
चालू घडामोडी 04, ऑक्टोबर 2024

कोणत्या राज्याला मिळाले नवीन 8 GI टॅग ?
Subject : GS - अर्थशास्त्र, GI Tag
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडे तांदळाच्या अनेक अनोख्या बिअरच्या पेय्यांना भौगोलिक संकेतांक (GI टॅग) मिळाला . ते उत्पादने खालील पैकी कोणत्या राज्यातील आहे ?
1. महाराष्ट्र
2. उत्तर प्रदेश
3. गोवा
4. आसाम
उत्तर : आसाम
अलीकडे, चेन्नई येथील भौगोलिक संकेत रजिस्ट्री ने (Geographical Indications Registry) आसाम मधील 8 उत्पादनांना GI टॅग मंजूर केला आहे, ज्यात पारंपारिक खाद्यपदार्थ आणि तांदळाच्या अनेक अनोख्या बिअरच्या प्रकारांचा समावेश आहे.

नवीन GI टॅग मिळालेले उत्पादनांबद्दल थोडक्यात माहिती :
तांदळा पासून बनवलेले बियर :
1) बोडो जौ ग्वरन (Bodo Jou Gwran) :
बोडो समुदायाने बनवलेल्या तांदळाच्या बिअरच्या इतर प्रकारांच्या तुलनेत यात अल्कोहोलची टक्केवारी (सुमारे 16.11%) सर्वाधिक आहे.
2) मायब्रा जौ बिडवी (Maibra Jou Bidwi) :
• याला 'मैब्रा ज्वु बिडवी' किंवा 'मायब्रा झ्वु बिडवी' म्हणूनही ओळखले जाते.
• अर्धा शिजलेला तांदूळ (मायरॉन्ग) कमी पाण्यात आंबवून आणि त्यात थोडेसे ‘अमाओ’ घालून ते तयार केले जाते.
• बहुतेक बोडो जमातींद्वारे ते पाहुण्यांना स्वागत पेय म्हणून दिले जाते.
3) बोडो जौ गिशी (Bodo Jou Gishi) :
हे पारंपारिकपणे तांदूळ-आधारित अल्कोहोलयुक्त पेय्य आहे.
4) खाद्यपदार्थांनाही GI टॅग मिळालेला आहे ते खाद्यपदार्थ पुढीलप्रमाणे :
• बोडो नेपहम (Bodo Napham) : हा आंबलेल्या माशांचा एक महत्त्वाचा आणि आवडता खाद्यपदार्थ आहे.
• बोडो ओंडला (Bodo Ondla) : तांदळाच्या पावडर पासून बनवलेली करी.
• बोडो ग्वखा (Bodo Gwkha) : ते बविसागु सणादरम्यान तयार केले जाते.
• बोडो नार्जी (Bodo Narzi) : हे तागाच्या पानांनी तयार केलेले अन्न आहे.
• या सोबतच बोडो अरोनाई (Bodo Aronai) नावाच्या एका कपड्यालाही GI टॅग देण्यात आला आहे.
भौगोलिक संकेतांक म्हणजे काय ?
GI Tag (Geographical Indication)
• एखाद्या भागातील वस्तू किंवा पदार्थ ही त्या भागाचं वैशिष्ट्य असल्यास त्यास भौगोलिक संकेतांक म्हणजेच GI टॅग देण्यात येतो.
• Geographical Indication of goods (Registration and Protection) Act, 1999 हा कायदा भारतातील वस्तूंची संबंधित भौगोलिक संकेतांची नोंदणी आणि उत्तम संरक्षण करण्यास प्रयत्न करतो.
• 2004 मध्ये दार्जिलिंग टी (दार्जिलिंग चहा) GI टॅग मिळवणारा पहिले भारतीय उत्पादन होते.
5 नवीन अभिजात भाषा
New Classical Language
Subject : GS - कला आणि संस्कृती
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच 2024 मध्ये खालील पैकी कोणत्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला ?
1. मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि संस्कृत
2. मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली
3. मराठी, पाली, तमिळ, संस्कृत आणि बंगाली
4. मराठी, पाली, मल्याळम, ओडिया आणि संस्कृत
उत्तर : मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.
अभिजात भाषा म्हणजे काय ?
• एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्राचीन सांस्कृतिक इतिहास असलेला भाषेला भारत सरकारकडून विशेष दर्जा दिला जातो अशा भाषांना अभिजात भाषा म्हणून ओळखले जाते.
• देशातील अभिजात भाषा या भारताच्या पुरातन आणि प्राचीन सांस्कृतिक वारशाच्या संरक्षकाची भूमिका पार पाडत आल्या आहेत.
• यासोबतच या भाषा म्हणजे प्रत्येक समुदायाने गाठलेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वाटचालीतील मैलाच्या टप्प्यांचे सार आणि मूर्त रूप आहेत.
एखादी भाषा अभिजात कशी ठरते ? आणि ती कोण ठरवते ?
कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत.
अभिजात भाषेसाठी चे सुधारित निकष कोणते ?
• महाराष्ट्र सरकारकडून 2013 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची विनंती करणारा प्रस्ताव मंत्रालयाला प्राप्त झाला होता, जो भाषा तज्ञ समितीकडे पाठवण्यात आला होता.
• त्यानुसार भाषा तज्ञ समितीने(साहित्य अकादमीच्या अंतर्गत) 25 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत एकमताने खालील प्रमाणे निकषांमध्ये बदल केले.
1. या भाषेतील ग्रंथ/ लिखित इतिहास 1500 ते 2000 वर्षांहून अधिक प्राचीन असावा.
2. प्राचीन साहित्य/ग्रंथांचा एक भाग, ज्याला वक्त्यांच्या पिढ्यांनी एक वारसा मानले आहे.
3. ज्ञान ग्रंथ विशेषतः कविता, पुराभिलेख आणि शिलालेखांचे पुराव्यांव्यतिरिक्त गद्य ग्रंथ.
4. अभिजात भाषा आणि साहित्य त्यांच्या सध्याच्या स्वरूपापेक्षा वेगळे असू शकेल किंवा त्यांच्या नंतरच्या स्वरूपापासून वेगळे झालेले असू शकेल.
मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषा सुधारित निकषांची पूर्तता करत असून, त्यामुळे या भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता दिली जावी अशी शिफारसही या समितीने केली आहे.
अभिजात भाषा कोणत्या आहेत ?
1. तमिळ : 2004 मध्ये तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. तमिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा आहे.
2. संस्कृत (2005)
3. तेलुगू (2008)
4. कन्नड (2008)
5. मल्याळम (2013)
6. ओडिया : 2014 मध्ये या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला.
7. मराठी (2024)
8. पाली (2024)
9. प्राकृत (2024)
10. आसामी (2024)
11. बंगाली (2024)
अभिजात भाषेचा रोजगार निर्मितीसाठी हातभार :
• एखाद्या भाषेचा अभिजात भाषेच्या श्रेणीत समावेश झाल्याने त्या भाषेच्या क्षेत्रात, विशेषत: शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या महत्त्वाच्या संधी निर्माण होतात.
• या भाषांमधील प्राचीन ग्रंथसंपदेचे जतन, दस्तऐवजीकरण आणि डिजिटलायझेशन यामुळे संग्रह करणे, अनुवाद, प्रकाशन आणि डिजिटल माध्यमांमध्ये अशा विविध स्वरूपाचे रोजगार निर्माण होतील.
जागतिक प्राणी दिन
World Animal Day
Subject : GS - दिनविशेष, पर्यावरण
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जागतिक प्राणी दिन केव्हा साजरी करतात ?
1. 5 जून
2. 12 सप्टेंबर
3. 4 ऑक्टोबर
4. 10 नोव्हेंबर
उत्तर : 4 ऑक्टोबर

• जागतिक प्राणी दिन दरवर्षी 4 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.
• जागतिक प्राणी दिनाला जागतिक प्राणी कल्याण दिन किंवा जागतिक प्राणी संरक्षण दिवस म्हणूनही ओळखले जाते.
• प्राणी कल्याणाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि सर्व प्राण्यांच्या संरक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.
• मग ते पाळीव प्राणी, वन्यजीव किंवा शेतातील प्राणी असोत.
पहिला जागतिक प्राणी दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
• जागतिक प्राणी दिन 24 मार्च 1925 रोजी सर्वप्रथम जर्मनीमध्ये साजरा करण्यात आला.
• हेनरिक झिमरमन या सायनोलॉजिस्टने सुरू केले होते, ज्यांनी बर्लिनमधील स्पोर्ट्स पॅलेसमध्ये पहिला उत्सव आयोजित केला होता, ज्यात 5,000 हून अधिक लोक उपस्थित होते.
तर मग जागतिक प्राणी दिन ऑक्टोबरमध्ये का साजरा केला जातो ?
• असिसिचे संत फ्रान्सिस यांचं प्राण्यावर खूप प्रेम होतं. त्यांनी 4 ऑक्टोबर 1925 या दिवशी प्राण्यासाठी 'उत्सव दिन' म्हणजे Feast Day साजरा करायला सुरुवात केली.
• त्यानंतर 1931 साली इटली येथे इंटरनॅशनल ॲनिमल प्रोटेक्शन परिषद भरवण्यात आली होती. त्यामध्ये संत फ्रान्सिस यांचा सन्मान म्हणून 4 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय प्राणी दिवस साजरा करण्याचं ठरवलं.
नोट : पहिला जागतिक प्राणी दिन 24 मार्च 1925 रोजी साजरा केला परंतु इंटरनॅशनल ॲनिमल प्रोटेक्शन परिषद नंतर 4 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय प्राणी दिवस साजरा करण्याचं ठरवलं
जागतिक प्राणी दिन 2024 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
" जग हे त्यांचेही घर आहे "
(The World Is Their Home Too)
ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया (Animal Welfare Board of India) बद्दल महत्त्वाची माहिती :
• ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया ही भारत सरकारची वैधानिक संस्था आणि सल्लागार संस्था आहे.
• उद्देश : या संस्थेचा उद्देश भारत देशात प्राणी कल्याणाचा प्रचार करणे आणि प्राणी कल्याण कायद्यांबद्दल सल्ला देणे हे आहे.
• स्थापना : प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 (Prevention of Cruelty to Animals Act,1960.) च्या कलम 4 अंतर्गत 1962 मध्ये मंडळाची स्थापना करण्यात आली.
• मुख्यालय : या संस्थेचे मुख्यालय हरियाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यात आहे.









































