न्यायालयीन नियुक्तीमध्ये विलंब चिंताजनक : सुप्रीम कोर्ट
सुप्रीम कोर्टाने न्यायपालिकेत नवनियुक्ती संदर्भात होत असलेल्या दिरंगाईबाबत चिंता व्यक्त केली.
नेमकं प्रकरण काय ?
देशभरात अनेक न्यायिक पदे (न्यायाधीश) रिक्त आहेत. संविधान प्रक्रियेनुसार मेमोरंडममध्ये कॉलेजियमद्वारे वारंवार न्यायाधीश पदासाठी नावाची नियुक्ती करण्यास सांगितली जाते परंतु सरकारद्वारे होत असलेल्या दिरंगाईमुळे अनेक पदे रिक्त आहेत.
त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो.
___________________________________
कोल्लेरू वन्यजीव अभयारण्य
आंध्र प्रदेश वनविभागाने कोल्लेरू वन्यजीव अभयारण्याला इको सेन्सिटिव्ह झोन (ESZ - Eco Sensetive Zone) घोषित करण्यासाठी तयारी सुरू केली.
या इको सेन्सिटिव्ह झोन (ESZ) साठी लागणारी जमीन त्या जमिनीचा वापर तसेच त्यासाठीचे नियम यासाठी आंध्रप्रदेश वन्यजीव विभाग सज्ज आहे .
एक्झाम पॉइंटर्स :
Kolleru Lake & Kolleru Wildlife Sanctuary
कोल्लेरू तलाव आणि कोल्लेरू वन्यजीव अभयारण्य :
• हा तलाव आंध्र प्रदेशातील कृष्णा आणि गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशात (डेल्टा) दरम्यान स्थित आहे.
• या दोन नद्यांच्या नैसर्गिक पूर संतुलनासाठी तलावाचे महत्त्वाचे योगदान आहे.
• हे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे.
• 1999 मध्ये भारताच्या वन्यजीव (संरक्षण )अधिनियम, 1972 अंतर्गत तलावाला वन्यजीव अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आले.
• 2002 मध्ये तलावाला रामसर अधिवेशनाअंतर्गत आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या पाणथळ परिसंस्थाचा (Wetland of International Importance ) दर्जा देण्यात आला.
___________________________________
महात्मा गांधींची 154वी जयंती
संपूर्ण देशात 2 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधींची 154 वी जयंती उत्साहात साजरी.
महात्मा गांधींचा थोडक्यात जीवन प्रवास
जन्म : 2 ऑक्टोंबर 1869, पोरबंदर (गुजरात )
मृत्यू : 30 जानेवारी 1948
दक्षिण आफ्रिकेत गांधीजींचे योगदान (1893 - 1915)
दक्षिण आफ्रिकेतील मूळनिवासी आणि भारतीयांसोबत होत असलेल्या वर्णभेद विरुद्धच्या लढ्यातील गांधीजींचे योगदान उल्लेखनीय आहे.
प्रवासी भारतीय दिवस
9 जानेवारी 1915 रोजी गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले या दिवसाला संबोधून देशात 9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो.
गांधीजींचे राजनैतिक गुरु : गोपाळकृष्ण गोखले हे होते.
सुरुवातीचे सत्याग्रह
चंपारण सत्याग्रह - 1917 ; अहमदाबाद मिल सत्याग्रह - १९१८ ; खेडा सत्याग्रह - 1918 ;
राष्ट्रव्यापी जनआंदोलन
• रोलेट अॅक्ट विरोधात आंदोलन ( १९१९ )
• असयोग आंदोलन (१९२० -19२२)
• सविनय कायदेभंग आंदोलन (१९३० आणि १९३४)
भारत छोडो आंदोलन (१९४२)
पुस्तके
हिंद स्वराज
माय एक्सपिरिमेंट विथ ट्रुथ (आत्मचरित्र )
वृत्तपत्रे : इंडियन ओपिनियन ; नवजीवन; हरिजन