
चालू घडामोडी 03, मार्च 2025 | जागतिक वन्यजीव दिन | What is World Wildlife Day ?

जागतिक वन्यजीव दिन
What is World Wildlife Day ?
Subject : GS - दिनविशेष, पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जागतिक वन्यजीव दिन केव्हा साजरी करतात ?
1. 28 फेब्रुवारी
2. 3 मार्च
3. 13 मार्च
4. 4 एप्रिल
उत्तर : 3 मार्च
3 मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन केव्हा घोषित केला ?
• 20 डिसेंबर 2013 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने आपल्या 68 व्या अधिवेशनात 3 मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले.
3 मार्च हाच दिवस का ?
• जागतिक पातळीवरील नागरिकांचे जीवन जल आणि जंगलावर अवलंबून आहे.
• मात्र तरीही अनेक जंगली प्राण्यांच्या आणि वन संपत्ती ची तस्करी करण्याच्या घटना घडत आहेत.
• त्याला आळा घालण्यासाठी 3 मार्च 1973 ला वन्यजीव आणि वनस्पतीच्या व्यापाराला रोखण्यासाठीच्या करारावर 180 देशांनी सही केली होती.
• वन्य प्राणी आणि वनस्पतींच्या लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील अधिवेशन (CITES: Convention on International Trade in Endangered Species of Wild Fauna and Flora) 3 मार्च 1973 रोजी 180 देशांनी मान्य केले म्हणून या दिवसाचे महत्त्व ओळखून 3 मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.
आपण जागतिक वन्यजीव दिन का साजरी करतो ?
• जागतिक वन्यजीव दिन पृथ्वीवरील वैविध्यपूर्ण आणि भव्य वन्यजीवांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे.
• हा दिवस आपल्याला वन्यजीव संदर्भातील गुन्हेगारी आणि वन्य प्रजाती नष्ट करण्याच्या विरोधात लढा उभारण्याची प्रेरणा व आठवण करून देतो.
जागतिक वन्यजीव दिन 2025 ची संकल्पना ( थीम ) काय आहे ?
" वन्यजीव संरक्षण वित्त : लोक आणि ग्रहा (पृथ्वी) वर गुंतवणूक " ही जागतिक वन्यजीव दिन 2025 ची थीम आहे.
Wildlife Conservation Finance: Investing in People and Planet.
• लोकांसाठी आणि आपल्या पृथ्वी या ग्रहासाठी एक चांगले भविष्य निर्माण करण्यासाठी
• वन्यजीव संवर्धनाला अधिक प्रभावीपणे आणि शाश्वतपणे वित्तपुरवठा (Finance) करण्याचे महत्त्व यंदाची संकल्पना अधोरेखित करते.