachi Puja ahe, Chhath Puja kevha ahe, kala ani sanskruti,  arts and culture, bhartatil Sun, suryadev, suryanamskar, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair,  chalu Ghadamodi Marathi,   current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi,   police Bharti chalu Ghadamodi,   police Bharti prashnasanch,   police Bharti GK prashna,   Mpsc chalu Ghadamodi,   sarkari Naukri,   sarkari job,   sarkari yojna,   Maharashtra cha chalu Ghadamodi,   Maharashtra government yojna,   PSI syllabus, PSI cutoff,   police Bharti syllabus,   police Bharti cutoff,   police Bharti merit,   MPSC Sathi book,   MPSC Sathi pustak,   police Bharti Sathi pustak,   police Bharti magil prashnapatrika,   MPSC previous years question papers,   Mumbai police Bharti,   Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe,   government GR,   police Bharti result,   MPSC result,   SSC GD merit,   sscgd syllabus,   army Bharti merit,   army Bharti result,   UPSC Marathi,   combine pariksha,   talathi,   talathi syllabus,   talathi cutoff,   talathi book list,   talathi result,   talathi merit,   talathi jaga kiti ahe,   saralseva exam,   saralseva pariksha,   saralseva result,   zilha parishad Bharti,   zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]

छठ पूजा 

Chhath Puja


बातमी काय आहे ? 

अलीकडेच, भारताच्या पंतप्रधानांनी छठ पूजेच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.


Subject : GS - इतिहास- कला आणि संस्कृती


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) नुकतीच छठ पूजा हा उत्सव साजरा करण्यात आला. त्याबद्दल योग्य विधान असलेला पर्याय निवडा.

अ) कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ यांसारख्या राज्यांमध्ये साजरा केला जाणारा हा महत्त्वाचा हिंदू सण आहे.

ब) हा सण सूर्य देव यांना समर्पित आहे. 


पर्याय

1. फक्त अ योग्य आहे.

2. फक्त ब योग्य आहे.

3. अ आणि ब दोन्ही योग्य आहे

4. अ आणि ब दोन्ही अयोग्य आहे.

उत्तर : फक्त ब योग्य आहे.


छठ पूजा बद्दल IMP वनलाईनर पॉईंट्स : 

बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांमध्ये साजरा केला जाणारा हा महत्त्वाचा हिंदू सण आहे.

• हा सण सूर्य देव आणि त्यांची बहीण षष्ठी देवी यांना समर्पित आहे, ज्याला अनेकदा छठी मैया म्हणून संबोधले जाते.

• या छठ पूजेचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणतेही मूर्तिपूजन केले जात नाही.

• दिवाळीचा सण संपला की छठ सण सुरू होतो.


छठ पुजा सण कसा साजरा करण्यात येतो ? 

मोठ्या श्रद्धेने आणि समर्पणाने छठ पुजा सलग चार दिवस साजरी केला जातो. 

पहिला दिवस : छठ पूजेच्या पहिल्या दिवशी पवित्र नदी (पाण्यात) डुबकी मारतात. लोक विशेष नैवेद्य आणि विधी करण्यासाठी गंगेचे पाणी त्यांच्या घरी घेऊन जातात. 


दुसरा दिवस : छठचा दुसरा दिवस, ज्याला खरना देखील म्हटले जाते, त्यात भक्त दिवसभराचा उपवास करतात, जो पृथ्वी मातेची पूजा केल्यानंतर संध्याकाळी उशिरा सोडला जातो.

 

तिसरा दिवस : छठचा तिसरा दिवस संध्याकाळच्या पुजेसाठी प्रसाद तयार करण्यात जातो, ज्याला सांझिया अर्घ्य असेही म्हणतात. 

संध्याकाळी, मोठ्या संख्येने भाविक नद्यांच्या काठावर जमतात आणि मावळत्या सूर्याला प्रसाद अर्पण करतात. 


चौथा दिवस : छठच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी, कुटुंबातील सदस्य आणि मित्र सूर्योदयापूर्वी नद्यांच्या काठावर जातात आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य देतात. या विधीनंतर, भाविक आपला उपवास सोडतात आणि शेजारी आणि नातेवाईकांना प्रसादाचे वाटप करतात.

current-affair
Important Affairs
11-11-2024

चालू घडामोडी 11, नोव्हेंबर 2024 | जागतिक विज्ञान दिवस | World Science Day

[ UNESCO, United Nations Educational, Scientific and Cultural Organization, sanyukt rashtra sanghatna, World Science Day, jagtik vinyan din, jagtik vinyan divas, National science day, jagtik vinyan divasachi sankalpana, World Science Day theme, Youth at the forefront, vinyan notes, vinyan notes marathi madhe, MPSC science notes marathi madhe, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair,  chalu Ghadamodi Marathi,   current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi,   police Bharti chalu Ghadamodi,   police Bharti prashnasanch,   police Bharti GK prashna,   Mpsc chalu Ghadamodi,   sarkari Naukri,   sarkari job,   sarkari yojna,   Maharashtra cha chalu Ghadamodi,   Maharashtra government yojna,   PSI syllabus, PSI cutoff,   police Bharti syllabus,   police Bharti cutoff,   police Bharti merit,   MPSC Sathi book,   MPSC Sathi pustak,   police Bharti Sathi pustak,   police Bharti magil prashnapatrika,   MPSC previous years question papers,   Mumbai police Bharti,   Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe,   government GR,   police Bharti result,   MPSC result,   SSC GD merit,   sscgd syllabus,   army Bharti merit,   army Bharti result,   UPSC Marathi,   combine pariksha,   talathi,   talathi syllabus,   talathi cutoff,   talathi book list,   talathi result,   talathi merit,   talathi jaga kiti ahe,   saralseva exam,   saralseva pariksha,   saralseva result,   zilha parishad Bharti,   zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]
जागतिक विज्ञान दिवस 
World Science Day


Subject : GS - दिनविशेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान 


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) दरवर्षी जागतिक विज्ञान दिन खालील पैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

1. 1 नोव्हेंबर

2. 5 नोव्हेंबर

3. 10 नोव्हेंबर

4. 21 नोव्हेंबर

उत्तर : 10 नोव्हेंबर


• दरवर्षी 10 नोव्हेंबर रोजी, शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन साजरा करण्यात येतो.

• 2001 मध्ये UNESCO ने जागतिक विज्ञान दिनाची स्थापन केली.

• हा दिवस, जागतिक शांतता आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी विज्ञानाच्या महत्त्वावर जोर देण्यासाठी समर्पित आहे. 

• दरवर्षी, हा दिवस हवामान बदल, आरोग्य संकटे आणि जैवविविधतेची हानी यासारख्या महत्त्वाच्या जागतिक आव्हानांचे निराकरण करण्यात विज्ञानाच्या आवश्यक भूमिकेकडे लक्ष वेधतो.


(नोट - UNESCO : United Nations Educational, Scientific and Cultural Organization.

UNESCO ही संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था आहे.)


पहिला जागतिक विज्ञान दिन केव्हा साजरी करण्यात आला ? 

UNESCO च्या संयुक्त विद्यमाने 10 नोव्हेंबर 2002 रोजी जगभरात शांतता आणि विकासासाठी पहिला जागतिक विज्ञान दिन साजरा करण्यात आला. 


जागतिक विज्ञान दिवस साजरा करण्याचे प्रमुख उद्दिष्ट कोणते आहे ? 
जागतिक विज्ञान दिवस का साजरा करण्यात येतो ?

• विज्ञानाचा शांतता आणि विकासाबद्दलचा जनमानसातील दृष्टिकोन अधिक प्रगल्भ करणे.

• विविध देशांमध्ये वैज्ञानिक संशोधनाची देवाणघेवाण करणे.

• राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विज्ञान समित्यांची अथवा व्यासपीठांची स्थापना करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे.

• येणाऱ्या समस्यांकडे वैज्ञानिक जगताचे लक्ष वेधणे.

• सामान्य जनमानसात विज्ञानाबद्दल जागृती वाढावी, विज्ञानाचा शांततेसाठी व विकासासाठी वापर व्हावा यासाठी हा दिवस साजरा केला जातो.


जागतिक विज्ञान दिवस 2024 ची संकल्पना थीम काय आहे ? त्या संकल्पनेचा अर्थ काय आहे ? 

• 2024 साठी, "तरुणांचा पुढाकार" (Youth at the forefront) ही जागतिक विज्ञान दिवसाची संकल्पना (थीम) आहे.

• शाश्वत विकासासाठी नुकत्याच घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान दशकाच्या (२०२४-२०३३) अनुसरून यंदाची ही संकल्पना (थीम) आहे. 

• ही थीम तरुणांना आजच्या वेगाने बदलणाऱ्या डिजिटल जगात विज्ञानाची भूमिका जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित करते.

• विज्ञानाचा दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होतो आणि पर्यावरणीय स्थिरता आणि आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी वैज्ञानिकांशी संवाद साधण्यासाठी युवकांना आमंत्रित करते.


भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरी करण्यात येतो ? 

28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.

current-affair
Important Affairs
09-11-2024

चालू घडामोडी 09, नोव्हेंबर 2024 | प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना

[ PM-Vidyalaxmi Scheme, PM-Vidyalaxmi yojna, pantapradhan Vidyalaxmi yojna, Pradhanmantri Vidyalaxmi yojna Kay ahe, government Scheme for higher studies, loan for students, educational loan, loan subsidy, E-voucher, Central Bank Digital Currency wallets. Vidyarthyansathi Sarkari yojna, shaikshanik karj, shikshanasathi loan kase kadhave, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair,  chalu Ghadamodi Marathi,   current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi,   police Bharti chalu Ghadamodi,   police Bharti prashnasanch,   police Bharti GK prashna,   Mpsc chalu Ghadamodi,   sarkari Naukri,   sarkari job,   sarkari yojna,   Maharashtra cha chalu Ghadamodi,   Maharashtra government yojna,   PSI syllabus, PSI cutoff,   police Bharti syllabus,   police Bharti cutoff,   police Bharti merit,   MPSC Sathi book,   MPSC Sathi pustak,   police Bharti Sathi pustak,   police Bharti magil prashnapatrika,   MPSC previous years question papers,   Mumbai police Bharti,   Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe,   government GR,   police Bharti result,   MPSC result,   SSC GD merit,   sscgd syllabus,   army Bharti merit,   army Bharti result,   UPSC Marathi,   combine pariksha,   talathi,   talathi syllabus,   talathi cutoff,   talathi book list,   talathi result,   talathi merit,   talathi jaga kiti ahe,   saralseva exam,   saralseva pariksha,   saralseva result,   zilha parishad Bharti,   zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना

PM-Vidyalaxmi Scheme


Subject : GS - सरकारी योजना


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेला नुकतीच मंजुरी देण्यात आली. योजनेबद्दल योग्य विधान असलेला पर्याय निवडा.

अ) या योजनेअंतर्गत मुलींना मोफत पुस्तके दिली जाणार आहे.

ब) प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना हा राष्ट्रीय शिक्षण धोरण, 2020 चा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. 


पर्याय

1. फक्त अ योग्य आहे.

2. फक्त ब योग्य आहे.

3. अ आणि ब दोन्ही योग्य आहे

4. अ आणि ब दोन्ही अयोग्य आहे.


उत्तर : फक्त ब योग्य आहे.

• ही योजना उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देते.

• म्हणून पर्याय अ चुकीचा आहे.


बातमी काय आहे ? 

केंद्रीय मंत्रिमंडळाने उच्च शिक्षणासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे.


प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना काय आहे ? 

• प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना हा राष्ट्रीय शिक्षण धोरण, 2020 चा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. 

• गुणवंत विद्यार्थ्यांना सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी तारण विरहित (Collateral-Free Loans), हमीदार विरहित कर्ज (Guarantor-Free Loans) उपलब्ध करून देते.  

• 2024-25 ते 2030-31 या कालावधीत 3,600 कोटी रुपये या योजनेअंतर्गत खर्च करण्यात येणार आहे.

• 

कोणत्या विद्यार्थ्यांना कर्ज मिळू शकेल ? किती ? 

• नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) द्वारे पहिल्या 100 मध्ये रँक केलेल्या संस्थांमध्ये आणि राज्य सरकार आणि सर्व केंद्र सरकार शासित संस्थांमधून 101-200 रँक असलेल्या संस्थांमध्ये नोंदणी केलेले विद्यार्थी योजनेसाठी पात्र असतील. 

7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी, विद्यार्थी त्याच्या थकबाकीच्या 75% कर्जहमीसाठी पात्र असेल.

• 8 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्या आणि इतर कोणत्याही सरकारी शिष्यवृत्ती किंवा व्याज सवलत योजनेसाठी पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कर्ज परतफेडीच्या काळात 3 टक्के व्याज सवलत देखील दिली जाईल.


कर्ज मिळविण्यासाठी अर्ज कोठे करावा ? 

• उच्च शिक्षण विभागाकडे “PM-Vidyalaxmi” एक एकीकृत पोर्टल असेल ज्यावर सर्व बँकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या सोप्या अर्ज प्रक्रियेद्वारे विद्यार्थी शैक्षणिक कर्जासाठी तसेच व्याज सवलतीसाठी अर्ज करू शकतील. 

• व्याज सवलतीचे पेमेंट ई-व्हाउचर आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सी वॉलेटद्वारे केले जाईल.

current-affair
Important Affairs
09-11-2024

चालू घडामोडी 09, नोव्हेंबर 2024 | राष्ट्रीय विधी सेवा दिन | National Legal Services Day

[ National Legal Services Day, rashtriya vidhi seva pradhikaran, National Legal Services Authority, rashtriya vidhi seva divas, chief justice of India, bhartache sarnyayadhish, headquarters, kaydeshir madat, kadevishyak salla,  tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair,  chalu Ghadamodi Marathi,   current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi,   police Bharti chalu Ghadamodi,   police Bharti prashnasanch,   police Bharti GK prashna,   Mpsc chalu Ghadamodi,   sarkari Naukri,   sarkari job,   sarkari yojna,   Maharashtra cha chalu Ghadamodi,   Maharashtra government yojna,   PSI syllabus, PSI cutoff,   police Bharti syllabus,   police Bharti cutoff,   police Bharti merit,   MPSC Sathi book,   MPSC Sathi pustak,   police Bharti Sathi pustak,   police Bharti magil prashnapatrika,   MPSC previous years question papers,   Mumbai police Bharti,   Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe,   government GR,   police Bharti result,   MPSC result,   SSC GD merit,   sscgd syllabus,   army Bharti merit,   army Bharti result,   UPSC Marathi,   combine pariksha,   talathi,   talathi syllabus,   talathi cutoff,   talathi book list,   talathi result,   talathi merit,   talathi jaga kiti ahe,   saralseva exam,   saralseva pariksha,   saralseva result,   zilha parishad Bharti,   zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]

राष्ट्रीय विधी सेवा दिन

National Legal Services Day


Subject : GS - दिनविशेष, राज्यशास्त्र


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) राष्ट्रीय विधी सेवा दिना ( National Legal Services Day) बद्दल योग्य विधान असलेला पर्याय निवडा.

1. राष्ट्रीय विधी सेवा दिन दरवर्षी ९ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.

2. या दिनाचा उद्देश समाजातील दुर्बल घटकांना विनामूल्य कायदेशीर मदत आणि समर्थन प्रदान करणे हे आहे.

3. दोन्ही योग्य

4. दोन्ही अयोग्य

उत्तर : दोन्ही योग्य


• राष्ट्रीय विधी सेवा दिन दरवर्षी 9 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.

राष्ट्रीय विधी सेवा दिन, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 1995 मध्ये सुरू केला, ज्याचा उद्देश समाजातील दुर्बल घटकांना विनामूल्य कायदेशीर मदत आणि समर्थन प्रदान करणे हे आहे.

• हा दिवस कायदेशीर जागरूकता वाढवण्यासाठी आणि सर्व नागरिकांसाठी, विशेषत: उपेक्षित समुदायातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो.

• ही कायदेशीर मदत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत पुरविल्या जातात.


राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण ( National Legal Services Authority) म्हणजे काय ? 

• स्थापना : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणा ची स्थापना 1995 मध्ये विधी सेवा प्राधिकरण कायदा, 1987 (Legal Services Authorities Act, 1987) अंतर्गत करण्यात आली.

• प्रमुख कार्य : समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे आणि विवादांचे सौहार्दपूर्ण निराकरण करण्यासाठी लोकअदालती आयोजित करणे हे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख कार्य आहे. 

• मुख्यालय : त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

• मुख्य संरक्षक : भारताचे सरन्यायाधीश हे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य संरक्षक (Chief Patron) आहेत.

• कार्यकारी अध्यक्ष : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्षपदावर सर्वोच्च न्यायालयाच्या दुसऱ्या सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशाची नियुक्ती करण्याची परंपरा आहे.

current-affair
Important Affairs
09-11-2024

चालू घडामोडी 09, नोव्हेंबर 2024 | महाकुंभ मेळा 2025 | प्रयागराज

[ Maha Kumbh Mela, Kumbh Mela 2025, Haridwar, Ujjain, Nashik, Prayagraj, Kumbh Mela kiti varshani yeto, 2025 cha kumbhamela kuthe hoil, UNESCO World Heritage site, pilgrims, Yatra, tirthshetra, tirthshetra anghol, pilgrims who bathe in sacred rivers, kala ani sanskruti, bhartacha Itihas, bhartatil Pavitra tirthshetra, tirthsthal, tcs chalu ghadamodi, ibps chalu ghadamodi, current Affair,  chalu Ghadamodi Marathi,   current Affair marathi madhe, 2024 cha chalu Ghadamodi,   police Bharti chalu Ghadamodi,   police Bharti prashnasanch,   police Bharti GK prashna,   Mpsc chalu Ghadamodi,   sarkari Naukri,   sarkari job,   sarkari yojna,   Maharashtra cha chalu Ghadamodi,   Maharashtra government yojna,   PSI syllabus, PSI cutoff,   police Bharti syllabus,   police Bharti cutoff,   police Bharti merit,   MPSC Sathi book,   MPSC Sathi pustak,   police Bharti Sathi pustak,   police Bharti magil prashnapatrika,   MPSC previous years question papers,   Mumbai police Bharti,   Mumbai police Bharti Lekhi kadhi ahe,   government GR,   police Bharti result,   MPSC result,   SSC GD merit,   sscgd syllabus,   army Bharti merit,   army Bharti result,   UPSC Marathi,   combine pariksha,   talathi,   talathi syllabus,   talathi cutoff,   talathi book list,   talathi result,   talathi merit,   talathi jaga kiti ahe,   saralseva exam,   saralseva pariksha,   saralseva result,   zilha parishad Bharti,   zilha parishad prashnapstrika, dinvishesh, Chalu Ghadamodi Marathi madhun, current Affair marathi madhe ]

महाकुंभ मेळा 2025 

Maha Kumbh Mela 2025


Subject : GS - इतिहास- कला आणि संस्कृती


सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न

प्रश्न) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जात नाही ?

1. हरिद्वार

2. उज्जैन

3. नाशिक 

4. वाराणसी

उत्तर : वाराणसी


बातमी काय आहे ? 

13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान प्रयागराज या पवित्र शहरात महाकुंभ मेळा भरणार आहे.


• कुंभमेळा म्हणजे ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे.

• ज्यामध्ये करोडो भाविक कुंभोत्सवात जमतात आणि नदीत स्नान करतात. 

• खगोलशास्त्रीय गणनेनुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सूर्य आणि चंद्र वृश्चिक राशीत आणि गुरु मेष राशीत प्रवेश करतात तेव्हा हा पवित्र उत्सव सुरू होतो.

• हा काळ आध्यात्मिक शुद्धी आणि आत्म-ज्ञानासाठी शुभ काळ मानला जातो.


कुंभमेळा कोण- कोणत्या ठिकाणी भरतो ? 

• कुंभमेळा 12 वर्षांच्या कालावधीत 4 वेळा साजरा केला जातो.

• दर 3 वर्षांनंतर एकदा अश्या पद्धतीने बारा वर्षांत प्रयागराज, उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात. 

• दर 6 वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्धकुंभमेळा भरतो.

• बारा पूर्ण कुंभमेळ्यांनंतर तब्बल १४४ वर्षांनंतर प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो.

 

कुंभमेळा तीर्थक्षेत्र आणि पवित्र नद्या : 

1. उत्तराखंडमध्ये, हरिद्वार येथे गंगा नदीच्या काठावर

2. उत्तर प्रदेशमध्ये,प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि पौराणिक अदृश्य सरस्वती यां नद्यांच्या संगमावर

3. मध्य प्रदेशातील, उज्जैन येथे शिप्रा नदीच्या काठावर  

4. महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर/नाशिक येथे, गोदावरी नदीच्या काठावर 


कुंभमेळा ची युनेस्कोच्या मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत केव्हा नोंद करण्यात आली ? 

• UNESCO द्वारे 2017 मध्ये मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून कुंभमेळा ची नोंद करण्यात आली.

• कुंभमेळा आधुनिकीकरणाच्या युगात प्राचीन परंपरांचे अस्तित्व आणि उत्क्रांतीचा पुरावा म्हणून म्हणून ओळखला गेला.