
चालू घडामोडी 14, मार्च 2025 | SBI अस्मिता म्हणजे काय ? | SBI Asmita

SBI अस्मिता म्हणजे काय ?
SBI Asmita
Subject : GS - अर्थशास्त्र - बॅंकिंग
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच स्टेट बँक ऑफ इंडियाने ' SBI Asmita’ उपक्रम सुरू केला आहे. तर SBI Asmita चे उद्दिष्ट खालील पैकी कोणते ?
1. मुलींसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती
2. ग्रामीण भागात बँकिंग सेवांचा विस्तार करणे
3. ज्येष्ठ नागरिकांना कर्ज देणे
4. महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यास मदत करणे
उत्तर : महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यास मदत करणे
SBI अस्मिता काय आहे ?
• महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यास मदत करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने 'SBI अस्मिता' सुरू केली आहे.
• ही योजना महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यास आणि त्यांच्या व्यवसायांना चालना देण्यास मदत करते.
• महिला उद्योजकांना त्यांचे व्यवसाय वाढविण्यास आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यास मदत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
SBI अस्मिता योजनेचे वैशिष्ट्ये कोणते ?
• हमीशिवाय (तारणमुक्त) कर्ज उपलब्ध (Collateral-free SME Loan)
• सामान्य कर्जांपेक्षा कमी व्याजदर
• व्यवसायांच्या आर्थिक गरजा आणि व्यवसाय मूल्यांकनावर आधारित कर्ज मंजुरी.
• डिजिटल कर्ज आणि स्वयंचलित डेटा पडताळणीसाठी एक मजबूत API इकोसिस्टम वापरते.
• यंत्रणा डिजिटल आणि ऑनलाईन असल्यामुळे महिलांना कर्ज घेणं अधिक सोईस्कर होईल.
नारी शक्ती प्लॅटिनम डेबिट कार्ड :
‘Nari Shakti’ Platinum Debit Card :
• याचबरोबर SBI ने नारी शक्ती प्लॅटिनम डेबिट कार्ड ही लॅान्च केले.
• नारी शक्ती प्लॅटिनम डेबिट कार्ड हे पर्यावरणपूरक असून हे कार्ड 100% रिसायकल प्लास्टिकपासून बनवलेले आहे.
• महिलांसाठी आर्थिक समावेश वाढवणे आणि ग्रीन बँकिंग उपक्रमांना प्रोत्साहन देणे हे याचे उद्दिष्ट्य आहे.
