
चालू घडामोडी | महाराष्ट्र दिन

Maharashtra State Foundation Day
📚 Subject : GS - दिनविशेष, राज्यशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र राज्य कोणत्या दिवशी अस्तित्वात आले ?
- 1 मे 1960
- 1 मे 1961
- 15 ऑगस्ट 1947
- 26 जानेवारी 1950
उत्तर : 1 मे 1960
📰 बातमी काय ?
• दरवर्षी 1 मे हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो.
• 1 मे 2026 रोजी महाराष्ट्राचा 67 वा स्थापना दिन साजरा करण्यात आला आहे.
• 1 मे 1960 मध्ये मुंबई राज्याचे (Bombay State) विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात या दोन स्वतंत्र राज्यांची निर्मिती झाली.
(नोट - 67 वा स्थापना दिन सोहळा (67th Foundation Day Ceremony): जेव्हा एखादी संस्था स्थापन होते, तो पहिला दिवस असतो. 1 मे 1960 हा पहिला (1st) दिवस होता. या हिशोबाने 1 मे 2026 रोजी महाराष्ट्राचा 67 वा स्थापना दिन साजरा झाला)
महाराष्ट्र दिनाचा ऐतिहासिक प्रवास -
🧐 ब्रिटिश काळात परिस्थिती कशी होती ?
• स्वातंत्र्यपूर्व काळात आजचा महाराष्ट्र आणि गुजरात प्रदेश ब्रिटिशांच्या बॉम्बे प्रेसिडेन्सी (Bombay Presidency) चा भाग होता.
• या प्रदेशात मराठी, गुजराती आणि इतर भाषिक समुदाय राहत होते.
🤔 स्वातंत्र्यानंतर काय बदल झाला ?
• 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सीचे रूपांतर मुंबई राज्यात (Bombay State) करण्यात आले.
• या राज्यात मराठी आणि गुजराती भाषिक लोकसंख्या एकत्र होती.
• भाषिक तणाव - एकाच राज्यात मराठी आणि गुजराती भाषिक लोक असल्याने प्रशासकीय आणि सांस्कृतिक कारणावरून तणाव निर्माण होऊ लागला.
🔥 चळवळींची सुरुवात :
1) संयुक्त महाराष्ट्र समिती: मराठी भाषिक जनतेने ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ (Samyukta Maharashtra Samiti) स्थापन करून मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मागणी केली.
2) महागुजरात आंदोलन : त्याचवेळी गुजराती भाषिक समाजाने स्वतंत्र गुजरात राज्याची मागणी सुरू केली.
🏛️ फझल अली आयोग (Fazal Ali Commission) -
• केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचनेचा अभ्यास करण्यासाठी डिसेंबर 1953 मध्ये फझल अली यांच्या अध्यक्षतेखाली 'राज्य पुनर्रचना आयोग' (States Reorganisation Commission) नेमला.
✍️ राज्य पुनर्रचना कायदा, 1956 -
• आयोगाच्या अहवालानुसार 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायदा, 1956 (States Reorganisation Act, 1956) हा कायदा संमत झाला.
• निर्णय - या कायद्याने इतर राज्यांची निर्मिती केली, परंतु मुंबई राज्याचे विभाजन न करता ते 'द्वैभाषिक राज्य' (Bilingual State) म्हणून तसेच ठेवले.
🔥 परिणाम:
• या निर्णयामुळे महाराष्ट्रात नाराजी अधिक वाढली आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ अधिक तीव्र झाली.
• राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारल्याने मराठी लोकांचा संताप झाला.
• याच्या विरोधात अनेक सभांमधून निषेध केले जात होते.
• यात 106 आंदोलक हुतात्म झाले.
🤝 महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती :
• बॉम्बे पुनर्रचना कायदा, 1960 (The Bombay Reorganisation Act, 1960) - प्रखर जनआंदोलन आणि लोकांच्या भावनांचा आदर करत, केंद्र सरकारने हा कायदा संसदेत मंजूर केला.
• स्थापना दिवस : बॉम्बे पुनर्रचना कायदा, 1960 या कायद्यानुसार, 1 मे 1960 रोजी तत्कालीन 'बॉम्बे राज्या'चे अधिकृत विभाजन होऊन दोन नवीन राज्ये अस्तित्वात आली.
1) महाराष्ट्र - मराठी आणि कोकणी भाषिक लोकांसाठी
2) गुजरात - गुजराती आणि कच्ची भाषिक लोकांसाठी.
🎯 या घटनेचे महत्त्व (Significance) :
• घटनात्मक ओळख - महाराष्ट्र आणि गुजरातच्या निर्मितीने भारताच्या संविधानात्मक चौकटीत 'भाषिक अस्मिते'ला (Linguistic Identity) मान्यता दिली.
• पुढील राज्यांसाठी दिशा - भाषा आणि संस्कृतीच्या आधारावर राज्यांची निर्मिती करण्याच्या प्रक्रियेत हा निर्णय एक मैलाचा दगड (Precedent) ठरला.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• 1 मे 1960 → महाराष्ट्र व गुजरात राज्यांची निर्मिती
• पूर्वीचे राज्य → बॉम्बे राज्य
• आंदोलन → संयुक्त महाराष्ट्र आंदोलन (संयुक्त महाराष्ट्र समिती)
• मुख्य मागणी → मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्य
• राज्य स्थापना → बॉम्बे पुनर्रचना कायदा, 1960 कायद्यानुसार
• महाराष्ट्र राज्य → मराठी + कोकणी भाषिक
• गुजरात राज्य → गुजराती + कच्छी भाषिक
























