
चालू घडामोडी 07, फेब्रुवारी 2025 | केंद्रीय अर्थसंकल्प 2025 -26 | Union Budget 2025 -26

केंद्रीय अर्थसंकल्प 2025 -26
Union Budget 2025 -26
Subject : GS - अर्थशास्त्र - अर्थसंकल्प, राज्यशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) केंद्रीय अर्थसंकल्प 2025 - 26 कोणी मांडला ?
1. श्रीमती निर्मला सीतारमण
2. श्री नरेंद्र मोदी
3. श्री अमित शहा
4. श्री अजित पवार
उत्तर : श्रीमती निर्मला सीतारमण
बातमी काय आहे ?
केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 सादर केला.
केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
- " सबका विकास " ही केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 ची संकल्पना आहे.
- या संकल्पनेसह सर्व क्षेत्रांच्या संतुलित विकासाला चालना देणारा 2025-26 चा केंद्रीय अर्थसंकल्प आहे.
या संकल्पनेनुसार, अर्थमंत्र्यांनी विकसित भारतच्या व्यापक तत्वांचा आराखडा मांडला ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे :
- शून्य-दारिद्र्य;
- शंभर टक्के चांगल्या दर्जाचे शालेय शिक्षण;
- उच्च-गुणवत्तेची, परवडणारी आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवेची उपलब्धता;
- अर्थपूर्ण रोजगारासह शंभर टक्के कुशल कामगार;
- आर्थिक उपक्रमांमध्ये सत्तर टक्के महिला; आणि
- शेतकरी आपल्या देशाला 'जगाचे अन्नकोठार' बनवत आहेत.
2025-26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात विकासाचे 4 इंजिन कोणते आहेत ?
- कृषी (Agriculture)
- MSME (Micro, Small and Medium Enterprises)
- गुंतवणूक (Investment)
- निर्यात (Exports) हे विकसित भारताच्या प्रवासातील इंजिन आहेत
अर्थसंकल्प 2025-26 चे अंदाजपत्रक (Budget Estimates 2025-26)
- कर्जाव्यतिरिक्त एकूण उत्पन्न 34.96 लाख कोटी रुपये आणि एकूण खर्च 50.65 लाख कोटी रुपये राहील असा अंदाज आहे.
- निव्वळ कर महसूल (Net Tax Receipts) 28.37 लाख कोटी रुपये राहील असा अंदाज आहे.
- वित्तीय तूट (Fiscal Deficit) GDP च्या 4.4% असेल असा अंदाज आहे.
- बाजारातील एकूण कर्ज (Gross Market Borrowings) अंदाजे 14.82 लाख कोटी रुपये आहे.
- वित्त वर्ष 2025-26 मध्ये भांडवली खर्चासाठी 11.21 लाख कोटी (GDP च्या 3.1%) रुपये तरतूद आहे.
वैयक्तिक प्राप्तिकर (Personal Income Tax ) वर सूट :
- नव्या कर संरचनेत 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर वैयक्तिक प्राप्तिकर भरावा लागणार नाही.
- पगारदार करदात्यांसाठी ही मर्यादा 12.75 लाख रुपये असेल, कारण 75,000 रुपये स्टँडर्ड डिडक्शन आहे.
- नव्या रचनेमुळे मध्यमवर्गाला भरावा लागणारा कर मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि त्यांच्या हातात अधिक पैसा शिल्लक राहील, घरगुती वापर, बचत आणि गुंतवणुकीला चालना मिळेल.
अर्थसंकल्प 2025-26 मधील परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
बिहारमध्ये मखाना मंडळ (Makhana Board in Bihar) :
मखानाचे उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि विपणन सुधारण्यासाठी मखाना मंडळ स्थापन केले जाईल.
किसान क्रेडिट कार्ड (KCC) च्या माध्यमातून वर्धित पतपुरवठा :
KCC मार्फत घेतलेल्या कर्जासाठी सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा 3 लाख रुपये वरून 5 लाख रुपये पर्यंत वाढवली जाईल.
आसाममध्ये युरिया प्रकल्प (Urea Plant in Assam) :
आसाममधील नामरूप येथे वार्षिक 12.7 लाख मेट्रिक टन क्षमतेचा युरिया प्रकल्प उभारला जाईल.
रूपया असा येणार (Rupee Comes From)

रूपया असा जाणार (Rupee Goes To)
