
चालू घडामोडी 28, जानेवारी 2025 | 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन | 38th National Games

38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
38th National Games
Subject : GS - खेळ
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन कोठे करण्यात आले ?
1. महाराष्ट्र
2. गुजरात
3. आंध्र प्रदेश
4. उत्तराखंड
उत्तर : उत्तराखंड
बातमी काय आहे ?
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज (28 जानेवारी 2025 रोजी) उत्तराखंडमधील डेहराडून येथे 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन केले.
38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन कोठे करण्यात आले ?
• राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या रौप्यमहोत्सवी वर्षात उत्तराखंडमधील डेहराडून येथे 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
• राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत उत्तराखंडच्या 8 जिल्ह्यांमधील 11 शहरांमध्ये या स्पर्धा होणार आहेत.
• उत्तराखंड राज्याच्या स्थापनेचा 25 वा वर्धापन दिन साजरा करत असल्याने राष्ट्रीय खेळांचे आयोजन हे त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाचे आहे.
38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धे बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 36 राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश सहभागी होणार आहे.
• 17 दिवसांत 35 क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होणार आहेत.
• यापैकी 33 क्रीडा प्रकारांसाठी पदके दिली जातील.
• कलारीपयट्टू, योगासन, मल्लखांब आणि राफ्टिंग हे खेळ प्रदर्शनीय खेळ असतील ज्यात कोणतेही पदक दिले जाणार नाही.
• योग आणि मल्लखांब यांचा पहिल्यांदाच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे.
• या स्पर्धेत देशभरातून 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.
38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची संकल्पना थीम काय आहे ?
• शाश्वततेवर भर देत यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची संकल्पना 'हरित खेळ' (Green Games) अशी आहे.
• स्पर्धेच्या ठिकाणी ‘स्पोर्ट्स फॉरेस्ट’ नावाचे एक विशेष उद्यान विकसित केले जाणार असून या ठिकाणी खेळाडू आणि पाहुणे 10,000 हून अधिक रोपे लावतील.
• खेळाडूंना प्रदान करण्यात येणारी पदके आणि प्रमाणपत्रे पर्यावरणपूरक आणि बायोडिग्रेडेबल (विघटनशील) पदार्थांपासून बनवली जातील.
38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शुभंकर (Mascot) कोणता ?
उत्तराखंडचा राज्य पक्षी 'मोनल' पासून प्रेरित, मौली (Mauli) हा खेळांचा शुभंकर आहे जो या प्रदेशाच्या अद्वितीय नैसर्गिक सौंदर्य, विविधता आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे.
38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे ब्रीदवाक्य काय आहे ?
38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे ब्रीदवाक्य "संकल्प से शिखर तक" आहे.