
चालू घडामोडी 07, फेब्रुवारी 2025 | किसान क्रेडिट कार्ड योजना | Kisan Credit Card Scheme

किसान क्रेडिट कार्ड योजना
Kisan Credit Card Scheme
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नवीन धोरणानुसार किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत शेतकऱ्यांना किती कर्ज मिळू शकेल ?
1. 5 लाख
2. 8 लाख
3. 10 लाख
4. 12 लाख
उत्तर : 5 लाख
बातमी काय आहे ?
- या वर्षीचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी आणि कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजनेची कर्ज मर्यादा वाढवली आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजने बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
- सुधारित धोरणानुसार किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी कर्ज मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजना केव्हा सुरू करण्यात आली ?
- किसान क्रेडिट कार्ड योजना 1998 मध्ये सुरूकरण्यात आली.
किसान क्रेडिट कार्ड योजना काय आहे ?
- किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजना शेतकऱ्यांना त्यांच्या विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे आणि वेळेवर कर्ज देण्यासाठी तयार केलेली सरकारची योजना आहे.
- यामुळे शेतकऱ्यांना संस्थात्मक (बॅंक) कर्ज सहज उपलब्ध होण्यास मदत होते.
- किसान क्रेडिट कार्डवरून जे काही कर्ज दिलं जातं त्यावर 7 % व्याजदर आकारला जातो.
- पण, शेतकरी कर्जाची परतफेड वर्षभरात करणार असेल, तर व्याजदरात 3 टक्के सवलत दिली जाते. म्हणजे एकूण 4 टक्के व्याजदारानं शेतकऱ्यांना कर्ज मिळतं.
- सावकारांपासून जास्त व्याजदराचे कर्जाच्या जाळ्यातून शेतकऱ्यांची सुटका होण्यास मदत होते.
- ज्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिरता आणि कृषी उत्पादकता सुनिश्चित होते.
किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना कशी मदत करते ?
किसान क्रेडिट कार्ड चे फायदे कोणते ?
- शेती आणि पीक काढणीनंतरचे उपक्रम : शेती आणि काढणीनंतरच्या खर्चासाठी निधीची उपलब्धता सुनिश्चित करणे.
- मार्केटिंग क्रेडिट : शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन स्पर्धात्मक बाजार दराने विकता येईपर्यंत आर्थिक तूट भरून काढण्यासाठी मदत करणे.
- घरगुती वापराच्या गरजा : अनौपचारिक कर्ज घेण्याच्या स्रोतांवर (सावकारी कर्ज) अवलंबून न राहता, आवश्यक घरगुती खर्च पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे.
- शेती मालमत्तेसाठी खेळते भांडवल : आवश्यक शेती उपकरणे आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी मदत करणे.
- जोडधंद्यासाठी गुंतवणूक कर्ज : पशुपालन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि इतर कृषी विस्तारांसाठी आर्थिक मदत वाढवणे.
- विमा संरक्षण : किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत लोन घेणाऱ्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आलं, तर त्या शेतकऱ्याला विमा संरक्षण दिलं जातं.