
चालू घडामोडी 18, मार्च 2025 | कोठे होणार कबड्डी वर्ल्डकप 2025 ? | Which Country hosts Kabaddi World Cup 2025 ?

कोठे होणार कबड्डी वर्ल्डकप 2025 ? | Which Country hosts Kabaddi World Cup 2025 ?
Subject : GS - खेळ
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) कबड्डी वर्ल्डकप 2025 कोठे आयोजित करण्यात आला ?
1. भारत
2. इंग्लंड
3. अमेरिका
4. इराण
उत्तर : इंग्लंड
बातमी काय आहे ?
• 17 मार्चपासून इंग्लंडमध्ये कबड्डी विश्वचषक 2025 सुरू झाला.
• कबड्डी वर्ल्डकप पहिल्यांदाच आशिया बाहेर आयोजित केली जात आहे.
• कबड्डी वर्ल्डकप स्पर्धा 7 दिवस चालेल आणि त्यात 50 हून अधिक सामने खेळले जातील.
• यंदाची (2025) ही दुसरी कबड्डी वर्ल्डकप स्पर्धा आहे.
• ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघ (International Kabaddi Federation) ने आयोजित केली आहे.
पुरुष कबड्डी वर्ल्डकप 2025 सहभागी देश :
• Group A : हंगेरी, इंग्लंड, पोलंड, जर्मनी, अमेरिका
• Group B : भारत, इटली, स्कॉटलंड, वेल्स, हाँगकाँग(चीन)
महिला कबड्डी वर्ल्डकप 2025 सहभागी देश :
• Group D : भारत, वेल्स, पोलंड
• Group E : हंगेरी, इंग्लंड, हाँगकाँग (चीन)
पहिला कबड्डी वर्ल्डकप कोणी जिंकला ?
• पहिला कबड्डी वर्ल्डकप 2019 मध्ये मलेशियात आयोजित करण्यात आला होता.
• भारताने पुरुष आणि महिला दोन्ही गटात पहिला कबड्डी वर्ल्डकप जिंकला होता.
आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघ संदर्भात परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
(International Kabaddi Federation)
• आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघ ही कबड्डी खेळाची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे.
• आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाची स्थापना भारताच्या आशिष पचौरी (Ashish Pachori) यांनी 2004 मध्ये केली.
• आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे पहिले अध्यक्ष भारताचे आशिष पचौरी हे होते.
• आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे मुख्यालय राजस्थान येथील जयपूर शहरात आहे.