
चालू घडामोडी 03, ऑक्टोबर 2024

राज्य आपत्ती निवारण प्रतिसाद निधी म्हणजे काय ?
State Disaster Relief Fund (SDRF)
Subject : GS - भारताचा भूगोल
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राज्य आपत्ती निवारण प्रतिसाद निधी (SDRF) बाबत योग्य पर्याय निवडा.
1. नुकतात केंद्र सरकारने महाराष्ट्राला १ हजार ४९२ कोटी रुपये निधी जाहीर केला.
2. विशेष श्रेणीतील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्र सरकार 90% योगदान देते.
3. दोन्ही योग्य
4. दोन्ही अयोग्य
उत्तर : दोन्ही योग्य

• पूरग्रस्त १४ राज्यांना ५८५८ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारनं जारी केला.
• त्यापैकी सर्वाधिक हिस्सा म्हणून महाराष्ट्राला १४९२ कोटी रुपये मिळणार आहे.
• राज्य आपत्ती निवारण प्रतिसाद निधीतला केंद्र सरकारचा वाटा आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रतिसाद निधीतला आगाऊ हप्ता म्हणून हा निधी दिला जात आहे.
• यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळं या राज्यांमध्ये नुकसान झालं होतं.
राज्य आपत्ती निवारण प्रतिसाद निधी म्हणजे काय ?
State Disaster Relief Fund (SDRF)
• राज्य आपत्ती निवारण प्रतिसाद निधी (SDRF) हे भारतातील राज्य सरकारांना त्यांच्या प्रदेशातील आपत्तींचे व्यवस्थापन आणि प्रतिसाद देण्यासाठी उपलब्ध असलेले महत्त्वपूर्ण संसाधन आहे.
• आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या कलम 48 (1) अ अंतर्गत प्रत्येक राज्यात SDRF ची स्थापना करण्यात आली आहे.
• राज्य आपत्ती निवारण प्रतिसाद निधीचा वापर केवळ चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, भूकंप, त्सुनामी, गारपीट, आग, भूस्खलन, ढगफुटी, कीटकांचा हल्ला, शीतलहरी आणि हिमवृष्टी यांसारख्या अधिसूचित आपत्तीतील पीडितांना त्वरित मदत पुरवण्यासाठी खर्च केला जातो.
राज्य आपत्ती निवारण प्रतिसाद निधीत केंद्र आणि राज्य सरकारचे योगदान किती असते ?
• केंद्र सरकार सामान्य श्रेणीतील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी SDRF मध्ये 75% आणि विशेष श्रेणीतील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 90% योगदान देते.
• उर्वरित रक्कम संबंधित राज्य सरकारे देतात.
सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा 2024
Best Tourism Villages Competition-2024
बातम्यांमध्ये : भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त सर्वोत्कृष्ट पर्यटन गावे स्पर्धा 2024 च्या विजेत्यांची घोषणा केली.
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा 2024 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या गावाला पुरस्कार मिळाला ?
1. मान्याचीवाडी
2. कर्दे
3. पाटोदा
4. अंतरवाली सराटी
उत्तर : कर्दे

कर्दे गावाबद्दल थोडक्यात माहिती :
• कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हे एक गाव आहे.
• रत्नागिरीच्या किनारपट्टीवर वसलेले कर्दे हे गाव स्वच्छ समुद्रकिनारे, पांढरी वाळू आणि नयनरम्य परिसर यामुळे पर्यटकांना आकर्षित करत आहे.
• शाश्वत पर्यटन आणि महिला सक्षमीकरणासाठी केलेले पर्यावरणपूरक प्रयत्न हे खरोखर कर्दे गावाचे वेगळेपण सिद्ध करतात.
• कर्दे गावाने सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट कृषी-पर्यटन गावाचा पुरस्कार पटकावला आहे.
सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धेबद्दल महत्त्वाची माहिती :
• देशातल्या गावांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट पर्यटन गावे स्पर्धा सुरू करण्यात आली.
• 2024 च्या सर्वोत्कृष्ट पर्यटन गावे स्पर्धेत, 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून एकूण 991 अर्ज प्राप्त झाले होते.
• त्यापैकी 36 गावांची निवड सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा 2024 च्या 8 श्रेणींमध्ये विजेते म्हणून करण्यात आली.
• विजेत्या गावात कृषी पर्यटन श्रेणीत महाराष्ट्रातील कर्दे गावाचा समावेश आहे.
सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा का घेतली जाते ? तीचा उद्देश काय आहे ?
• सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा ग्रामीण पर्यटन स्थळाचे उत्कृष्ट उदाहरण देणाऱ्या गावाचा गौरव करण्याचा प्रयत्न करते.
• ही स्पर्धा प्रसिद्ध सांस्कृतिक आणि नैसर्गिक संपत्तीचे प्रदर्शन करते, भारतातील खेड्यातील समुदाय-आधारित मूल्ये, वस्तू आणि जीवनशैलीचे जतन आणि प्रोत्साहन देते.
• ही स्पर्धा आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय अशा सर्व पैलूंमध्ये शाश्वततेसाठी गावांच्या बांधिलकीला प्रोत्साहन देते.
• स्पर्धेचे ध्येय : पर्यटन हा सकारात्मक बदल, ग्रामीण विकास आणि समाजाच्या कल्याणाचा चालक बनवणे हे या स्पर्धेचे ध्येय आहे.
श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
Shiv Chhatrapati State Sports Award
Subject : GS - खेळ, पुरस्कार
सरळसेवा, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच राज्य सरकारनं २०२२-२३ या वर्षासाठीचा श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्रशिक्षक प्रदीप गंधे यांना जाहीर केला आहे. ते खालील पैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
1. क्रिकेट
2. फुटबॉल
3. हॅाकी
4. बॅडमिंडन
उत्तर : बॅडमिंडन

• राज्य सरकारनं २०२२-२३ या वर्षासाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार बॅडमिंडनपटू आणि प्रशिक्षक प्रदीप गंधे यांना जाहीर केला आहे.
• भारताचा पॅरिस ऑलिम्पियन धावपटू अविनाश साबळे याच्यासह अन्य ४७ जणांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
• क्रीडा- क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील गुणवान खेळाडूंना महाराष्ट्र शासनातर्फे शिवछत्रपती राज्य क्रीडा हा पुरस्कार देण्यात येतो.
• व्यक्तिगत स्वरूपाचे हे पुरस्कार देण्यास १९६९-७० सालापासून प्रारंभ झाला.
• उद्देश : या पुरस्काराचा प्रमुख उद्देश विविध प्रकारच्या खेळांमध्ये सातत्याने चमकणाऱ्या खेळाडूंचे कौतुक करणे आणि नविन, होतकरू खेळाडूंना उत्तेजन देणे हा आहे.
• महाराष्ट्रातील सर्वच खेळांचा दर्जा वाढविणे, हाही त्यामागे एक हेतू आहे.पॅरिस
• महाराष्ट्र शासनातर्फे खालील गटात पुरस्कार जाहीर करण्यात आले -
• शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार
• उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/ जिजामाता क्रीडा पुरस्कार
• शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू)
• शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार
• शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू)
नोट : पुरस्कार प्राप्त सर्वांची लिस्ट देत आहेत सर्व पाठ करू नका,
जीवनगौरव पुरस्कार आणि त्यांच्या सोबत तुम्ही जिथे फॉर्म भरला आहे (भरणार आहात) तेथील खेळाडू असल्यास तो पाठ करावा.



